साष्टी बेट

(साष्टी या पानावरून पुनर्निर्देशित)

सालशेत बेट भारताच्या मुंबई शहराचा भाग असलेले बेट आहे. खुद्द मुंबई शहराच्या उत्तरेस असलेला मीरा-भाईंदर हा भाग सालशेत बेटावर आहे. अत्यंत गर्दीची वस्ती असलेल्या या बेटाच्या ६१९ वर्ग किमी प्रदेशात १५ लाख व्यक्ती राहतात. हे बेट तसेच आसपासच्या छोट्या बेटांचा समूह साष्टी बेटे या नावांनीही ओळखला जातो

इतिहास

संपादन

या बेटांच्या नावाची व्युत्पत्ती 'सा + अष्ट (८)' अशा अंकसूचक नावाने झाली असल्याचे मानले जाते.

भूगोल

संपादन

सालशेतच्या उत्तरेस वसईची खाडी, ईशान्येस उल्हास नदी, पूर्वेस ठाण्याची खाडी तर पश्चिमेस अरबी समुद्र आहे. सालशेत बेटाच्या दक्षिणेस माहीमच्या खाडीपलीकडे माहीम बेट आहे. माहीमची खाडी व मिठी नदी आता जवळपास पूर्णपणे बुजलेली असल्यामुळे आता सालशेत, तुर्भे (ट्रॉम्बे) आणि माहीम बेटे एकमेकास व मुंबईच्या सात बेटांशी जोडले गेलेली आहेत.[] बोरिवली राष्ट्रीय उद्यान तथा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान सालशेत बेटाच्या साधारण मध्यावर आहे तर बेटाच्या ईशान्य भागात ठाणे शहर आहे. सालशेत बेटाचा दक्षिण भाग मुंबई नागरी जिल्ह्यात तर उरलेला भाग मुंबई उपनगरी जिल्ह्यात मोडतो. बेटाचा उत्तर भाग ठाणे जिल्ह्यात आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Geography - Salsette group of Islands". Maharashtra State Gazetteer, Greater Bombay district. 1987. 24 March 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "2.17.1 Existing Situation" (PDF). Mumbai city Development Plan 2005. 24 March 2012 रोजी पाहिले.[permanent dead link]