कविता कृष्णमूर्ती

भारतीय चित्रपटांतील पार्श्वगायिका

कविता सुब्रमण्यम ऊर्फ कविता कृष्णमूर्ती (तमिळ: கவிதா கிருஷ்ணமுர்த்தி சுப்பிரமணியம் ; रोमन लिपी: Kavita Krishnamurthy Subramaniam ;) (जानेवारी २५, इ.स. १९५८ - हयात) या भारतीय चित्रपटांतील पार्श्वगायिका आहेत. विवाहानंतर त्या हिंदी बॉलीवूड गाण्याबरोबरच इंडिपॉप गाणी, (उडत्या चालीची हिंदी गाणीही गाऊ लागल्या आहेत.

कविता कृष्णमूर्ती सुब्रमण्यम

कविता कृष्णमूर्ती
आयुष्य
जन्म जानेवारी २५, इ.स. १९५८
जन्म स्थान दिल्ली, भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
वांशिकत्व तमिळ
नागरिकत्व भारतीय
मूळ_गाव दिल्ली
देश भारत
भाषा तमिळ, हिंदी भाषा
पारिवारिक माहिती
वडील श्री.टी.एस.कृष्णमूर्ती
जोडीदार डॉ. एल.सुब्रमण्यम
संगीत साधना
शिक्षण बी.ए.
गुरू बलराम पुरी, श्रीमती भट्टाचार्य
गायन प्रकार भारतीय शास्त्रीय गायन
संगीत कारकीर्द
पेशा पार्श्वगायन
कारकिर्दीचा काळ १९८० पासून
गौरव
गौरव फिल्मफेअर पुरस्कार(१९९५-९७, २००३)
पुरस्कार पद्मश्री पुरस्कार(२००५),
बाह्य दुवे
संकेतस्थळ

कविता कृष्णमूर्ती या दिल्लीत राहत होत्या आणि वयाच्या १४व्या वर्षी मुंबईला आपल्या बंगाली मावशीकडे आल्या. त्यांना पार्श्वगायिका बनवण्याची मावशीचीच खूप इच्छा होती.

कविता कृष्णमूर्ती यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल, खय्याम, राहुल देव बर्मन, ए. आर. रहमान, जतीन ललित, रवींद्र जैन यांसारख्या ज्येष्ठ संगीतकारांबरोबर काम केले, इतकेच नाही तर त्यांना मन्ना डे, हेमंतकुमार, मुकेश, लतादीदी यांसारख्या ज्येष्ठ गायकांबरोबर गाण्याची संधी मिळाली.

विवाह

संपादन

कविता कृष्णमूर्ती यांचे पती डॉ. एल. सुब्रमण्यम हे व्हायोलिनवादक आहेत.संगीताच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने ते जगभर फिरत. इ.स. १९९९ मध्ये, 'हे राम' या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची आणि कविता कृष्णमूर्ती यांची भेट झाली. नंतर काही संगीताच्या कार्यक्रमांत दोघे भेटले, बोलले, त्यांची मैत्री झाली आणि त्यांचे प्रेम जमले.

डॉ. एल. सुब्रमण्यम हे सुमारे २० वर्षे अमेरिकेत राहत होते. १९९६ मध्ये त्यांच्या पत्‍नीचे कर्करोगाने निधन झाले. त्यांना तीन लहान मुले होती. पत्नीच्या निधनानंतर ते मुलांना घेऊन भारतात आले आणि बंगलोरमध्ये स्थायिक झाले. ११ नोव्हेंबर १९९९ रोजी कविता आणि सुब्रमण्यम यांचा विवाह झाला. विवाहानंतर कविता सुब्रमण्यम बंगलोरला राहू लागल्या.

कविता कृष्णमूर्ती यांची सांगीतिक कारकीर्द

संपादन

कविता कृष्णमूर्ती यांनी भारतीय शास्त्रीय संगीत शैलींमध्ये शिक्षण घेतले असून शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी गायली आहेत. 'हम दिल दे चुके सनम'मधले 'निम्बोडा निम्बोडा' हे त्यांनी गायलेले गाणे अतिशय अवघड समजले जाते.

पतीबरोबर संगीताच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने सतत जगभर फिरत असल्यामुळे कविता सुब्रमण्यम यांच्या कानावर देशोदेशीचे संगीत पडू लागले.त्यामुळे त्यांनी पतीची 'फ्यूजन म्युझिक'ची संकल्पना वाढवली. त्यांच्या कार्यक्रमांत त्या त्यांना साथ देऊ लागल्या. अशा कार्यक्रमांमुळे त्यांची संगीताकडे बघण्याची दृष्टी बदलली. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतावर आधारित असलेली गाणी आणि पतीचे फ्यूजन संगीत आणि व्हायोलिनवादन यामुळे त्यांचे कार्यक्रम खूप रंगू लागले. पतीच्याच प्रोत्साहनामुळे कविताबाई आधी कधीही गायल्या नाहीत अशी गाणी गाऊ लागल्या, संगीतात नवे नवे प्रयोग करू लागल्या.

त्यांच्या फ्यूजन संगीताच्या कार्यक्रमात व्हायोलिनबरोबरच, पियानो, कर्नाटकी शास्त्रीय संगीत आणि बॉलीवूडची गाणी असा कार्यक्रम असतो, तर त्यांच्या 'ग्लोबल फ्यूजन' या कार्यक्रमात पाश्चिमात्य संगीत सोडून इतर देशांच्या म्हणजेच, आफ्रिकी, जपानी, चिनी, किंवा नॉर्वेच्या संगीताचा समावेश असतो.

स्वतःचा बँड

संपादन

कविता सुब्रमण्यम यांचा स्वतःचा बँड आहे. बँड आहे. कीबोर्ड, गिटार, इलेक्ट्रिक बास, ड्रम्स, भारतीय ताल वाद्ये आणि सगळे वादक असा लवाजमा घेऊन त्या पतीबरोबर जगभर फिरत अस्तात. लंडनचा रॉयल अल्बर्ट हॉल, वॉशिंग्टन केनेडी सेंटर असे अनेक विख्यात ठिकाणी त्यांनी कार्यक्रम केले आहेत. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि आंतरराष्ट्रीय संगीताचा सुरेख मिलाफ या कार्यक्रमात ऐकायला मिळतो.

अन्य उपक्रम

संपादन

वॉर्नर ब्रदर्स' यांनी प्रदर्शित केलेल्या 'ग्लोबल फ्यूजन अल्बम'मध्ये कविता या एकमेव भारतीय सोलो गायिका आहे. त्या बीजिंग सिम्फनी, फेअर फेक्स, बीबीसी रेडिओ, ऑर्केस्ट्रा सिम्फनी, अशा अनेक बँडसोबतही गातात.

आदि शंकराचार्याच्या रचनांना सुब्रमण्यम यांनी संगीत दिले आहे आणि त्या रचना कविताच्या आवाजात आहेत. त्या दोघांचा 'आदि गणेश' हा अल्बमही निघाला आहे.

कौटुंबिक जीवन

संपादन

कविता कृष्णमूर्ती यांचा मोठा मुलगा नारायण डॉक्टर झाला आहे. मुलगी बिंदू गीतकार असून बऱ्यापैकी गाते. धाकटा अम्बी व्हायोलिन वाजवतो. त्याच्या वडिलांकडूनच तो शिकला आहे आणि आता तो त्यांच्याबरोबर व्हायोलिनवादनाची जुगलबंदीही करतो.

पुरस्कार

संपादन

कविता कृष्णमूर्ती यांना इ.स. १९९४-१९९६ या काळातील सलग तीन पारितोषिकांसह चार वेळा पार्श्वगायिकेसाठीचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून इ.स. २००६ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. पहिला पुरस्कार '१९४२ ए लव्ह स्टोरी' या चित्रपटासाठी 'प्यार हुआ चुपके से, ये क्या हुआ चुपके से ’ या गाण्यासाठी मिळाला होता.

विवाहानंतरचा पुरस्कार 'देवदास' चित्रपटातल्या 'डोला रे डोला' या गाण्यासाठी मिळाला,

बाह्य दुवे

संपादन