अनुराधा पौडवाल

भारतीय मराठी गायिका

अनुराधा पौडवाल , माहेरच्या अलका नाडकर्णी ( मुंबई, ऑक्टोबर २७, इ.स. १९५४ - हयात) या मराठी गायिका आहेत. यांनी मराठीसह हिंदी, तमिळ, उडिया, नेपाळी इत्यादी भाषांतील चित्रपटांतूनही[ संदर्भ हवा ] पार्श्वगायन केले आहे. इ.स. १९७३ सालच्या अभिमान नावाच्या हिंदी चित्रपटातील एका संस्कृत श्लोकाच्या गायनातून यांचे पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण झाले. त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या यशोदा या मराठी चित्रपटाद्वारे प्रमुख पार्श्वगायिकेच्या रूपात त्‍यांची कला प्रथमच श्रोत्यांसमोर आली. तेव्हापासून आतापावेतो सुमारे चार दशके चित्रपटगीते, भावगीते व भजनांच्या ध्वनिमुद्रिकांच्या माध्यमांतून या गायन करीत आहेत.

अनुराधा पौडवाल

अनुराधा पौडवाल
आयुष्य
जन्म २७ ऑक्टोबर, इ.स. १९५४
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
देश भारत
भाषा मराठी (स्वभाषा, गायन)
हिंदी भाषा (गायन)
पारिवारिक माहिती
जोडीदार अरुण पौडवाल
संगीत साधना
गायन प्रकार गायन, भजन
संगीत कारकीर्द
पेशा गायकी
कारकिर्दीचा काळ इ.स. १९७३ पासून - चालू

दिवंगत संगीतकार अरुण पौडवाल हे अनुराधा यांचे पती होते. गायिका कविता पौडवाल या त्यांच्या कन्या आणि आदित्य पौडवाल हे सुपुत्र.

अनुराधा पौडवाल या गीत गायनामधून त्यांना मिळालेल्या पैशांचा उपयोग युद्धात मरण पावलेल्या सैनिकांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी, गरिबांच्या घरांना विजेची जोडणी करून देण्यासाठी आणि कुपोषणाच्या समस्येचे अल्पतः निवारण करण्यासाठी करतात. इंग्लंडमधील इंडो-ब्रिटिश अाॅल पार्टी या संसदीय गटाने इंग्लंडच्या संसदेमध्ये अनुराधा पौडवाल यांचा, त्यांच्या संगीत कारकीर्दीबद्दल आणि समाजकार्याबद्दल गौरव केला.. (८-७-२०१८)

पुरस्कार

संपादन
 
भारताचे तत्कालीन राष्ट्रपती श्री.प्रणव मुखर्जी अनुराधा पौडवाल यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करताना, राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली, ३० मार्च २०१७
  • इंडिया इंटरनॅशनल सुवर्ण पुरस्कार आणि सुवर्ण पदक (१९९४)
  • अनिवासी भारतीयांतर्फे नटराज पुरस्कार
  • भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार (२०१७)
  • डॉ. रामचंद्र पारनेरकर स्मृती पुरस्कार (२०१४)
  • अप्सरा फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्यूसर्स गिल्ड पुरस्कार (२००४) : ’पाप’ मधील ’इंतेज़ार’ या गीतासाठी.
  • मदर टेरेसा जीवनगौरव पुरस्कार (२०११)
  • मध्य प्रदेश सरकारचा महांकाल पुरस्कार (२००४)
  • महाराष्ट्र सरकारचा चित्रपट पुरस्कार (१९९०)
  • महाराष्ट्र सरकारचा महंमद रफी पुरस्कार (२०१३)
  • राष्ट्रपतींच्या पत्‍नी विमल शर्मा यांच्याकडून महिला शिरोमणी पुरस्कार (१९९३)
  • शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार (२०१७)
  • राष्ट्राध्यक्ष वेंकट रामन यांच्या हस्ते मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार (१९९०)
  • लता मंगेशकर पुरस्कार (२०१०)
  • मध्य प्रदेश सरकारचा सम्राट विक्रमादित्य पुरस्कार (२०१२)
  • राजीव गांधी यांचे हस्ते मिळालेला सिटिझन पुरस्कार (१९८९)
  • भक्तिसंगीताबद्दल सूरमयी पुरस्कार
  • तीन सूर-सिगार पुरस्कार

अनुराधा पौडवाल यांना मिळालेले महोत्सवी पुरस्कार

संपादन
  • राष्ट्रीय चित्रपट महोत्सवातला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार (१९८९) : ’कळत नकळत’मधील हे एक रेशमी या गीतासाठी.
  • फिल्मफेअर महोत्सवातला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार (१९८६) : मेरे मन बाजो मृदंग या ’उत्सव’ मधील चित्रपटगीतासाठी
  • फिल्मफेर महोत्सवातला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार (१९९१) : नज़र के सामने या ’आशिकी’मधील गीतासाठी
  • फिल्मफेअर महोत्सवातला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार (१९९२) : ’दिल हैं की मानता नहीं’ चित्रपटातील याच मुखड्याच्या गीतासाठी
  • फिल्मफेर महोत्सवातला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार (१९९३) : ’बेटा’ चित्रपटातील ’धक धक करने लगा’ या गीतासाठी

बाह्य दुवे

संपादन
  • "अनुराधा पौडवाल यांनी गायलेली गाणी".
  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील अनुराधा पौडवाल चे पान (इंग्लिश मजकूर)