आनंद-मिलिंद ही बॉलिवूडमधील एक संगीत दिग्दर्शक जोडी आहे. ह्या दोन संगीतकारांनी मिळून आजवर अनेक हिंदी चित्रपटांना संगीत दिले आहे. १९८८ सालच्या कयामत से कयामत तकच्या संगीतासाठी ते प्रसिद्धीझोतात आले. ह्या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार मिळाला.

१९९० च्या दशकामध्ये आनंद-मिलिंद बॉलिवूडमधील यशस्वी व लोकप्रिय संगीतकार होते. त्यांनी बागी, लव्ह, दिल, बेटा इत्यादी अनेक हिट चित्रपटांना संगीत दिले.

आनंद-मिलिंदनी उदित नारायण, अलका याज्ञिक, अनुराधा पौडवाल, अभिजीत, एस.पी. बालसुब्रमण्यम, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम इत्यादी जवळजवळ सर्व आघाडीच्या गायकांना आपल्या चित्रपटांमध्ये संधी दिली. नव्या व होतकरू गायकांना संधी देण्यासाठी ते प्रसिद्ध होते.