आल्प-मरितीम

फ्रान्सचा विभाग

आल्प-मरितीम (फ्रेंच: Alpes-Maritimes; ऑक्सितान: Aups Maritims) हा फ्रान्स देशाच्या प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या आग्नेय कोपऱ्यात इटली देशाच्या सीमेवर आल्प्स पर्वतरांगेत व भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसला आहे. मोनॅको हा सार्वभौम देश पूर्णपणे आल्प-मरितीमच्या आंतर्गत आहे.

आल्प-मरितीम
Alpes-Maritimes
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

आल्प-मरितीमचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
आल्प-मरितीमचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर
मुख्यालय नीस
क्षेत्रफळ ४,२९९ चौ. किमी (१,६६० चौ. मैल)
लोकसंख्या १०,८२,४६५
घनता २५१.८ /चौ. किमी (६५२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-06
विभागाचा नकाशा

येथील फ्रेंच रिव्हिएरावरील अनेक निसर्गरम्य व प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांमुळे पर्यटन हा येथील सर्वात मोठा उद्योग आहे. दाट लोकवस्तीच्या ह्या विभागामधील नीस, ॲंतिबकान ही मोठी शहरे आहेत.


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशातील विभाग
आल्प-दा-ओत-प्रोव्हॉंस  · ओत-आल्प  · आल्प-मरितीम  · बुश-द्यु-रोन  · व्हार  · व्हॉक्ल्युझ