होर्मोज्गान प्रांत

होर्मोज्गान प्रांत (फारसी: استان هرمزگان , ओस्तान-ए-होर्मोज्गान) हा इराणच्या ३१ प्रांतांपैकी एक प्रांत आहे. हा प्रांत देशाच्या दक्षिणेस इराणाच्या आखाताच्या किनारी वसला आहे. याच्या समोर आखाताच्या पलीकडील किनाऱ्यावर संयुक्त अरब अमिरातीओमान या देशांच्या सीमा असून पश्चिमेस बुषर, वायव्येस फार्स, उत्तरेस केर्मान, पूर्वेस सिस्तान व बलुचिस्तान या इराणाच्या प्रांतांच्या सीमा भिडल्या आहेत. बंदर अब्बास हे याचे राजधानीचे शहर आहे.

होर्मोझ्गान प्रांत
استان هرمزگان
इराणचा प्रांत

होर्मोझ्गान प्रांतचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
होर्मोझ्गान प्रांतचे इराण देशामधील स्थान
देश इराण ध्वज इराण
राजधानी बंदर अब्बास
क्षेत्रफळ ७०,६९७ चौ. किमी (२७,२९६ चौ. मैल)
लोकसंख्या १४,०३,६७४
घनता २० /चौ. किमी (५२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IR-22

बाह्य दुवेसंपादन करा

  • "होर्मोज्गान प्रांतपालांच्या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ" (फारसी भाषेत).