सिनसिनाटी/उत्तर केंटकी आंतरराष्ट्रीय विमानतळ
(सिनसिनाटी-नॉर्दर्न ओहायो आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
सिनसिनाटी/उत्तर केंटकी आंतरराष्ट्रीय विमानतळ (इंग्लिश: Cincinnati/Northern Kentucky International Airport; IATA: CVG) हा अमेरिकेच्या सिनसिनाटी शहरामधील विमानतळ आहे. हा विमानतळ केंटकी राज्याच्या उत्तर भागात केंटकी-ओहायो-इंडियाना ह्या तिहेरी सीमेजवळ स्थित आहे.
सिनसिनाटी/उत्तर केंटकी आंतरराष्ट्रीय विमानतळ Cincinnati/Northern Kentucky International Airport | |||
---|---|---|---|
आहसंवि: CGV – आप्रविको: KCVG
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
मालक | केंटन काउंटी एअरपोर्ट बोर्ड | ||
कोण्या शहरास सेवा | सिनसिनाटी महानगर | ||
स्थळ | कॉव्हिंग्टन, केंटकी | ||
हब | डेल्टा एअरलाइन्स स्पिरिट एअरलाइन्स | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ८९६ फू / २७३ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 39°2′56″N 84°40′4″W / 39.04889°N 84.66778°W | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
9/27 | 3,658 | ||
18C/36C | 11,000 | 3,353 | डांबरी/काँक्रीट |
18L/36R | 10,000 | 3,048 | काँक्रीट |
18R/36L | 8,000 | 2,438 | काँक्रीट |
सांख्यिकी (2015) | |||
एकूण प्रवासी (2015) | ६३,१६,३३२ | ||
उड्डाणे (2015) | १,३३,०६८ | ||
स्रोत: [१] |
इ.स. १९४४ साली लष्करी उपयोगासाठी उघडला गेलेला हा विमानतळ १९४७ मध्ये नागरी सेवेसाठी खुला करण्यात आला. डेल्टा एरलाइन्स ह्या प्रमुख विमान वाहतूक कंपनीचा येथे हब आहे. आजच्या घडीला अमेरिकेसह युरोप, कॅनडा इत्यादी भागांतील एकूण ५९ शहरांना येथून प्रवासी सेवा पुरवण्यात येते.
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत