अवध एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी रेल्वेसेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जाणारी ही गाडी आठवड्यातून ४ वेळा मुंबई ते गोरखपूर दरम्यान तर उर्वरित तीन वेळा मुंबई ते मुझफ्फरपूर दरम्यान धावते. १९०३७/१९०३८ अवध एक्सप्रेस मुंबईच्या वांद्रे टर्मिनस ते गोरखपूरच्या गोरखपूर रेल्वे स्थानकांदरम्यान धावते तर १९०३९/१९०४० अवध एक्सप्रेस वांद्रे टर्मिनस ते बिहारमधील मुझफ्फरपूरच्या मुझफ्फरपूर रेल्वे स्थानकांदरम्यान धावते.

वांद्रे-गोरखपूर अवध एक्सप्रेस
वांद्रे-मुझफ्फरपूर अवध एक्सप्रेस

ऐतिहासिक अवध प्रांतावरून ह्या गाडीचे नाव पडले आहे. ही गाडी सुरत, रतलाम, कोटा, आग्रा, कानपूर, लखनौ ह्या मार्गावरून धावते.

तपशील संपादन

गाडी क्रमांक मार्ग अंतर प्रस्थान आगमन कधी
१९०३७ मुंबई वांद्रे – गोरखपूर १८४५ किमी २२:४० १३:४५ रवि, मंगळ, बुध, शुक्र
१९०३८ गोरखपूर – मुंबई वांद्रे १३:२० ०४:३५ सोम, बुध, शुक्र, शनि


गाडी क्रमांक मार्ग अंतर प्रस्थान आगमन कधी
१९०३८ मुंबई वांद्रे – मुझफ्फरपूर २१५५ किमी २२:४० २१:५० सोम, गुरू, शनि
१९०४० मुझफ्फरपूर – मुंबई वंद्रे ०६:०० ०४:३५ सोम, बुध, शुक्र, शनि

बाह्य दुवे संपादन