स्वाती कर्वे
डॉ. स्वाती कर्वे या संगीतसमीक्षक आणि लेखिका आहेत.
प्राणिशास्त्रातली आणि कायद्यामधली पदवी घेतल्यानंतर एच.डी.एफ.सी. या गृहकर्ज देणाऱ्या कंपनीमध्ये स्वाती कर्वे नोकरीला होत्या. त्यांच्या संगीताच्या शिक्षणाची सुरुवात त्या शाळेत असतानाच 'गोपाल गायन समाजा'तले गोविंदराव देसाई यांच्याकडे झाली. यानंतर १९८९ ते ९५पर्यंत त्यांचे पुढील संगीताचे शिक्षण शशिकला शिरगोपीकर यांच्याकडे, तर ख्याल गायकीचे शिक्षण (मैफलीचे गाणे) कुमार गंधर्व यांचे शिष्य असलेल्या विजय सरदेशमुख याच्याकडे झाले.
१९९९ नंतर त्यांनी संशोधनासाठी आवश्यक म्हणून संगीतात एम.ए. केले. एम.ए.ला सुवर्णपदक मिळाले, आणि ‘गानहिरा’ या पदवीच्याही त्या मानकरी ठरल्या. यानंतर त्यांना केंद्र सरकारची फेलोशिप मिळाली. तिचा विषय होता ‘संगीताचा मानसिक आरोग्यावर परिणाम’. अशा प्रकारच्या खास प्रयोग करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन निरीक्षण-अभ्यास, त्यामागचे विचार जाणून डोकेदुखी, रक्तदाब, नैराश्य.. अशा आजारांच्या रोग्यांवर स्वतःचे काही नियमित उपचार करून त्यांच्या नोंदी टिपून त्यांनी हा विषय हाताळला. पीएच्.डी.साठी स्त्री गायिकांनी शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीताला काय दिले? हा विषय घेतला. त्यासाठी डॉ. स्वाती कर्वे यांनी गोव्याला व नागपूर, कलकत्ता, दिल्ली, इंदूर, भोपाळ इत्यादी गावांना भेटी दिल्या. वाचनालये आणि ध्वनिमुद्रणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीनेही त्यांच्या प्रवासाचा त्यांना फायदा झाला. स्त्री परिषदांचा इतिहास -इ. स. १८५०-२००० महाराष्ट्राच्या मर्यादेत या पुस्तकाचे संपादन केले आहे.[१]
पुस्तके
संपादन- महाराष्ट्राची संगीत परंपरा
- संगीत
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ कर्वे, स्वाती (२०१५). स्त्री परिषदांचा इतिहास -इ. स. १८५०-२००० महाराष्ट्राच्या मर्यादेत. महाराष्ट्र: अभिजित प्रकाशन. ISBN ९७८-९३-८२२६१-२५-४ Check
|isbn=
value: invalid character (सहाय्य).