२०२२ ऑस्ट्रेलियन ओपन
२०२२ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन खुल्या टेनिस स्पर्धेची ११०वी आवृत्ती होती. दरवर्षी प्रमाणे ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया देशाच्या मेलबर्न येथे भरवण्यात आली. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी प्रकरांमध्ये पुरुष व महिलांसाठी खेळ आयोजित करण्यात आले होते.
२०२२ ऑस्ट्रेलियन ओपन | ||||||
---|---|---|---|---|---|---|
वर्ष: | ११० वी खुल्या काळामधील ५४ वी | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
रफायेल नदाल | ||||||
महिला एकेरी | ||||||
ॲशली बार्टी | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
निक कीरियोस / थानासी कोक्किनाकिस | ||||||
महिला दुहेरी | ||||||
बार्बोरा क्रेचिकोव्हा / कातेरिना सिनियाकोव्हा | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
क्रिस्तिना म्लादेनोविच / इव्हान दोदिग | ||||||
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
| ||||||
२०२२ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
पुरुष एकेरीमधील गतविजेता नोव्हाक जोकोविच ह्याने कोव्हिड-१९ रोगाच्या साथीची प्रतिबंधक लस टोचून घेण्यास नकार दिल्यामुळे त्याला २०२२ ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये खेळण्यास मनाई करण्यात आली. महिलांमधील गतविजेती नाओमी ओसाका तिसऱ्या फेरीतच पराभूत झाली.
विजेते
संपादनपुरुष एकेरी
संपादन- रफायेल नदालने दानिल मेदवेदेव्हचा 2–6, 6–7(5–7), 6–4, 6–4, 7–5 असा पराभव केला. ह्या विजयाबरोबरच नदालने २१ वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम करून ह्या शर्यतीत नोव्हाक जोकोविच व रॉजर फेडरर ह्या दोघांना मागे टाकले.
महिला एकेरी
संपादन- ॲशली बार्टीने डॅनियेल कॉलिन्सचा 6–3, 7–6(7–2) असा पराभव केला.