२०२४ आशियाई पुरुष हॉकी चॅम्पियन्स चषक (प्रायोजकत्वाच्या कारणास्तव अधिकृतपणे हिरो आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी मोकी, चीन २०२४) ही पुरुषांच्या आशियाई चॅम्पियन्स चषकाची ८ वी आवृत्ती आहे. सदर हॉकी स्पर्धेत सहा सर्वोत्कृष्ट आशियाई राष्ट्रीय संघांचा समावेश आहे आणि ही स्पर्धा आशियाई हॉकी महासंघाद्वारे आयोजित केली जाते.[१][२] ही स्पर्धा ८ ते १७ सप्टेंबर २०२४ दरम्यान चीनमधील हुलुनबुर येथे आयोजित केली जात आहे.[३]भारत गतविजेता आहे.[४]