हिमा दास

भारतीय धावपटू


हिमा दास (जन्म :९ जानेवारी, २०००) ही एक भारतीय धावपटू आहे. २०१८ मध्ये फिनलँडमध्ये वर्ल्ड ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी झालेल्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी ती पहिली भारतीय आहे.

हिमा दास
Hima Das Tampere 2018 (cropped).jpg
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव हिमा दास
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान धिंग,नागाव,आसाम
जन्मदिनांक ९ जानेवारी, २००० (2000-01-09) (वय: २२)
खेळ
देश भारत
खेळ मैदानी खेळ
खेळांतर्गत प्रकार ४०० मीटर धावणे
प्रशिक्षक निपुण दास
कामगिरी व किताब
वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी ४०० मीटर: ५०.७९ (२०१८ आशियाई खेळ)

हिमा दासचे टोपणनाव धिंग एक्सप्रेस आहे. तिने जकार्ता, इंडोनेशिया येथे झालेल्या २०१८ आशियाई खेळांमध्ये ५०.७९ सेकंदांच्या वेळेसह ४०० मीटर्समध्ये सध्याचा भारतीय राष्ट्रीय विक्रम केला आहे. IAAF वर्ल्ड U२० चॅम्पियनशिपमध्ये ट्रॅक इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय ऍथलीट आहे. राज्याच्या एकात्मिक क्रीडा धोरणांतर्गत तिची आसाम पोलिसांमध्ये पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सुरुवातीचे जीवनसंपादन करा

हिमा दासचा जन्म आसाम राज्यातील नागाव जिल्ह्यातील धिंगजवळील कंधुलिमारी गावात झाला. तिचे वडील रणजित आणि आई जोनाली हे भातशेती करतात. ती चार भावंडांमध्ये सर्वांत लहान आहे. तिने धिंग पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले.आणि लहान वयात फुटबॉल खेळायला सुरुवात केली. ती आपल्या शाळेत मुलांबरोबर फुटबॉल खेळत असे. तिला फुटबॉलमध्ये कारकीर्द घडवायची होती. पुढे, जवाहर नवोदय विद्यालयाचे शारीरिक शिक्षण प्रशिक्षक श्यामशुल हक यांच्या सूचनेवरून हिमा दासने खेळ बदलला आणि धावपटू म्हणून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. ती कमी व मध्यम अंतराच्या शर्यतींमध्येच भाग घेत असे. श्यामशुल हक यांनी तिचा नागाव स्पोर्ट्‌स असोसिएशनच्या गौरीशंकर रॉय यांच्याशी परिचय करून दिला. हिमा दास नंतर आंतर-जिल्हा स्पर्धेसाठी पात्र ठरली आणि तिने या क्रीडा स्पर्धांत दोन सुवर्ण पदके जिंकली. आसाम सरकारने तिच्या कामगिरीची दखल घेऊन पोलीस उपअधिक्षपदी तिची नियुक्ती केली आहे.[१]

कारकीर्दसंपादन करा

२० वर्षांखालील जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धासंपादन करा

जुलै २०१८ मध्ये फिनलंड येथे झालेल्या २० वर्षांखालील जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत हिमा दासने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले.अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.तिने ५१.४६ सेकंदांची वेळ नोंदवली.या कामगिरीमुळे ती प्रकाशझोतात आली.[२]

२०१८ आशियाई खेळसंपादन करा

४०० मीटर धावणेसंपादन करा

२०१८ साली जकार्ता, इंडोनेशिया येथे भरलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदार्पणातच हिमाने ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक मिळवले. ५०.७९ सेकंदात ही शर्यत पूर्ण करून तिने राष्ट्रीय विक्रम सुद्धा नोंदवला.[३]

४ X ४०० मीटर धावणे मिश्र रीलेसंपादन करा

२०१८ साली जकार्ता, इंडोनेशिया येथे भरलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आलेल्या मिश्र रिले स्पर्धेत हिमा दास, एम.आर.पुवम्मा,मुहम्मद अनस, राजीव आरोकीया यांच्या संघाने रौप्य पदक पटकावले.[१]

४ X ४०० मीटर धावणे महिला रीलेसंपादन करा

२०१८ साली जकार्ता, इंडोनेशिया येथे भरलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिमा दास, एम.आर.पुवम्मा,सरीता गायकवाड,व्ही.के.विस्मया यांच्या संघाने सुवर्णपदक मिळवले.[४]

जुलै २०१९ मधील हिमाचे सुवर्णयशसंपादन करा

 • २ जुलै : पोझनान ॲथलेटिक्स ग्रांप्री, पोलंड - २०० मी. (२३.९५ सेकंद)
 • ७ जुलै : कुत्नो ॲथलेटिक्स स्पर्धा, पोलंड - २०० मी. (२३.९७ से.)
 • १३ जुलै : क्लादनो स्पर्धा, चेक प्रजासत्ताक - २०० मी. (२३.४३ से.)
 • १७ जुलै : टाबोर स्पर्धा, चेक प्रजासत्ताक - २०० मी. (२३.२५ से.)
 • २० जुलै : नोव मेस्टो ग्रांप्री, चेक प्रजासत्ताक - ४०० मी. (५२.०९ सेकंद)[५]

पुरस्कारसंपादन करा

२०१८ मध्ये हिमाला भारत सरकारने अर्जुन पुरस्कार दिला.[६]

संदर्भसंपादन करा

 1. ^ https://kheliyad.com/farrata-runner-hima-das-made-dsp/
 2. ^ टीम, एबीपी माझा वेब. "भारतीय धावपटू हिमा दासचा जागतिक स्पर्धेत 'सुवर्ण'विक्रम". 2018-09-02 रोजी पाहिले.
 3. ^ "Asian Games 2018 : भारतीय धावपटूंची 'सुवर्ण'संधी हुकली; हिमा दास, मोहम्मद अनास, द्युतीचंदला रौप्य". Loksatta. 2018-08-26. 2018-08-27 रोजी पाहिले.
 4. ^ "Asian Games 2018 : भारतीय महिलांची सोनेरी कामगिरी, रिलेमध्ये मिळवले सुवर्णपदक". Loksatta. 2018-08-30. 2018-09-02 रोजी पाहिले.
 5. ^ saamana.com. "हिमा दासची घोडदौड सुरुच; महिनाभरात पटकावले पाचवे सुवर्णपदक | Saamana (सामना)" (इंग्रजी भाषेत). 2019-07-25 रोजी पाहिले.
 6. ^ Desk, The Hindu Net (2018-09-25). "National Sports Awards 2018: full list of winners of Khel Ratna, Arjuna Awards, Dronacharya Awards". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2018-09-26 रोजी पाहिले.