विष्णु नरहरी खोडके
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
विष्णू नरहरी खोडके (२ मार्च १९०० – ४ मार्च १९५९) हे भारतीय वकील व राजकारणी होते. ते ब्रिटिश राजवटीच्या काळातील महाड शहर व कुलाबा जिल्हा (आजचा रायगड जिल्हा) परिसरातले होते. त्यांनी महाडच्या राजकिय, वकीली व सामाजिक क्षेत्रांत योगदान दिले आहे. त्यांना खोडके वकील म्हणूनही ओळखत जाते. खोडके हे महाड नगरपालिकेचे अध्यक्षपदी इ.स. १९३१-१९४७ या कालावधित कार्यरत होते.[ संदर्भ हवा ]
विष्णू नरहरी खोडके | |
---|---|
जन्म |
२ मार्च १९०० महाड |
मृत्यू |
४ मार्च, १९५९ (वय ५९) महाड |
निवासस्थान | २३६४ (अ) नवीपेठ, महाड |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
टोपणनावे | खोडके वकील, अण्णा |
शिक्षण | बि.ए., एल.एल.बी. |
पेशा | वकील, राजकारण |
कारकिर्दीचा काळ | इ.स. १९२५ - १९५६ |
प्रसिद्ध कामे | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मानपत्र देऊन सन्मान. |
उंची | ५'.४" |
ख्याती | महाड नगरपालिका अध्यक्ष (प्रथम नगराध्यक्ष) महाड |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
धर्म | हिंदू |
अपत्ये | पुरुषोत्तम (भाई) विष्णू खोडके |
वडील | नरहरी तात्याबा खोडके |
महाडच्या मूलभूत विकासाचे आद्यपुरुष, |
प्रारंभिक जीवन व शिक्षण
संपादनखोडके यांचा जन्म इ.स. २ मार्च १९०० रोजी कुलाबा जिल्यातील (आजचा रायगड) महाड येथे झाला. त्यांचे वडील नरहरी तात्याबा खोडके हे महाड मधील ड्रायफ्रूट्स व मसाले व्यापारी होते.[ संदर्भ हवा ]
खोडके यांचे प्राथमिक शिक्षण महाड मधे झाले. जॉन एल्फिन्स्टन हायस्कुल, अलिबाग मधून ते मॅट्रिक झाले. उच्च शिक्षणासाठी मुंबईला जाऊन विल्सन कॉलेज, मुंबई मधून १९२१ मधे त्यांनी बी.ए.(ऑनर्स) पदवी मिळवली.[ संदर्भ हवा ] गवर्नमेंट लॉ स्कूल, मुंबई येथुन १९२४ मधे एल.एल.बी. पदवी प्राप्त केली.[१]
इसवी सन १९२६ च्या "बॉम्बे युनिवर्सिटी कॅलेंडर" या पुस्तकात बुद्धिमान विद्यार्थी म्हणुन खोडके यांचा उल्लेख केला गेला होता.[२]
कारकीर्द
संपादनया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ॲड.खोडके यांनी १९२६ पासून महाड़ न्यायालय व कुलाबा जिल्हा न्यायालय ,अलिबाग मध्ये वकील म्हणुन कारकीर्द सुरू केली.आपल्या हुशारिने काही अवघड खटले जिंकुन थोड्याच अवधित ते महाड कुलाबा परिसरातले निष्णात वकील बनले.कोर्टात न्यायाधिशांसमोर खटल्याचे मुद्देसुद सादरीकरण व धाडसी वक्तृत्व शैली ही ॲड. खोडके यांची वैशिष्ट्ये होती.[ संदर्भ हवा ]
१९२९ मधे एक बहुचर्चित खटला जिंकणे त्यांच्या कारकीर्दितील मैलाचा दगड ठरला.ॲड.खोडके यांनी जंजिरा संस्थानचे नवाब मोहम्मद खान (दुसरे) यांच्या विरुद्ध एका गरिब शेतकऱ्याच्या बाजुने खटला जिंकला होता. [ संदर्भ हवा ]
याच दरम्यान त्यांनी काँग्रेस मधे प्रवेश केला.वकीली क्षेत्रात दबदबा व महाडच्या राजकिय क्षेत्रात प्रभावी कामगिरी यामुळे १९३१ मधे त्यांना महाड काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष (प्रेसिडेंट) म्हणुन निवडले गेले.[१]
त्यांच्या नेतृत्वाखाली १९३१ च्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले व ॲड.खोडके यांना महाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष (प्रेसिडेंट) म्हणुन निवडले गेलेे.त्यांनी हे पद १९४७ पर्यंत भुषविले.[१]
हि दोन्ही पदे भुषविताना खोडके वकील यांनी काँग्रेसची धोरणे व स्वातंत्र्य आंदोलने महाड मधे यशस्वी पणे राबविली.[ संदर्भ हवा ]
खोडके हे शिंपी समाजात जन्मले होते. सदर समाजाच्या नामदेव शिंपी समाज संस्थाचे अध्यक्ष पद त्यांनी भूषवले होते.[१]
खोडके यांना महाडच्या विकासाचे आद्यपुरूष मानले जाते. महाडमधे त्यांनी जल पुरवठा योजना,नवीन रस्ते,पथ दिवे योजना,वीज यांसारख्या मूलभूत सुधारणा करून महाडकरांसाठी इतर ही उपयोगी योजना राबविल्या.तसेच महाड शहराला पाणीपुरवठा करण्याऱ्या कुर्ला धरणाचे अंदाजपत्रक शासन दरबारी सादर करून ते धरण व्हावे ह्यासाठी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना काहीच वर्षात यश प्राप्त झाले. तसेच शहरातील पथदिव्याची जोडणी प्रथम महाडमध्ये आणली. महाड शहराच्या विकासाला प्रथमच चालना मिळवुन दिली.[ संदर्भ हवा ]
एक ख्यातनाम वकील,महाड़ नगरपालिकेचे नगराध्यक्ष (प्रेसिडेंट),महाड़ काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, नामदेव शिंपी समाज संस्थेचे अध्यक्ष ही पदे भूषविताना त्यांनी राजकिय,वकीली व सामाजिक क्षेत्रांत केलेल्या अष्टपैलू कार्यामुळे, खोडके यांचे नाव ब्रिटिशां कडुन १९४१ सालच्या"हूज हू इन इंडिया,बर्मा एंंड सिलोन" (Who's Who in India Burma and Ceylon-1941) या पुस्तकात सामिल केले गेले.[१] "हूज हू" ही जगभरातील उल्लेखनीय व्यक्तींची माहिती प्रकाशित करणारी पुस्तक श्रृंखला आहे.
खोडके यांनी दोन मराठी पुस्तके लिहिली होती.
डॉ. आंबेडकरांना मानपत्र
संपादनमहाड काँग्रेस कमिटी व महाड नगरपालिकेचे अध्यक्ष असल्याने महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते.[१] १९२७ च्या चवदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती दहन या घटनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाड मध्ये येत असत, कारण महाड हे दलितांसाठीच्या आंदोलनांचे एक केंद्र बनले होते. १९ मार्च १९४० रोजी खोडके यांनी महाड नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणुन डॉ. आंबेडकर यांच्या सन्मानार्थ जाहिर कार्यक्रम आयोजित करून डॉ. आंबेडकरांना "मानपत्र" देऊन गौरविले. डॉ. आंबेडकर यांनी उत्तरादाखल एक भाषण केले.[५] खोडके यांनी दिलेले हे मानपत्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण महाराष्ट्र सरकार कडुन प्रकाशित डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे "खंड १८, भाग २ या मध्ये उल्लेख केले गेले आहे.[६]
वैयक्तिक जीवन
संपादनखोडके यांचे कुटुंब एक व्यापारी व जमिनदार कुटुंब होते, इ.स. १५५० मधे सदाशिव राव खोडके हे व्यापारासाठी पैठण येथुन महाडमधे स्थानिक झाले, तेंव्हा महाड हे कोकणातील एक प्रमुख बंदर व व्यापारी केंद्र होते. पोर्तुगीज, इंग्रज, अरब, तुर्की इ. विदेशी व्यापारी कोकणात येत असत. त्यांच्यासोबत खोडके कुटुंबाचा ड्रायफ्रूट्स, मसाले व कापड यांचा व्यापार चाले. विष्णू खोडके यांचे वडील नरहरी तात्याबा खोडके हे महाड मध्ये परंपरागत सुकामेवा व मसाल्याचा व्यापार करत असत. ते ज्योतिषी सुद्धा होते. विष्णू खोडके यांचा विवाह नर्मदाबाई खोडके यांच्याशी १९३४ मधे झाला.[ संदर्भ हवा ] त्यांचा मुलगा पुरुषोत्तम विष्णू खोडके. विष्णू खोडके वकीलांच्या अष्टपैलूत्वाचा वारसा त्यांचे वारस सुद्धा चालवत आहेत, मुलगा पुरुषोत्तम खोडके हे तेव्हाच्या सरकारमान्य भात भरडणी गिरणीचे तसेच मसाला मिलची मालक होते. त्यामुळे महाड शहरात गिरणवाले खोडके म्हणून ख्यातनाम होते. पत्नी सुशिला खोडके या महाड मधील राजकिय व सामाजिक नेत्या होत्या आणि महाड शहराच्या प्रथम महिला नगरसेविका होण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता.[ संदर्भ हवा ]
निधन व सन्मान
संपादनखोडके यांनी १९५७ मध्ये प्रकृती अस्वास्थ्य मुळे वकीली करणे बंद केले. ४ मार्च १९५९ रोजी त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या स्मृतीस स्मरून महाड नगर परिषदेच्या वतीने मानपत्राचे चित्र चवदार तळे येथील राष्ट्रीय स्मारकात लावण्यात आले आहे.[ संदर्भ हवा ]
संदर्भ
संपादन- ^ a b c d e f Who's who in India, Burma & Ceylon (इंग्रजी भाषेत). Who's Who Publishers (India) Limited. 1941.
- ^ Bombay, University of (1926). The Bombay University Calendar (इंग्रजी भाषेत).
- ^ Ganesh, Shankar (1976). Marathi niyatakalikanci suchi. Mumbai Marathi Granthsangrhalaya.
- ^ Ganesh, Shankar (1978). Marathi niyatakalikanci suci. Marathi Granthalaya.
- ^ Ambedkar, Bhimrao Ramji (2010). Dr. Babasaheb Ambedkar, Writings and Speeches: (3 pts.). Ḍô. Bābāsāheba Āmbēdakara lekhana āṇi bhāshaṇe. Education Department, Government of Maharashtra.
- ^ [१]