इंटरस्टेट ९४
इंटरस्टेट ९४ तथा आय-९४ हा अमेरिकेतील महामार्ग आहे. देशाच्या उत्तर भागात पूर्व-पश्चिम धावणारा हा रस्ता मॉंटाना राज्यातील बिलिंग्स शहराजवळ सुरू होऊन मिशिगन राज्यातील पोर्ट ह्युरॉन शहरापर्यंत जातो. तेथे ब्लू वॉटर ब्रिज या पूलावर हा महामार्ग कॅनडाच्या महामार्ग क्र. ४०२ला मिळतो. अमेरिकेतील पूर्व-पश्चिम इंटरस्टेट महामार्गांपैकी हा एकच रस्ता कॅनडाशी थेट संधान बांधतो.
राष्ट्रीय महामार्ग आय-९४ | |
---|---|
Interstate 94 map.png | |
लांबी | २,५५१.१३ किमी |
सुरुवात | बिलिंग्स, मॉंटानाजवळ, आय-९०शी तिठा |
मुख्य शहरे | फार्गो, नॉर्थ डकोटा, मिनीयापोलिस-सेंट पॉल, मिनेसोटा, मॅडिसन, विस्कॉन्सिन, शिकागो, गॅरी, इंडियाना, डीट्रॉइट, सान ॲंटोनियो |
शेवट | लारेडो, टेक्सास |
जुळणारे प्रमुख महामार्ग |
आय-९० (बिलिंग्स, मॉंटाना) आय-२९ (फार्गो, नॉर्थ डकोटा) आय-३५डब्ल्यू (मिनियापोलिस, मिनेसोटा) आय-३५ई (सेंट पॉल, मिनेसोटा) आय-९०, आय-२९ (मॅडिसन, विस्कॉन्सिन) आय-५५ (शिकागो, इलिनॉय) आय-८० (साउथ हॉलंड, इलिनॉय ते लेक स्टेशन, इंडियाना) आय-६५ (गॅरी, इंडियाना) आय-६९ (मार्शल, मिशिगन) आय-७५ (डीट्रॉइट, मिशिगन) |
राज्ये | मॉंटाना, नॉर्थ डकोटा, मिनेसोटा, विस्कॉन्सिन, इलिनॉय, इंडियाना, मिशिगन |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
हा महामार्ग १,५८५.२० मैल (२,५५१.१३ किमी) लांबीचा असून तो मॉंटाना, नॉर्थ डकोटा, मिनेसोटा, विस्कॉन्सिन, इलिनॉय, इंडियाना आणि मिशिगन राज्यांतून जातो.