फार्स प्रांत
फार्स (फारसी: استان فارس , ओस्तान-ए-फार्स ) हा इराणच्या ३१ प्रांतांपैकी एक प्रांत आहे. इराणचे सांस्कृतिक हृदय मानला जाणारा हा प्रांत देशाच्या दक्षिणांगास असून शिराझ येथे याची राजधानी आहे. भौगोलिक विस्तारानुसार याने १,२२,६०८ वर्ग कि.मी. क्षेत्रफळ व्यापले असून येथे ४५.७ लाख लोकसंख्येची वस्ती आहे. प्रांताच्या एकूण लोकसंख्येपैकी ६१.२ % प्रजा शहरी भागात वसत असून, ३८.१ % प्रजा ग्रामीण भागात वसते, तर ०.७ % प्रजा भटकी आहे.
फार्स استان فارس | |
इराणचा प्रांत | |
फार्सचे इराण देशामधील स्थान | |
देश | इराण |
राजधानी | शिराझ |
क्षेत्रफळ | १,२२,६०८ चौ. किमी (४७,३३९ चौ. मैल) |
लोकसंख्या | ४५,६९,२९२ |
घनता | ३७ /चौ. किमी (९६ /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | IR-07 |
आजच्या फार्स प्रांताचा भूप्रदेश इराणी लोकांचे मूळ वसतिस्थान मानला जातो. फारसी या शब्दाची व्युत्पत्ती याच भूप्रदेशाच्या अभिधानातून झाली आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |