अंधेरी मेट्रो स्थानक
अंधेरी हे मुंबई मेट्रोच्या मार्ग १ वरील एक स्थानक आहे. हे स्थानक अंधेरी उपनगराच्या पूर्व भागात आधीच असलेल्या उपनगरी गाड्याच्या अंधेरी रेल्वे स्थानकाच्या जवळच आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन ८ जून २०१४ रोजी झाले. अंधेरी हे मेट्रोवरील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. मुंबई उपनगरी रेल्वेचे पश्चिम व हार्बर हे दोन्ही मार्ग अंधेरीमधून जातात. ह्यामुळे अंधेरी मेट्रो स्थानक प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा वाहतूक दुवा बनले आहे.
अंधेरी मुंबई मेट्रो स्थानक | |||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
स्थानक प्रवेशद्वार | |||||||||||
स्थानक तपशील | |||||||||||
पत्ता | अंधेरी (पूर्व), मुंबई | ||||||||||
गुणक | 19°07′15″N 72°50′54″E / 19.12083°N 72.84833°E | ||||||||||
मार्ग | मार्ग १ | ||||||||||
इतर माहिती | |||||||||||
मालकी | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण | ||||||||||
चालक | मुंबई मेट्रो वन प्रा. लि. | ||||||||||
सेवा | |||||||||||
|