देवरुख
देवरुख हे कोकणातल्या, रत्नागिरी जिल्ह्यामधील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. देवी सोळजाई ही देवरुख या गावाचे ग्रामदैवत आहे.
?देवरुख महाराष्ट्र • भारत | |
— नगर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | रत्नागिरी |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• 415804 • MH08 |
देवरुख गावात मोठ्या प्रमाणावर वड व पिंपळ यांची झाडे आहेत. म्हणून या गावाला देववृक्ष असे म्हणत असत. त्याचा अपभ्रंश होऊन देवरुख असा झाला.
देवरुख हे कोकणातील एक छोटेसे गाव आहे. देवरुख हे पूर्वीपासून शेतीप्रधान गाव आहे. या गावामध्ये उन्हाळ्यात खूप उष्ण वातावरण असते व हिवाळ्यात उबदार वातावरण असते. येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात (४०० ते ५०० सेमी) पाऊस पडतो. तांदूळ,काजू,हापूस आंबा ही देवरूखमध्ये मोठ्या प्रमाणात घेतली जाणारी पिके आहेत.
तालुका मुख्यालय
संपादनदेवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय आहे. संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय हे संगमेश्वर गावातच होते. पण १८७८ साली तिथे भीषण आग लागली आणि सर्व सरकारी इमारती जळाल्या. तेव्हा संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय देवरुख या गावात हलविले.संगमेश्वर तालुक्याचे पंचायत समिती कार्यालय हे देवरुखला आहे.
हवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
नागरी सुविधा
संपादनयेथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[१] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते.
इतिहास
संपादनछत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी देवरुखला वेळोवेळी भेट दिली आहे.तसेच शिवाजी महाराजांनी बरेचदा श्री सोळजाई मातेच्या मंदिरालाही भेट दिली आहे.रायगड आणि विशाळगड हे देवरुखपासून सर्वात जवळचे किल्ले आहेत. देवरुखमध्ये चौसोपी हे ठिकाणसुद्धा प्रसिद्ध आहे.छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात या ठिकाणी घोड्यांचा तबेला होता.कवी कलश हे तेथील सर्व व्यवस्था पाहत.
देवरुख गावात पार्वतीबाई आठवलें Archived 2022-06-07 at the Wayback Machine.सारख्या समाजसेविका होऊन गेल्या.तसेच श्री.शंकर धोंडशेठ सार्दळ आणि त्यांची मुलगी विमल शंकर सार्दळ हे स्वातंत्र्यसैनिक होते. श्री. शंकर धोंडशेठ सार्दळ यांनी विनोबा भावे यांच्यासोबत भू-दान चळवळीमथ्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.शंकर सार्दळ यांनी लिला विशंभर हे कानडी साहित्य मराठीमध्ये भाषांतरित केले.
नद्या
संपादनबावनदी व सप्तलिंगी या दोन नद्यांमधून देवरुखला पाणीपुरवठा केला जातो. चांदोली अभयारण्याजवळील सह्याद्रीच्या पर्वतरांगातून बावनदीचा उगम झाला आहे, तसेच सप्तलिंंगी नदीचा उगम देखील सह्याद्रीच्या पर्वतरांगामधून झाला आहे. देवरुखला बावनदी या नदीचा पाणीपुरवठा होतो. देवरुखचे जलशुद्धकरण केंद्र परशराम वाडीत आहे.
देवरुखमधील संस्था
संपादन- मातृमंदिर (या संस्थेला २०१२ सालचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता.)
श्रीमती इंदिराबाई हळबे उर्फ मावशीबाई हळबे यांनी १९५४ साली देवरुख मध्ये 'मातृमंदिर' या संस्थेची स्थापना केली. या संस्थेने देवरुख मध्ये आरोग्य सुविध उपलब्ध केल्या.
- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कै.श्री.काकासाहेब पंडित, कै.श्री.दादासाहेब मावळणकर (लोकसभेचे पहिले सभापती), कै.श्री.विनायकराव केतकर, कै.श्री.दादासाहेब पित्रे, कै.श्री.रावसाहेब कुलकर्णी, कै.श्री.दादासाहेब सरदेशपांडे आणि देवरुख गावातील इतर ग्रामस्थांनी मिळून सन १९२७ साली केली.कै.श्री तात्यासाहेब आठल्ये व कै. श्री. विश्वनाथराव सप्रे यांनी स्थानिक विद्यार्थ्यांसाठी कला व वाणिज्य शाखा देवरूख परिसरात सुरू करून शिक्षणाची दारे खुली केली.कै.श्री.अरुण आठल्ये यांनी स्वतःची हमी देऊन खूप मोठे कर्ज घेतले व संस्थेचा विस्तार केला.त्यांनी ही संस्था कर्जमुक्त केली.त्यांनी त्यांच्याजवळ असणारा बॉम्बे स्कूल अॉफ आर्ट्सच्या जुन्या शिक्षकांच्या चित्रांचा संग्रह संस्थेला दान केला.या संस्थेने १९२७ साली न्यू इंग्लिश स्कूल देवरूखची स्थापना केली.येथे पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते.संस्थेकडे गुरुवर्य काकासाहेब सप्रे विज्ञान महाविद्यालय आहे.या संस्थेकडे श्रीमती अरूंधती अरुण पाध्ये इंग्लिश मिडीअम स्कूल आहे.येथे बालवाडीपासून ते आठवीपर्यंत शिक्षण दिले जाते.
देवरूखपासून ५किमी अंतरावर राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आहे.
पर्यटन
संपादनदेवरुख नगरच्या सभोवताली २० किलोमीटर अंतरात दोन-तीन प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत.
१. मार्लेश्वर
संपादनमार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ देवरूखपासून १७ किमी अंतरावर आहे. मार्लेश्वर हे एक शंकराचे मंदिर असून ते सह्याद्री पर्वतात प्राचीन गुहेत आहे. मार्लेश्वर हे एक जागृत शिवलिंग आहे, असे सांगितले जाते. गुहेला लागूनच प्रसिद्ध बारमाही धबधबा आहे.
२. टिकलेश्वर
संपादनदेवरुख गावाजवळच एका पर्वतात टिकलेश्वर हे प्रसिद्ध शिवमंदिर आहे. हे शिवमंदिर देवरुखपासून ५ किलोमीठर अंतरावर आहे.येथील टेकडीवरून आपल्याला तीन गावे दिसतात.
३. कर्णेश्वर मंदिर
संपादनसंगमेश्वर येथील प्रसिद्ध कर्णेश्वराचे मंदिर हे हेमाडपंथी शैलीचे आहे. हे मंदिर देवरुखपासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे.
४. केदारलिंग मंदिर, केतवली
संपादनकेदारलिंग मंदिर हे भेट देण्सायारखे ठिकाण आहे.देवरुखपासून १०किमी अंतरावर असलेल्या केतवली गावाचे हे ग्रामदैवत आहे. हे शिवमंदिर आहे.
५.सोळजाई देवी मंदिर
संपादनसोळजाई ही देवरुखची ग्रामदेवता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला ते विशाळगड किल्ला असा प्रवास करत असताना या देवळाला वेळोवेळी भेट दिली आहे. भारतातील अनेक लोकांनी या देवळाला भेट दिली आहे.
रस्ते
संपादनदेवरुख हे संगमेश्वर तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे.हे संगमेश्वरपासून १७ किमी अंतरावर, आणि रत्नागिरीपासून ४९ किमी अंतरावर आहे. देवरूखपासून संगमेश्वर तसेच रत्नागिरीपर्यंत सतत बससेवा सुरू असते. देवरुख ते संगमेश्वर तसेच रत्नागिरीपर्यंत खाजगी वाहनांचीसुद्धा ये-जा असते. कोल्हापूरपासून देवरुख हे १०० किमी अंतरावर आहे. कोल्हापूर-देवरूख मार्गावर एस्‌टीची निरंतर सेवा सुरू असते.बेळगाव हे देवरुखपासून २१० किमी अंतरावर आहे.
रेल्वेमार्ग
संपादनदेवरुख कोकण रेल्वेला जोडलेले नाही, पण देवरुखपासून रत्नागिरी आणि संगमेश्वर रेल्वे स्थानकपर्यंत अनेक बसेस नियमितपणे ये-जा करत असतात. देवरुख ते संगमेश्वर रेल्वे स्थानक अंतर १७ किमी आहे, तर देवरुख ते रत्नागिरी रेल्वे स्थानक अंतर ४८ किमी आहे.
[[वर्ग:संगमेश्वर तालुक्यातील गावे]