इशिम नदी
इशिम नदी (रशियन:Иши́м; कझाक: Есіл) ही रशिया आणि कझाकस्तानमधून वाहणारी नदी आहे. कझाकस्तानची राजधानी अस्ताना पासून जवळ उगम पावून ही नदी वायव्येस वाहते व नंतर ईशान्येकडे वाहत इर्तिश नदीला मिळते. या नदीची एकूण लांबी २,४५० किमी आहे.
या नदीतील पाण्याची पातळी कायम राखण्यासाठी इर्तिश नदीतून पाणी आणले जाते. हे पाणी इर्तिश-कारागंदा कालव्यातून आणि कूपनलिकेतून वाहिले जाते.