लेना नदी
लेना (रशियन: Ле́на, साखा: Өлүөнэ) ही रशियाच्या सायबेरिया प्रदेशामधील तीन विशाल नद्यांपैकी एक नदी आहे (इतर दोन नद्या: ओब व येनिसे). लेना नदी बैकाल सरोवराच्या उत्तरेकडील बैकाल पर्वतरांगेत उगम पावते. तेथून ईशान्येकडे व उत्तरेकडे वाहत जाऊन ही नदी आर्क्टिक महासागराला मिळते. ४,४७२ किमी लांबी असलेली लेना ही जगातील नवव्या क्रमांकाच्या लांबीची नदी आहे.
लेना Ле́на | |
---|---|
याकुत्स्कजवळ लेनाचे पात्र | |
लेना नदीच्या मार्गाचा नकाशा | |
उगम | बैकाल पर्वतरांग, इरकुत्स्क ओब्लास्त, रशिया |
मुख | लापतेव समुद्र, आर्क्टिक महासागर |
पाणलोट क्षेत्रामधील देश | रशिया |
लांबी | ४,४७२ किमी (२,७७९ मैल) |
उगम स्थान उंची | १,६४० मी (५,३८० फूट) |
सरासरी प्रवाह | १६,८७१ घन मी/से (५,९५,८०० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | २५ लाख |
साखा प्रजासत्ताकामधील याकुत्स्क हे लेनावरील सर्वात मोठे शहर आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- माहिती Archived 2005-09-05 at the Wayback Machine.