अमेरिका ते भारत एकेरी इंजिनच्या विमानाचा एकटा प्रवास
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
सतीशचंद्र सोमण ह्यांनी अमेरिकेहून भारत पर्यंत एकेरी इंजिनच्या विमानाने एकट्याने असा आधी कधीही न झालेला प्रवास केला. केवळ ७४ तासांचा अनुभव आणि त्यातही सर्वात लांब सलग उड्डाण फक्त २ तासांचे ह्या पार्श्वभूमीवर अनेकजण ह्या निर्णयावर आश्चर्यचकित झाले. पण काही लोकांनी मदत केल्याने हा प्रवास जमू शकला. हा प्रवास त्यांनी सेसना १७२ प्रकारच्या विमानातून केला.
सोमण ह्यांनी ह्या प्रवासावर एक इ-पुस्तक [१] प्रकाशित केले आहे. ह्या पुस्तकात त्यांनी तयारी, विमान खरेदी, प्रवास ह्या बद्दल लिहिले आहे.
पूर्वतयारी
संपादनतयारी अर्थातच वैमानिकाचा परवाना मिळवण्यापासून झाली. श्री सोमण ह्यांनी श्रीलंकेतून वैमानिकाचा परवाना मिळवला. हा परवाना आंतरराष्ट्रीय करारांमुळे भारतात वैध असून देखील भारत सरकारच्या दरबारी वैध मानला गेला नाही अगदी ब्रिटिश सरकारने मान्यता देऊन देखील. हा पहिला सरकारी अडथळा ठरला. रीतसर परीक्षा देऊन मग त्यांनी हा भारतीय परवाना मिळवला.
पुढे श्री सोमण अमेरिकेस गेले, जिथे त्यांना एक मित्र डॉन हरबर्ट ह्याने खूप मदत केली. शिवाय डेविड किसल नामक व्यक्तीला सहवैमानिक म्हणून घेऊन जावे अशी व्यवस्था देखील केली. पण ह्यात त्यांना जो कटू अनुभव आला तो त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिला आहे. बेल एविएशन कंपनी, कोलंबिया, साऊथ कॅरोलिना येथून त्यांनी ते विमान दिनांक १२ मे १९९४ रोजी खरेदी केले. कर्मधर्मसंयोगाने त्याच कंपनीच्या लंडन येथील शाखेतून विजयपत सिंघानिया यांनी देखील एक विमान घेतले. ह्या विमानाने सिंघानिया ह्यांनी लंडन ते मुंबई असा प्रवास केला. हा देखील पहिलाच यशस्वी प्रयत्न ठरला.
अमेरिकन मानसिकतेमुळे आणि व्यवस्थांमुळे त्यांना तयारीला खूप चांगली मदत झाली. सोमण उड्डाणाचा मार्ग तयार करायला लागले ज्यात वाटेतील भूस्तराची उंची, हवामान, विमानातील इंधन, वाऱ्यांचे वेग, काही आणीबाणी उद्भवल्यास घ्यावयायाच्या काळज्या, वाटेतील मार्गदर्शनाची साधने, रेडिओ संपर्काची यंत्रणा वगैरे बाबींचा अभ्यास आणि इतर काही आकडेमोड करावी लागते. हे काम करत असता एकाने त्यांना विमानतळावरील मोफत सोयीचा उपयोग शिकवला. ह्या संगणकीय प्रणालीने त्यांना ते सर्व लक्षात घेऊन एक मार्ग आखून दिला.
शिवाय प्रवासासाठी विमानात काही बदल केले गेले जसे कि:
- मागच्या सीट्स काढून जहाजाने भारतात पाठवणे. त्या जागी अतिरिक्त इंधनाच्या टाक्या बसवणे. अशाने इंधन क्षमता १६० लिटर वरून ४०० लिटर पर्यंत वाढविली
- अशी टाकी पूर्णपणे गळतीपासून मुक्त अशी तपासून घेणे आणि मगच विमानात बसवणे
- ह्या टाकीतल्या इंधनाच्या वाफा आत न राहता बाहेर जातील अशी व्यवस्था करणे
- ह्या टाकी साठी वेगळा पंप व विजेरी लावणे
- रेडिओ बसवणे व त्यासाठी विजेरी आणि अँटेना बसवणे
- इंजिनला सिलिंडरहेड तापमापक आणि एक्झॉस्ट गॅस तापमापक बसवणे
- होकायंत्र दुरुस्त करणे
- आणि सरते शेवटी अमेरिकन अधिकाऱ्यास दाखवून त्याची फेरबदलास मंजूरी घेणे
प्रवास
संपादनअसा हा विक्रमी प्रवास दिनांक १ जून १९९४ रोजी सुरू करून खालील तक्त्यानुसार केला गेला.
दिनांक | पासून | अंतर (कि. मी.) | पर्यंत | अक्षांश, रेखांश |
---|---|---|---|---|
पूर्वतयारी (एकूण प्रवास ९५२ कि.मी.) | ||||
१३ मे १९९४ | कोलंबिया, अमेरिका | ६८५ | डेटन, अमेरिका | 39°35'37.1"N 84°13'41.0"W |
१३ मे १९९४ | डेटन, अमेरिका | १९१ | फॉस्टोरिया, अमेरिका | 41°11'23.3"N 83°23'49.0"W |
१ जून १९९४ | फॉस्टोरिया, अमेरिका | १९ | टिफीन, अमेरिका | 41°05'54.7"N 83°12'26.1"W |
१ जून १९९४ | टिफीन, अमेरिका | ५७ | टोलीडो, अमेरिका | 41°35'16.5"N 83°48'33.2"W |
पहिला टप्पा (एकूण प्रवास ५,१५० कि.मी.) | ||||
१ जून १९९४ | टोलीडो, अमेरिका | ४०६ | टोरोंटो, कॅनडा | 43°37'42.0"N 79°23'48.0"W |
१ जून १९९४ | टोरोंटो, कॅनडा | २३३ | किंग्सटन , कॅनडा | 44°13'25.2"N 76°35'58.0"W |
२ जून १९९४ | किंग्सटन , कॅनडा | ८३० | फ्रेडरीकटन, कॅनडा | 45°53'42.0"N 66°25'06.0"W |
२ जून १९९४ | फ्रेडरीकटन, कॅनडा | ५१३ | सिडने, कॅनडा | 46°10'01.7"N 60°02'47.4"W |
३ जून १९९४ | सिडने, कॅनडा | ५६७ | सेंटजॉन, कॅनडा | 47°37'16.4"N 52°44'32.7"W |
५ जून १९९४ | सेंटजॉन, कॅनडा | २,००८ | फ्लोरेस बेट, पोर्तुगाल | 39°27'33.7"N 31°07'52.7"W |
६ जून १९९४ | फ्लोरेस बेट, पोर्तुगाल | ५९३ | सांता मरीआ, पोर्तुगाल | 36°58'19.6"N 25°09'53.8"W |
दुसरा टप्पा (एकूण प्रवास १०,७९५ कि.मी.) | ||||
८ जुलै १९९४ | सांता मरीआ, पोर्तुगाल | १,५६१ | पोर्टो, पोर्तुगाल | 41°14'13.3"N 8°40'14.2"W |
९ जुलै १९९४ | पोर्टो, पोर्तुगाल | १,६७८ | कॅगलिआरी, इटली | 39°15'04.0"N 9°03'20.4"E |
१० जुलै १९९४ | कॅगलीआरी, इटली | ५३९ | माल्टा | 35°51'14.8"N 14°28'59.8"E |
११ जुलै १९९४ | माल्टा | १,५७० | 31°11'32.3"N 29°57'11.0"E | |
१२ जुलै १९९४ | अलेक्झांड्रिया, इजिप्त | ७०२ | लक्झोर, इजिप्त | 25°40'25.9"N 32°42'05.4"E |
१३ जुलै १९९४ | लक्झोर, इजिप्त | १,८०६ | बहरीन | 26°16'11.3"N 50°37'33.7"E |
१५ जुलै १९९४ | बहरीन | १,६७६ | कराची, पाकिस्तान | 24°54′24″N 67°09′39″E |
१८ जुलै १९९४ | कराची, पाकिस्तान | १,२६३ | नवी दिल्ली, भारत | 28°34′07″N 077°06′44″E |
असा हा एकूण १६, ८९७ कि. मी. अंतराचा प्रवास झाला.
ह्या प्रवासातील काही उल्लेखनीय घटना / बाबी खालील प्रमाणे:
- अमेरिकेतील फॉस्टोरिया ह्या साधारण २५ ते ३० हजार वस्तीच्या गावात देखील धावपट्टीचे दिवे वैमानिकाने विमानातून चालू करायची व्यवस्था होती. अशी व्यवस्था भारतातील मुंबई सारख्या मोठ्या शहरात नव्हती.
- कॅनडातल्या आप्रवास अधिकाऱ्याने हवामान बदलामुळे जास्त दिवस रहायला लागु शकेल असा अंदाज वर्तवला. शिवाय मागणी न करता देतानाच १५ दिवसांचा व्हिसा प्रदान केला. गरज पडल्यास संपर्क कर असे सांगून स्वताःचा दूरध्वनी क्रमांक देखील दिला.
- फ्लोरेस बेटावर आणीबाणीच्या स्थितीत उतरावे लागले.
- सांता मारिआ बेटावर विमानातील दोन भाग बिघडल्याने आणि ते अमेरिकेतून येण्यास वेळ लागणार असल्या कारणाने प्रवास खंडित करून भारतात यावे लागले. ह्यावेळेस डेविड किसल व रॉजर गुड ह्या दोघांनी असहायतेचा फायदा करून घ्यायचा प्रयत्न केला. त्यांना पुणेरी माणूस पुरून उरला व स्वतःची सुटका करून घेतली.
- घाईत निघताना बेटावर भाड्याने वापरायला घेतलेल्या गाडीची चावी खिशातच राहिली. ही चावी पुढील टप्प्यावर पोर्टो शहरातील त्याच कंपनीच्या कार्यालयात परत केली. कार्यालयात चावी घेताना अजिबात कुरबुर न करता पुन्हा आमच्याच कंपनीची गाडी घ्या अशी त्या कंपनीने विनंती पण केली.
- कॅगलिआरी, इटली येथे सत्याग्रह करायची वेळ आली. तेथे इटालियन हवाई अधिकारी आणि इटालियन आप्रवास अधिकारी ह्यांच्यात मतभेद झाल्याने त्यांच्यातच मोठा वाद झाला. मूलतः हा आप्रवास अधिकारी हे मानत नव्हता कि संक्रमण करण्याऱ्या वैमानिक आणि इतर कर्मचारी वर्गाला व्हिसाची गरज नसते. हा एक आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त प्रघात आहे.
- लक्झोर ते बहारीन ह्या प्रवासात हवेतील प्रक्षुब्धता प्रचंड जास्त असल्याने छोटे विमान खूप झोके घेत होते. शिवाय अरबस्तानातील वाळूच्या वादळामुळे विमानात बारीक वाळू येऊन त्याचा त्रास असह्य होत होता.
- शेवटच्या टप्प्यावर येताना पाकिस्तानात कशी वागणूक मिळेल ही भीती मात्र अगदी फोल ठरली. शॉन ग्रुपचे मालक अथेर ह्यांच्या कडे असेच सेसना १७२ विमान होते. त्यांनी सोमणांचे कौतुक करताना आपण स्वतः हा प्रयत्न कसा अर्धवट सोडला त्याचा अनुभव सांगितला. शिवाय अथेर ह्यांनी बिघडलेला मॅग्नेटो बदलून तर दिलाच पण व्हिसा उल्लंघन होऊ नये म्हणून एक गैर-कायदेशीर युक्ती देखील केली.
- पाकिस्तानातून निघून अहमदाबाद, उदयपूर, जयपूर मार्गे श्री सोमण दिल्लीत दाखल झाले.
- दिल्लीत दुसरा सरकारी दणका मिळाला, विमानातील राखीव म्हणून आणलेले वंगण तसेच टाकीतील इंधन ह्याच्यावर देखील आयात शुल्क भरायला लागले. आयातीची परवानगी फक्त विमानाला होती, इंधन आणि वंगणाला नव्हती.
- आणि शेवटी अमेरिकन विमानाचे भारतीय नामकरण झाले.
सत्कार
संपादनह्या साहसाचे अनेक जणांकडून कौतुक करण्यात आले. शिवाय अनेक ठिकाणी सत्कार झाले. शिवाय भारतभर पसरलेल्या अनेक वृत्तपत्रांमध्ये दखल घेण्यात आली, ही यादी पुस्तकात आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स[२] मध्ये देखील ह्या प्रवासाची नोंद करण्यात आली आहे.