साखरपा (रत्‍नागिरी)

महाराष्ट्रातील गाव
(साखरपा, रत्नागिरी या पानावरून पुनर्निर्देशित)

[[वर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे]]

  ?कोंडगाव

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१६° ५९′ ०७.८″ N, ७३° ४१′ ३०.८४″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ३७ मी
जिल्हा रत्नागिरी जिल्हा
लोकसंख्या
लिंग गुणोत्तर
३,३५० (2011)
१,००४ /
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 415801
• +०२३५४
• MH08एमएच०८

कोंडगाव/साखरपा

संपादन
 
कोंडगाव येथील काजळी नदी
 
कोंडगाव येथील धरण

कोंडगाव आणि साखरपा किंवा साखरपें ही गावे महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या देवरुख हे मुख्यालय असलेल्या संगमेश्वर तालुक्यात आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी या गावाचे वर्णन 'मौजे कोंडगाव तर्फे देवळे' किंवा 'मौजे साखरपा तर्फे देवळे' असे केले जात असे.कोंडगाव आणि साखरपा हे आत्ता एकच गणले जात असले तरी ही दोन्ही गावे वेगवेगळी असून त्याची ग्रामपंचायत वेगवेगळी आहे.

कोंडगावाचे वर्णन

संपादन

कोंडगाव हे गाव काजळी या नदीकाठी वसलेले आहे. केव नदीगड नदी यांचा येथेच संगम होऊन बनलेली काजळी नदी रत्‍नागिरीजवळ भाट्याच्या खाडीला जाऊन मिळते. हे गाव रत्‍नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील एक मुख्य गाव आहे. कोंडगावचे कोंडगाव खुर्द, आणि बुद्रुक असे दोन भाग आहेत.

कोंडगावाची ग्रामपंचायत गावातील चावडी या भागात आहे. कोंडगावामध्ये बस स्थानक, प्राथमिक आरोग्यकेंद्र, बँका इत्यादी सोयी आहेत. कोंडगाव(साखरपा)चा पिन कोड ४१५ ८०१ हा आहे. कोंडगावातील श्री गिरिजादेवीचा प्रतिवर्षी मकर संक्रातीच्या वेळेला श्री मार्लेश्वर देवाशी मार्लेश्वर येथे विवाह सोहळा पार पडला जातो. कोंडगावात रंगपंचमी ते गुढीपाडवा या काळात श्री ग्रामदैवत गांगेश्वराची पालखी पूर्ण गावातील सगळ्या घरांमध्ये फिरते. साखरपा आणि कोंडगावच्या पालखी भेटीचा सोहळा 'सदरेच्या माळावर' उत्साहाने पार पडला जातो. कोंडगावातील वरच्या आळीतील श्री दत्त मंदिर येथील दत्तजन्मोत्सव आणि खालच्या आळीतील श्री राम मंदिर येथील रामजन्मोत्सव हे मोठ्या प्रमाणावर साजरे होतात.

कोंडगावच्या चतुःसीमा

संपादन

कोंडगावाच्या पूर्वेला साखरपा हे गाव आहे. पश्चिमेला मेढे या गावाची सीमा आहे. उत्तरेला मोर्डे आणि वांझोळे या गावाची सीमा लागते. तर दक्षिणेला काजळी नदी असून त्याच्या पलीकडे भडकंबा, तिवरेपुर्ये ही गावे आहेत.

धार्मिक स्थळे

संपादन
कोंडगाव मधील धार्मिक स्थळे

१. श्री ग्रामदैवत देव गांगेश्वर मंदिर

२. श्री ग्रामदेवता देवी नवलाई मंदिर

३. श्री देवी गिरजाई मंदिर (देवी गिरजाई ही श्री देव मार्लेश्वर यांची पत्‍नी)

४. श्री दत्त मंदिर

५. श्री राम मंदिर

६. श्री नीलकंठेश्वर मंदिर

७. श्री निधानेश्वर मंदिर

८. श्री विठ्ठल मंदिर

कोंडगावातील विभाग किंवा वाड्या

संपादन

१. बाजारपेठ

२. वरची आळी किंवा श्री दत्तदर्शन पथ किंवा इब्राहीम पेठ

३. खालची आळी किंवा केतकर आळी

४. मधली आली किंवा मुरलीधर आळी

५. रोहिदास नगर

६. जोयशी वाडी

७. बाईंग वाडी

८. वाणी वाडी

९. चावडी

इब्राहिम पेठ - कोंडगाव-साखरप्यातील इब्राहिम पेठ ही जुनी व्यापारी वसाहत आहे. विजापूरचा आदिलशहा हजरत इब्राहिम याने रत्‍नागिरीजवळील हरचेरी या गावाजवळ दोन गावांचे शिवार काढून नवीन बंदर निर्माण केले, त्याचे नाव इब्राहिमपट्टण होय. त्या बंदरावरून त्याकाळी व्यापार चालत असे. त्या बंदराला उतारपेठ पाहिजे म्हणून आत्ताच्या कोंडगाव, साखरपा, भडकंबे, पुर्ये या गांवांच्या जमिनी एकत्र करून पेठ ईभ्रामपूर ही नवीन वसाहत करविली आणि या वसाहतीत कसबे देवरुखकसबे प्रभावळी येथील वाणी, सोनार आदी व्यापारी आणले. ही एक व्यापारी पेठ होती.

शैक्षणिक सुविधा

संपादन

कोंडगावात प्राथमिक ते माध्यमिक शिक्षणापर्यंतच्या सोई आहेत.

कोंडगावातील शाळा

१. श्रीमान तुकाराम गणशेठ गांधी विद्यालय.

३. जिल्हा परिषदेची केंद्र शाळा साखरपा क्र.१.

४. पद्मा कन्या शाळा.

५. दत्ताराम कबनुरकर इंग्लिश स्कूल.

६. जोयशीवाडी शाळा


कोंडगावामध्ये मुख्यतः भातशेती केली जाते. तसेच आंबा व काजूच्या बागा मोठ्या प्रमाणावर आढळतात.

साखरप्याचे वर्णन

संपादन
  ?साखरपा

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
 {{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही.

१६° ५९′ ०७.८″ N, ७३° ४१′ ३०.८४″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ३७ मी
जिल्हा रत्नागिरी जिल्हा
लोकसंख्या
लिंग गुणोत्तर
१,६०१ (2011)
९८४ /
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 415801
• +०२३५४
• MH08

[[वर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे]]

आंबा घाट उतरून कोकणात आले की सर्वप्रथम साखरपा हे गाव लागते. साखरप्याचे साखरपा खुर्द आणि बुद्रुक असे दोन भाग होतात. साखरपा हे गाव काजळी नदीच्या काठी वसले आहे.

साखरप्याच्या चतुःसीमा

संपादन

साखरप्याच्या उत्तरेला वांझोळे आणि निवधे, पूर्वेला दख्खन आणि मुर्शी, दक्षिणेला काजळी नदी असून त्यापलीकडे भडकंबा, तर पश्चिमेला कोंडगाव ही गावे आहेत.

धार्मिक स्थळे

संपादन

१. श्री देवी जुगाई मंदिर

२. श्री सतीमाता मंदिर

३. इब्राहीम मस्जिद

४. हनुमान मंदिर

श्री देवी जुगाई ही साखरप्याची ग्रामदेवता आहे.

साखरप्यातील विभाग किंवा वाड्या

संपादन

1) रोहिदास वाडी

2) भंडारवाडी

3) गुरववाडी

4) जाधववाडी

5) गवळणीचा माळ

6) खंडवाडी

7) मुरलीधर वाडी

8) पतकेवाडी

9) तळवाडी

10) बौद्धवाडी

साखरप्यातील शैक्षणिक सुविधा

संपादन

१. महात्मा गांधी विद्यालय आणि बाबासाहेब कोलते ज्युनिअर कोलेज

२. जिल्हा परिषदेची केंद्र शाळा साखरपा क्र.२.

नागरी सुविधा

संपादन

येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते.

हवामान

संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

  1. ^ /https://www.bankofindia.co.in/