सुशील कुमार
सुशील कुमार (जन्म मे २६,१९८३) हा एक भारतीय कुस्तीगीर आहे. २०१२ उन्हाळी लंडन ऑलिंपिक खेळात त्याने ६६ किलो फ्रीस्टाईल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. कुस्तीमध्ये रौप्य पदक जिंकणारा तसेच सलग दोन ऑलिंपिक खेळात वैयक्तिक पदक जिंकणारा तो पहिला भारतीय आहे. २०१० मध्ये मॉस्कोत झालेल्या विश्व कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ६६ किलो फ्रीस्टाईल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले तसेच २००८ बीजिंग ऑलिंपिक स्पर्धेत पुरुष फ्रीस्टाइल ६६ कि.ग्रा. विभागात कांस्यपदक पटकावले.[१] कुमारने कझाकस्तानच्या लियोनिद स्पिरिदोनोवला रिपिचेज फेरीत हारवून कांस्यपदक पटकावले.[१] भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रा ने पुरुष १० मीटर एर रायफल मध्ये मिळवलेले सुवर्णपदक तसेच बॉक्सर विजेंदर कुमार ने मिडलवेट प्रकारात मिळवलेले कांस्यपदकानंतरचे हे भारतासाठी बीजिंग स्पर्धेतील हे तिसरे पदक होते. खाशाबा जाधव यांनी १९५२ हेलसिंकी ऑलिंपिक मध्ये मिळवलेल्या कांस्यपदकानंतरचे ऑलिंपिक कुस्तीतील हे पहिलेच पदक आहे.[२] जुलै २००९ मध्ये सुशिल कुमार यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार ह्या पुरस्काराने भारत सरकारने संन्मानित केले.[३]
वैयक्तिक माहिती | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
पूर्ण नाव | सुशील कुमार सोलंकी | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
राष्ट्रीयत्व | भारतीय | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
निवासस्थान | हरयाणा, भारत | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
जन्मदिनांक | २६ मे, १९८३ | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
जन्मस्थान | बाप्रोला, हरयाणा | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
उंची | १६६ सेंटीमीटर (५.४५ फूट) | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
खेळ | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
देश | भारत | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
खेळ | कुस्ती | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
खेळांतर्गत प्रकार | फ्रीस्टाईल कुस्ती | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
माहिती
संपादनसुशील कुमारचा जन्म हरयाणामधिल बाप्रोला खेड्यातील जाट कुटुंबात झाला. कुमारचे वडील दिवान सिंग सोलंकी हे एमटीएनएल मध्ये वाहनचालक म्हणुन कार्यरत होते व आई कमलादेवी गृहिणी आहेत. त्यांना पहेलवान होण्याची स्फुर्ती त्यांचे पहेलवान भाऊ संदिप तसेच वडील जे स्वतः पहेलवान होते यांच्या कडून भेटली. पैशाची कमतरता तसेच, भारतात कुस्तीसाठी खराब प्रशिक्षण सुविधा असल्यामुळे, २००८ ऑलिंपिक स्पर्धेसाठी सुद्धा, त्याच्या कुटूंबाला त्याच्या जेवणाची काळजी घ्यावी लागली.[४][५]
कुमार सध्या भारतीय रेल्वेमध्ये सहाय्यक कमर्शियल मॅनेजर पदावर कार्यरत आहे.[२]
कारकीर्द
संपादनकुमारयांनी कुस्तीचे प्रशिक्षण छत्रसाल मैदानाच्या आखाड्यात वयाच्या १४व्या वर्षी सुरू केले. सुरुवातीला त्यांना भारतीय पहेलवान यशवीर आणि रामफळ, नंतर अर्जुन पुरस्कार विजेते सत्पाल व रेल्वे मधील प्रशिक्षक ग्यान सिंग यांचे मार्गदर्शन लाभले.
२००८ बीजिंग ऑलिंपिक
संपादन२०१० विश्व कुस्ती अजिंक्यपद
संपादनपुरस्कार व मान्यता
संपादनहे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ व दुवे
संपादन- ^ a b "कुमार ला कांस्यपदक". 2008-08-20. 2008-09-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-08-20 रोजी पाहिले.
- ^ a b Masand, Ajai (2008-08-20). "Meet Sushil, the shy guy[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". 2008-09-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-08-21 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
- ^ मेरी कोम, विजेंदर आणि सुशिल यांनी खेळ रत्न (इंग्लिश मजकूर)[मृत दुवा]
- ^ Ganesan, Uthra (2008-08-21). "Najafgarh hails golden bronze boy". 2008-09-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-08-21 रोजी पाहिले.
- ^ "Sushil puts Boprala on wrestling map of the world". 2008-08-20. 2006-04-21 रोजी पाहिले.