इस्तंबूल सबिहा गोकचेन आंतरराष्ट्रीय विमानतळ
(सबिहा गॉक्सेन आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
इस्तंबूल सबिहा गोकचेन आंतरराष्ट्रीय विमानतळ (तुर्की: İstanbul Sabiha Gökçen Uluslararası Havalimanı) (आहसंवि: SAW, आप्रविको: LTFJ) हा तुर्कस्तान देशाच्या इस्तंबूल शहरामधील एक प्रमुख विमानतळ आहे.
इस्तंबूल सबिहा गोकचेन आंतरराष्ट्रीय विमानतळ İstanbul Sabiha Gökçen Uluslararası Havalimanı | |||
---|---|---|---|
आहसंवि: SAW – आप्रविको: LTBFJ
| |||
माहिती | |||
मालक | तुर्कस्तान सरकार | ||
कोण्या शहरास सेवा | इस्तंबूल | ||
हब | अनादोलूजेट पेगासस एअरलाइन्स | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ३१२ फू / ९५ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 40°53′54″N 29°18′33″E / 40.89833°N 29.30917°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
मी | फू | ||
06L/24R | ३,००० | कॉंक्रीट | |
06R/24L | ३,५०० | काम चालू | |
सांख्यिकी (२०१८) | |||
एकूण प्रवासी | ३,४१,३३,६१७ | ||
उड्डाणे | २,१९,६५६ |
१९२४ सालापासून वापरात असलेल्या इस्तंबूल अतातुर्क विमानतळ ह्या इस्तंबूलमधील विमानतळावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी २००१ साली सबिहा गोकचेन आंतरराष्ट्रीय विमानतळ उघडण्यात आला. इस्तंबूल शहराच्या ३२ किमी आग्नेयेस आशिया खंडामध्ये स्थित असलेल्या ह्या विमानतळाला तुर्कस्तानचा पहिला राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क ह्याची दत्तक घेतलेली मुलगी व जगातील सर्वप्रथम महिला लढवय्या वैमानिक सबिहा गोकचेन हिचे नाव देण्यात आले आहे. तुर्कस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी तुर्की एरलाइन्सचा वाहतूकतळ येथेच आहे.
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत