स्वाती सु. कर्वे
स्वाती कर्वे याच्याशी गल्लत करू नका.
डॉ. स्वाती सुहास कर्वे या एक मराठी लेखिका आहेत. त्या पुण्याच्या माॅडर्न काॅलेजमध्ये पाच वर्षे मराठीचे अध्यापन करीत होत्या. त्यांची काही पुस्तके त्यांनी 'साहित्यप्रेमी भगिनी मंडळा'च्या 'स्त्री साहित्याचा मागोवा' या संशोधन प्रकल्पाच्या निमित्ताने लिहिली.
स्वाती कर्वे यांनी सकाळ, तरुण भारत ह्या वर्तमानपत्रांत आणि विपुलश्री व राजहंस ग्रंथवेध या मासिकांत लेखमाला लिहिल्या आहेत.
डाॅ. स्वाती कर्वे या एक उत्तम निवेदक आणि सूत्रसंचालक आहेत.
पुस्तके
संपादन- आठवणीतील पुस्तके
- १०१ कर्तृत्त्ववान स्त्रिया
- कलाकार भेटलेले न भेटलेले
- गंधर्वगाथा
- दशावतार सप्तचिरंजीव व पंचकन्या (कलकत्त्याच्या राष्ट्रीय संग्रहालयासाठी निवड)
- दळवींची नाटके : एक अंतर्वेध (१९९३)
- नाटककार दळवी (१९९१, एम.फिल.च्या प्रबंधाचे नाव)
- भारतीय सण आणि उत्सव
- लघुकादंबरीचे साहित्य स्वरूप (१९९६, पीएच.डी.च्या प्रबंधाचा विषय)
- सकाळ : वृत्तपत्र आणि वृत्तपत्र समूह
- सृजनरंग
- सोळा संस्कार : स्वरूप व अन्वयार्थ
- स्त्रियांची शतपत्रे (इ.स. १८५० ते इ.स. १९५०; संपादित) : या संशोधनासाठी स्वाती कर्वे यांना महाराष्ट्र फाऊंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली होती.
- स्त्री-परिषदांचा इतिहास
- स्त्री विकासाचे नवे क्षितिज
- स्त्री विकासाच्या पाऊलखुणा (संपादित)
- हिमालय दर्शन (प्रवास वर्णन)
पुरस्कार
संपादन- आदर्श शिक्षक म्हणून तीन वेळा सन्मानित
- पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे - डॉ. स्वाती कर्वे यांच्या ’लघुकादंबरीचे साहित्यरूप’ या ग्रंथाला, डॉ. ह.वि. इनामदार पुरस्कार.
- 'भारतीय सण आणि उत्सव' या पुस्तकाची कलकत्त्याच्या राष्ट्रीय संग्रहालयासाठी निवड; महाराष्ट्र राज्य खडू-फळा योजनेसाठी निवड)
- 'स्त्री विकासाच्या पाऊलखुणा' या पुस्तकाला महाराष्ट् सरकाराचा उत्तम साहित्यकृती पुरस्कार (२००५)