आयएनएस सिंधुरक्षक (एस६३)

(आयएनएस सिंधुरक्षक या पानावरून पुनर्निर्देशित)

आय. एन. एस. सिंधुरक्षक एक रशियन निर्मित किलो वर्गाची भारतीय नौदलाची पाणबुडी होती. ही पाणबुडी २४ डिसेंबर, इ.स. १९९७ रोजी नौदलात सामील करण्यात आली, ही किलो वर्गातील १० पैकी ९वी पाणबुडी होती. ४ जून, इ.स. २०१० रोजी भारतीय संरक्षण मंत्री आणि ज्वेजदोच्का गोदी ह्यांनी पाणबुडीच्या आधुनिकीकरण आणि आवश्यक दुरुस्तीसाठी सुमारे ८ कोटी अमेरिकन डॉलरच्या करारावर सह्या केल्या. आवश्यक दुरुस्ती आणि आधुनिकीकरणानंतर ही पाणबुडी रशियाकडून भारतीय नौदलाला मे-जून इ.स. २०१३ दरम्यान परत करण्यात आली.

आय एन एस सिंधुरक्षक

अपघात

संपादन

पाणबुडीवर इ.स. २०१० मध्ये किरकोळ आणि १४ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी भीषण आग लागण्याच्या घटना घडल्या. त्याचा परिणाम म्हणून, मुंबई नौदल गोदीत या पाणबुडीला जलसमाधी मिळाली. त्यावेळी पाणबुडीवरील १८ खलाशी मृत्यमुखी पडले.

बांधणी

संपादन

आय.एन.एस. सिंधुरक्षक पाणबुडीची बांधणी, रशियातल्या सेंट पीटर्सबर्गशहराच्या ॲडमिरॅलिटी गोदीमध्ये झाली. . बांधणीची सुरुवात १९९५ मध्ये झाली. तर डिसेंबर १९९७ मध्ये ती पाणबुडी भारतात पोहचवली गेली.

सेवा इतिहास

संपादन

अपघात २०१०

संपादन

इ.स. २०१० च्या फेब्रुवारीमध्ये जेव्हा सिंधुरक्षक विशाखापट्टनममध्ये नौदलाच्या गोदीत होती तेव्हा तिच्यावर आग लागण्याची घटना घडली होती.. ह्या आगीतत एका खलाशाचा मृत्यू आणि अन्य दोन जखमी झाले होते. नौदल अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सदर आग ही पाणबुडीच्या battery कक्षात झालेल्या स्फोटामुळे लागली, कारण नादुरुस्त battery valve मधून हायड्रोजन वायूची गळती झाली होती.

सुधारणा

संपादन

या २०१०मधील अपघातानंतर पाणबुडी सिंधुरक्षकला सुमारे अडीच वर्षांसाठी रशियात पाठवण्यात आले तेथे तिच्या दुरुस्त्या आणि तिच्यात सुधारणा करण्यात आल्या. २०१० च्या ऑगस्टमध्ये सिंधुरक्षक रशियातील ज्वेजदोच्का गोदीत पोहचली. तिथे पाणबुडीची दुरुस्ती आणि आधुनिकीकरण केले. कथित सुधारणेनंतर २०१२ सालच्या ऑक्टोबरमध्ये तिच्या सामरिक चाचण्यांना सुरुवात झाली. ह्या सुधारणांद्वारे तिच्यात improved electronic warfare systems, an integrated weapon control system and a new cooling system बसवण्यात आल्या. यामुळे या पाणबुडीच्या सेवा जीवनात तब्बल दहा वर्षांनी वाढ होणार होती. या सुधारणामध्ये The Club-S (3M54E1 anti-ship and 3M14E land attack) missiles, USHUS sonar, СCS-MK-2 radio communication systems and Porpoise radio-locating radar, आणि अन्य सुरक्षिततेची सुधारित वैशिष्ट्ये यांचा समावेश होता.

२७ जानेवारी २०१३ रोजी सिंधुरक्षक पाणबुडी तात्कालीन कमांडर राजेश रामकुमार ह्यांच्या द्वारे भारतीय नौदलाच्या हाती सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी या पाणबुडीने भारतीय नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच बर्फाखालून सफळ प्रवास केला.

भूमध्य समुद्रातील प्रसंग

संपादन

मार्च २०१३मध्ये जेव्हा, सिंधुरक्षक तिच्या दुरुस्तीहून परतीच्या प्रवासाला निघाली होती, त्यावेळी भूमध्य समुद्रात तिला एका तीव्र वादळाला सामोरे जावे लागले. वादळाची तीव्रता पाहता ॲलेक्झांड्रिया बंदर प्राधिकरणाला पाणबुडीच्या मदतीसाठी टग बोट पाठवणे जमले नाही. वादळामुळे पाणबुडी उथळ पाण्यातही उतरू शकत नव्हती. त्यावेळी भारतीय विदेश मंत्रालयातून इजिप्तशियन नौदलाला एक तातडीने विनंती केली की त्यांनी त्यांची आधुनिक टग बोट पाठवावी व पाणबुडीला पोर्ट सैद बंदराकडे रवाना करावे. त्याप्रमाणे झाले आणि शेवटी सिंधुरक्षक भारतात सुखरूप पोचली.

विस्फोट आणि जलसमाधी

संपादन

वादळातून वाचलेल्या या सिंधुरक्षक पाणबुडीला शेवटी ऑगस्ट १४, इ.स. २०१३ रोजी मुंबई येथे नौदलाच्या गोदीत असताना, शस्त्रांनी भरलेल्या या पाणबुडीत मध्यरात्रीनंतर प्रथम आग लागली आणि त्यांनंतर स्फोटांची मालिका सुरू झाली. या स्फोटांमुळे पाणबुडीचा पुढचा भाग वाकला आणि चेपला. त्यातून पुढील भागात समुद्राचे पाणी आले. आगीचे नेमके कारण अजून कळलेले नसले तरी ती आग दोन तासात काबूत आणली गेली. मात्र, स्फोटांत झालेल्या प्रचंड नुकसानामुळे पाणबुडीला जलसमाधी मिळाली.,

जलसमाधीनंतरही काही काळ पाणबुडीचा बर्थ दिसू शकत होता. पाणबुडीवर असलेल्या अनेक खलाशांनी पाण्यात उडी मारून आपला जीव वाचवला. असे असले तरी या घटनेत सुमारे १८ माणसे पाणबुडीत अडकून मृत पावली.

या स्फोटामुळे जवळच असलेली दुसरी पाणबुडी आय एन एस सिंधुरत्‍न हिच्यासुद्धा टोरपेडोमधे स्फोट होऊन किरकोळ नुकसान झाले.

नौदल अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या अपघातामुळे सिंधुरक्षकचे भारतीय नौदलात पुनःसेवेत येणे जवळजवळ अशक्य आहे.