आगरताळा
त्रिपुरा राज्याची राजधानी
(अगरताला या पानावरून पुनर्निर्देशित)
आगरताळा (बांग्ला: আগরতলা) ही भारत देशाच्या त्रिपुरा राज्याची राजधानी सर्वात मोठे शहर आहे. २०११ साली ४ लाख लोकसंख्या असलेले आगरताळा गुवाहाटी व इंफाळ खालोखाल ईशान्य भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. आगरताळा त्रिपुराच्या पश्चिम भागात भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमेपासून २ किमी अंतरावर वसले आहे.
आगरताळा আগরতলা |
|
भारतामधील शहर | |
देश | भारत |
राज्य | त्रिपुरा |
जिल्हा | पश्चिम त्रिपुरा |
क्षेत्रफळ | ७६.५ चौ. किमी (२९.५ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७५ फूट (२३ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ४,००,००४ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
agartalacity.nic.in |
आगरताळा रेल्वे स्थानक हे रेल्वे स्थानक चालू झाल्यानंतर रेल्वेने जोडले गेलेले आगरताळा हे ईशान्य भारतातील दुसरेच राजधानीचे शहर ठरले. आजच्या घडीला येथून दिल्ली व कोलकाता शहरांसाठी थेट गाड्या सुटतात. आगरताळा विमानतळ हा शहरापासून ५ किमी अंतरावर असून येथे एर इंडिया, इंडिगो इत्यादी अनेक प्रमुख विमान वाहतूक कंपन्या प्रवासी सेवा पुरवतात.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत