हंसराज गंगाराम अहिर

(हंसराज अहिर या पानावरून पुनर्निर्देशित)

हंसराज गंगाराम अहिर (११ नोव्हेंबर, इ.स. १९५४:नांदेड, महाराष्ट्र - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे लोकसभेवर निवडून गेले आहेत.

हंसराज गंगाराम अहिर

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९
मतदारसंघ चंद्रपूर
विद्यमान
पदग्रहण
१६ मे, इ.स. २०१४
मतदारसंघ चंद्रपूर

केंद्रीय राज्यमंत्री (९-११-२०१४पासून)
कार्यकाळ
इ.स. २००९ – इ.स. २०१४
मतदारसंघ चंद्रपूर
कार्यकाळ
इ.स. २००४ – इ.स. २००९
मतदारसंघ चंद्रपूर
कार्यकाळ
इ.स. १९९९ – इ.स. २००४
मतदारसंघ चंद्रपूर

जन्म ११ नोव्हेंबर, १९५४ (1954-11-11) (वय: ६८)
नांदेड, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी लता हंसराज अहिर
अपत्ये २ मुलगे
निवास चंद्रपूर, महाराष्ट्र
या दिवशी मे २०, २०१४
स्रोत: [http://164.100.47.134/newls/Biography.aspx?mpsno=3640

अहिर यांनी भाजपमध्ये सर्वसाधारण कार्यकर्ते म्हणून राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. यांच्यावर १९८० साली भारतीय जनता युवा मोर्च्याच्या चंद्रपूर शहर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर १९८६मध्ये ते भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य, १९९०साली भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि १९९४साली महाराष्ट्र विधान परिषदेचे सभासद झाले..

१९९६, २००४, २००९ आणि २०१४ सालच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांत ते विजयी झाले.मात्र १९९९ सालच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा झटका बसला.

चेन्‍नईतील प्राइम पॉइंट फाउंडेशननेत्यांना पाच वेळा ’संसदरत्‍न’ पुरस्काराने गौरविले आहे.

१९९८साली महाराष्ट्र गृहनिर्माण तथा क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडाचे) ते सभापती होते.केंद्र सरकारच्या रेल्वे, टेलिफोन, सिंचाई अशाअनेक समित्यांवर त्यांनी काम केले आहे. सद्या ते कोळसा आणिपोलाद मंत्रालयाच्या समित्यांचे सदस्य असून नुकतेच (९ नोव्हेंवर २०१४ रोजी) रसायन व खते या खात्याचे राज्यमंत्री झाले आहेत.

मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकालादरम्यान हंसराज अहिर यांनी कोळसा खाणी वाटपाचा घोटाळा शोधून काढला आणि जाहीर केला. ही अहिर यांची कामगिरी अभूतपूर्व म्हणावी लागेल.