सदस्य चर्चा:KiranBOT II/typos/Archive 1
उभे अथवा आडवे जोडाक्षर
संपादनरत्नागिरी > आडवे जोडाक्षर
रत्नागिरी > उभे जोडाक्षर
यातील नेमके कोणते बरोबर आहे?
दोन्ही पद्धतीने लिहिणे शक्य असले तरी माझ्या मते एकच पद्धत ठेवावी. रत्नागिरी असे लिहायला कठीण वाटले तरी वाचायला सोपे जाते म्हणून ते ठेवावे असे मला वाटते. ~~~~ Shantanuo (चर्चा) १०:४९, ९ फेब्रुवारी २०२२ (IST)
- रत्नागिरी source code madhe टाकले. —usernamekiran (talk) १७:००, २ एप्रिल २०२२ (IST)
अनिर्णीत / अनिर्णित
संपादनअनिर्णीत > अनिर्णित (जाणकारांचा निर्णय अपेक्षित)
अनिर्णित > अनिर्णीत | माझ्या मते असा बदल करणे योग्य आहे. ह्रस्व शब्द चूक असून तो दीर्घ असावा. Shantanuo (चर्चा) ०८:२०, २ मार्च २०२२ (IST)
- अनिर्णित असे शुद्धलेखन बरोबर आहे.
- अभय नातू (चर्चा) ०७:०५, २७ मार्च २०२२ (IST)
- निर्णयाबद्दल धन्यवाद. मी अरूण फडके यांच्या मराठी लेखन कोश या पुस्तकाचा आधार घेतला होता. त्यात तो दीर्घ आहे. Shantanuo (चर्चा) ०९:०८, २७ मार्च २०२२ (IST)
नेहमी चुकणारे शब्द
संपादनखाली दिलेल्या शब्दातील जे योग्य वाटतील ते स्वीकारून बॉटद्वारे बदलावे.
- आक्टोबर > ऑक्टोबर
- उन्हाळयात > उन्हाळ्यात
- एकुण > एकूण
- एरलाइन्स >
एअरलाइन्स - करुन > करून
- किनार्याची > किनाऱ्याची
- गुरु > गुरू -- अपवादाने गुरु हा शब्द बरोबर आहे. गुरे/गुरं या बहुवचनी शब्दाचे एकवचन गुरु होय.
- चीत्रकाम्या > चित्रकाम्या
- ठेउन > ठेवून
- प्रामाणिकरण > प्रमाणीकरण
- फेब्रवारी > फेब्रुवारी
- बद्दलुन > बदलून
- भाषातील > भाषांतील
- वरुन > वरून (?)
- वापरु > वापरू
- वापरुन >
वापरून - विवीध > विविध
- विशेषत: > विशेषतः
- विष्णु > विष्णू -- संस्कृतोद्भव (तसेच इतर भाषांतील थेट आणलेले शब्द व विशेषनामे) त्या त्या भाषांतील शुद्धलेखनासह स्वीकारावी. मराठीत रूढ असलेले शब्द, उदा - पॅरिस, याला अपवाद आहेत
- सांगकाम्याद्वारेसफाई > सांगकाम्याद्वारे सफाई
- सुरवात > सुरुवात
- सुरु > सुरू
- सोव्हियेत >
सोव्हिएत - स्थानांतरीत > स्थानांतरित
- —unigned comment added by Shantanuo
- सगळे शब्द source code मध्ये टाकले. —usernamekiran (talk) १७:००, २ एप्रिल २०२२ (IST)
- "गुरे/गुरं या बहुवचनी शब्दाचे एकवचन गुरु होय.” हे बरोबर आहे. पण त्या अर्थाने गुरु हा शब्द वापरलेले विकीवरील एखादे पान कोणी दाखवू शकतो का?
- "विष्णु > विष्णू -- संस्कृतोद्भव (तसेच इतर भाषांतील थेट आणलेले शब्द व विशेषनामे) त्या त्या भाषांतील शुद्धलेखनासह स्वीकारावी. मराठीत रूढ असलेले शब्द, उदा - पॅरिस, याला अपवाद आहेत." विष्णू हा शब्द मराठीत रूढ असलेला शब्द आहे की नाही? तो शब्द संस्कृतोद्भव आहे हे नक्की. आता तो संस्कृतातील शुद्धलेखनासह स्वीकारावा म्हणजे नक्की काय करायचे? सगळीकडे पहिला णु हवा असेल तर बॉटद्वारे विष्णू - विष्णु असा बदल करणे अवघड नाही. पण हा नियम मला विकीवरील "शुद्धलेखनाचे नियम” या लेखात वाचायला मिळाला नाही.
- एअरलाइन्स > एरलाइन्स / हार्डवेअर > हार्डवेर असा बदल बॉटद्वारे करणे सहज शक्य आहे. पण माझ्यामते विकीबाहेरील एखाद्या अभ्यासकाने त्याला दुजोरा द्यावा.
- "विकिपीडियावरुन" यासारखे खूप शब्द आहेत जे दीर्घ पाहिजेत. उदा. नावावरुन स्थानकावरुन वसईवरुन विमानतळावरुन रस्त्यावरुन उंचीवरुन सांगण्यावरुन पदावरुन शब्दावरुन सीमेवरुन रुळांवरुन उंचावरुन इत्यादी.
- वापरुन हा शब्द काही लेखात तसेच साच्यात वापरलेला आहे. उदा. साचा:जुलै२००८ तो दीर्घ पाहिजे. तसेच प्रत्येक पानाच्या शेवटी जे वाक्य आहे " हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. ” त्यातील वापरुन हा शब्द देखील दीर्घ पाहिजे.
Shantanuo (चर्चा) ११:२५, २७ मार्च २०२२ (IST)
- @Shantanuo आणि अभय नातू: "_विष्णु_ > _विष्णू_", व "विष्णू > विष्णु" आणि "गुरु_ → गुरू_" व "गुरू > गुरु" असे बदल केले तर? _ म्हणजे स्पेस. —usernamekiran (talk) २१:१६, २७ मार्च २०२२ (IST)
- नाही तसे करता येणार नाही. कारण आपल्याला "गुरुचे" हा शब्द "गुरूचे" असा बदलून हवा आहे. ती सोय त्यात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही गुरूकुल, गुरूकृप असे ५ – ६ शब्दच स्वीकारले आहेत. पूर्वपदावरील गुरुचे सर्व शब्द (सुमारे २७ – वाढ होण्याची शक्यता) घ्यायचा विचार नसेल तर बरेच बदल मॅन्युअली करण्याची तयारी ठेवा, तसेच चुकांची जबाबदारी स्वीकारा. उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षण हा लेख पहा. यात शीर्षक योग्य दिसत असले तरी लेखात सगळीकडे चुकीचा रू दिसत आहे. हा बदल माझ्याच गुरु - गुरू सूचनेमुळे झालेला आहे हे खरे, पण त्यानंतर मी गुरूत्व शब्द गुरुत्व असा बदलण्यास सांगितले होते. ते न ऐकल्यामुळे मला आता अशा लेखांची यादी करून त्या लेखांवर काम करावे लागेल. Shantanuo (चर्चा) ०९:२८, २८ मार्च २०२२ (IST)
- > "गुरे/गुरं या बहुवचनी शब्दाचे एकवचन गुरु होय.” हे बरोबर आहे. पण त्या अर्थाने गुरु हा शब्द वापरलेले विकीवरील एखादे पान कोणी दाखवू शकतो का?
- पान असले/नसले तरीही शुद्धलेखनात मुद्दाम चुका करू नयेत.
- > एअरलाइन्स > एरलाइन्स / हार्डवेअर > हार्डवेर असा बदल बॉटद्वारे करणे सहज शक्य आहे. पण माझ्यामते विकीबाहेरील एखाद्या अभ्यासकाने त्याला दुजोरा द्यावा.
- देवनागरीमध्ये दीर्घ ए उच्चार नाही (जसा कानडीमध्ये आहे.) तरी नसलेले स्वर घालण्यापेक्षा असलेल्या स्वरांचा वाचकालाच उलगडा करू द्यावा.
- > "विकिपीडियावरुन" यासारखे खूप शब्द आहेत जे दीर्घ पाहिजेत. उदा. नावावरुन स्थानकावरुन वसईवरुन विमानतळावरुन रस्त्यावरुन उंचीवरुन सांगण्यावरुन पदावरुन शब्दावरुन सीमेवरुन रुळांवरुन उंचावरुन इत्यादी.
- मराठीत उपांत्य स्वर सहसा ऱ्हस्व असतो.
- अभय नातू (चर्चा) ०७:२१, २९ मार्च २०२२ (IST)
- मी केलेल्या सूचना पूर्ण न स्वीकारता अर्धवट / मोडतोड करून स्वीकारल्या गेल्या तर त्यामुळे विकीला फायदा होण्याऐवजी नुकसान होईल. गुरु शब्द पूर्वपदावर येणाऱ्या लेखांची माझ्याकडे यादी आहे. ते लेख दुरुस्त करून मी थांबतो. Shantanuo (चर्चा) ०९:००, २९ मार्च २०२२ (IST)
इंग्रजी विसर्ग बदलून देवनागरी करणे
संपादनchange the english colon to devanagari colon in these words. The words look same but are totally different! :)
- अंत: > अंतः
- अक्षरश: > अक्षरशः
- अध: > अधः
- इत: > इतः
- इतस्तत: > इतस्ततः
- उ: > उः
- उं: > उंः
- उच्चै: > उच्चैः
- उभयत: > उभयतः
- उष: > उषः
- क: > कः
- चतु: > चतुः
- छंद: > छंदः
- छि: > छिः
- छु: > छुः
- तप: > तपः
- तेज: > तेजः
- थु: > थुः
- दु: > दुः
- नि: > निः
- परिणामत: > परिणामतः
- पुन: > पुनः
- पुर: > पुरः
- प्रात: > प्रातः
- बहि: > बहिः
- बहुश: > बहुशः
- मन: > मनः
- य: > यः
- यश: > यशः
- रज: > रजः
- वक्ष: > वक्षः
- वस्तुत: > वस्तुतः
- विशेषत: > विशेषतः
- व्यक्तिश: > व्यक्तिशः
- शब्दश: > शब्दशः
- संपूर्णत: > संपूर्णतः
- सद्य: > सद्यः
- स्वत: > स्वतः
- स्वभावत: > स्वभावतः
- हु: > हुः
- अंतिमत: > अंतिमतः
- अंशत: > अंशतः
- तप: > तपः
- पूर्णत: > पूर्णतः
- —unigned comment added by Shantanuo
- सगळे शब्द source code मध्ये टाकले. —usernamekiran (talk) १७:००, २ एप्रिल २०२२ (IST)
काही आवश्यक बदल
संपादनA) ११ व १२ क्रमांकाचा शब्द चूक असून तो ऱ्हस्व पाहिजे सुरुवात असा.
11 सुरूआत → सुरूवात → सुरुवात
12 सुरुआत → सुरूवात → सुरुवात
B) २२ क्रमांकाचा ठेवून हा शब्द बरोबर आहे कारण मूळ क्रियापद ठेवणे असे असेल तर व चा ऊ होणार नाही.
22 ठेवून → ठेऊन → ठेवून
C) ४३ व ४४ क्रमांकाचे शब्द सर्व पानांवर बदललेले आहेत का?
43 र्य > ऱ्य (र + ् + \u200D + य) > (ऱ + ् + य)
44 र्ह > ऱ्ह (र + ् + \u200d + ह) > (ऱ + ् + ह)
उदाहरणार्थ कोहिमाची_लढाई आणि कोल्हापूर या दोन पानांवर 'सहकार्यांचा' असा जो चुकीचा शब्द आहे तो 'सहकाऱ्यांचा' असा बदललेला नाही. असे आणखी बरेच शब्द आहेत ज्यात युनिकोड 200D आहे तो काढून नुक्ताधारी र टाकायला हवा. युनिकोडच्या नियमाप्रमाणे ऱ्य आणि ऱ्ह साठी जॉईनर न वापरता नुक्ताधारी र वापरायचा आहे. बऱ्याच लोकांच्या मते हे चूक असले तरी युनिकोडचा नियमच तसा आहे. तो पाळायला हवा असे मला वाटते.
Corrections as per Rule 5.5
संपादनसमासाचे पूर्वपद तत्सम ऱ्हस्वान्त असेल तर ते ऱ्हस्वान्तच लिहावे. शुद्धलेखनाचे_नियम#नियम_५.५
गुरु आणि विष्णु हे शब्द "तत्सम ऱ्हस्वान्त" असल्याने पूर्वपदावर आल्यास ऱ्हस्वान्तच लिहावे लागतात. तिथे दीर्घ करून चालणार नाही. उदा. विष्णुनारायण, विष्णुसहस्रनाम यातील ष्णु दीर्घ नाही. तसेच राजगुरुनगर, गुरुचरित्र, गुरुजी, गुरुदेव यातील रु दीर्घ नाही. परंतु कुलगुरुचे हा शब्द कुलगुरूचे असा दीर्घ हवा. कारण गुरू शब्द त्यात पूर्वपदावर नाही. पण कुलगुरुपदाचे हा शब्द कुलगुरूपदाचे असा दीर्घ नको. कारण त्यात गुरु शब्द पूर्वपदावर आहे. अशा अतरंगी नियमामुळे हे दोन शब्द बॉटद्वारे बदलणे कठीण आहे. खाली दिलेला बदल करून देखील काही शब्द मॅन्युअली बदलावे लागतील.
- "गुरु " → "गुरू " (note the space)
- "विष्णु " → "विष्णू " (note the space)
- "सुरु " → "सुरू " (note the space)
नाहीतर सुरुवात, सुरुंग, नसुरुद्दीन असे शब्द तसेच तसुरुमारू, त्सुरुगाका असे परभाषेतले शब्दही बदलले जातील. तसे होऊ नये म्हणून स्पेस वापरावी. Shantanuo (चर्चा) १०:५८, २४ मार्च २०२२ (IST)
- केले. —usernamekiran (talk) १७:००, २ एप्रिल २०२२ (IST)
पूर्वपदावरील गुरु पहिला हवा, दीर्घ नको
संपादनखाली दिलेल्या शब्दांमध्ये गुरू हा शब्द गुरु असा असायला हवा कारण तो शब्द पूर्वपदी आहे.
- गुरूकुल > गुरुकुल
- गुरूकृप > गुरुकृप
- गुरूगीत > गुरुगीत
- गुरूगृह > गुरुगृह
- गुरूग्रंथ > गुरुग्रंथ
- गुरूचरित्र > गुरुचरित्र
- गुरूजी > गुरुजी
- गुरूत्व > गुरुत्व
- गुरूदक्षिण > गुरुदक्षिण
- गुरूदत्त > गुरुदत्त
- गुरूदेव > गुरुदेव
- गुरूद्वार > गुरुद्वार
- गुरूनाथ > गुरुनाथ
- गुरूनानक > गुरुनानक
- गुरूपत्नी > गुरुपत्नी
- गुरूपद > गुरुपद
- गुरूपरंपर > गुरुपरंपर
- गुरूपौर्णिम > गुरुपौर्णिम
- गुरूप्रसाद > गुरुप्रसाद
- गुरूमंत्र > गुरुमंत्र
- गुरूमहिम > गुरुमहिम
- गुरूमाउली > गुरुमाउली
- गुरूवार > गुरुवार
- गुरूशिष्य > गुरुशिष्य
- गुरूसिन्हा > गुरुसिन्हा
- राजगुरूनगर > राजगुरुनगर
- कुलगुरूपद > कुलगुरुपद
Shantanuo (चर्चा) ०९:३८, २५ मार्च २०२२ (IST)
- @Shantanuo: मी फक्त "गुरू → गुरु" असा बदल केला असता सगळेच शब्द बदलले special:diff/2057043. आपल्याला बहुतेक regular expressions वापरावे लागतील. पण python सोबत regular expressions कशे वापरावे त्याची मला कल्पना नाही, किंवा ते मराठी सोबत खरंच काम करतील का ह्याचीही मला खात्री नाहीये. —usernamekiran (talk) ००:०९, २६ मार्च २०२२ (IST)
- पण जेव्हा मी "पोलीसा → पोलीस" असा बदल केला, तेव्हा "पोलीस" ह्या शब्दाला काहीच नाही झाले special:diff/2057063. —usernamekiran (talk) ००:२७, २६ मार्च २०२२ (IST)
- कुलगुरूपद > कुलगुरुपद असा बदल केला असता तेव्हा फक्त एकच शब्द बदलला. इतर शब्दांना काहीच झाले नाही. —usernamekiran (talk) ००:३०, २६ मार्च २०२२ (IST)
- वरील सगळे शब्द source code मध्ये टाकले. —usernamekiran (talk) १७:००, २ एप्रिल २०२२ (IST)
आपल्याला र्हस्व गुरु हा शब्द दीर्घांत म्हणजे गुरू असा करायचा आहे. तो फक्त अशाच शब्दात करायचा आहे की ज्यात 'गुरु’ शब्दाच्या अगदी शेवटी येईल. शब्दाच्या नंतर आपण स्पेस देतो. म्हणून "गुरु " (गुरु + स्पेस) हा शब्द "गुरू " (गुरू + स्पेस) असा बदलायचा आहे. ह्यात गोंधळ होण्यासारखे काय आहे? पायथॉनमधे हे शक्य नाही असे जर आपल्याला म्हणायचे असेल तर मी स्क्रिप्ट पाहिल्यावरच त्यावर बोलू शकेन. (माझा इ-मेल shantanu dot oak at gmail.com) आपण गृहीत धरूया की पायथॉनमध्ये स्पेस चालत नाही आणि म्हणून "गुरु” हा पहिल्या रुकाराचा शब्द सर्व ठिकाणी "गुरू” असा दुसऱ्या रूकाराचा होईल. तसे झाले तरी चालेल. मी वर दिलेले २७ शब्द पुन्हा बॉटद्वारे बदलले की काम झाले.
आपण नंतर म्हटले आहे की… "पोलीसा → पोलीस" असा बदल केला, तेव्हा "पोलीस" ह्या शब्दाला काहीच नाही झाले, कुलगुरूपद > कुलगुरुपद असा बदल केला असता तेव्हा फक्त एकच शब्द बदलला. इतर शब्दांना काहीच झाले नाही.
हेच तर अपेक्षित आहे! इथे आपण फक्त "गुरू” नव्हे तर पूर्ण "कुलगुरूपद” अशी स्ट्रींग बदलत आहोत. हा सहा अक्षरी शब्द असणारी जर दोन-चारच पाने असतील तर तितकीच बदलली जातील.
माझ्या ४ मार्चच्या पोस्टमध्ये मी सुरूवात हा शब्द सुरुवात असा र्हस्व हवा असे म्हटले होते. ते बहुधा नजरचुकीने राहून गेले असेल. कृपया खाली दिलेले शब्द स्वीकारावेत.
- सुरूआत सुरुवात
- सुरुआत सुरुवात
- सुरूवात सुरुवात
Shantanuo (चर्चा) ०९:४०, २६ मार्च २०२२ (IST)
गुरूकृपा > गुरुकृपा ही नोंद गुरूकृप > गुरुकृप अशी केली कारण त्यामुळे गुरूकृपेचा हा शब्द गुरुकृपेचा असा बदलून मिळेल. इतरही आकारान्त शब्द अकारान्त केले. Shantanuo (चर्चा) १२:२९, २७ मार्च २०२२ (IST)
या शब्दातही गुरु शब्द पहिला हवा कारण तो पहिल्या पदावर आहे.
- गुरूकिल्ली > गुरुकिल्ली
- गुरूकुंज > गुरुकुंज
- गुरूग्राम > गुरुग्राम
- गुरूदास > गुरुदास
- गुरूपुष्य > गुरुपुष्य
- गुरूबंधू > गुरुबंधू
- गुरूभक्त > गुरुभक्त
- गुरूमुख > गुरुमुख
- गुरूराज > गुरुराज
- गुरूवर्य > गुरुवर्य
- गुरूस्थान > गुरुस्थान
- गुरूवायुर > गुरुवायुर
- गुरूवायूर > गुरुवायूर
हे शब्द विकीवर कमी प्रमाणात वापरात असल्यामुळे दोन-चार पानांवरच मिळतील.
Shantanuo (चर्चा) १३:०४, २८ मार्च २०२२ (IST)
- वरील सगळे शब्द source code मध्ये टाकले. —usernamekiran (talk) १७:००, २ एप्रिल २०२२ (IST)
Corrections as per Rule 8.9
संपादनधातूला 'ऊ' किंवा 'ऊन' प्रत्यय लावताना धातूच्या शेवटी 'व' असेल तरच 'वू' आणि 'वून' अशी रूपे होतात.पण धातूच्या शेवटी 'व' नसेल तर 'ऊ' किंवा 'ऊन' अशी रूपे होतात शुद्धलेखनाचे_नियम#नियम_८.९
- खावून > खाऊन
- गावून > गाऊन
- घेवून > घेऊन
- देवून > देऊन
- धुवून > धुऊन
- पिवून > पिऊन
- भिवून > भिऊन
- चाऊन > चावून
- जेऊन > जेवून
- ठेऊन > ठेवून
- रोऊन > रोवून
- धाऊन > धावून
यातील महत्त्वाचे शब्द स्वीकारावेत. Shantanuo (चर्चा) ११:१९, २६ मार्च २०२२ (IST)
- वरील सगळे शब्द source code मध्ये टाकले. —usernamekiran (talk) १७:००, २ एप्रिल २०२२ (IST)
- या यादीत हे दोन शब्द देखील टाकावे लागतील.
- येवून > येऊन
- जावून > जाऊन
नवीन सुरुवात
संपादन@Shantanuo: तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. माझ्या वागण्यामुळे/बोलण्यामुळे तुम्हाला राग आला किंवा वाईट वाटले असेल तर त्यासाठी मी माफी मागतो. मी चुकांची जबाबदारी स्वीकारायला तयार आहे :-) पण चुका होऊ नये म्हणून मी एकदाच भरपूर entries वाढवण्याऐवजी एक-एक एन्ट्री वाढवत होतो. आणि काही entries नजरचुकीमुळे राहिल्या होत्या (सुरुवात संदर्भात), व अजून काही. कृपया राग मानून घेऊ नका.
मी थोड्याच वेळात तुम्ही सांगितलेले सर्व शब्द source code मध्ये टाकतो. संपादनांमध्ये किंवा माझ्या वागण्या/बोलण्यात जर काही चुका आढळल्या तर कृपया मोकळ्या मनानी मला सांगा, मी त्या दुरुस्त करेन :-) —usernamekiran (talk) २०:०५, २९ मार्च २०२२ (IST)
- माझा रोख तुमच्यावर नसून अभय नातू यांच्याकडे होता. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून चालू असलेल्या चर्चेची २७ मार्चपर्यंत काहीही दखल घेतली नाही. बरं प्रतिसाद काय तर "मराठीत उपांत्य स्वर सहसा ऱ्हस्व असतो.” याचा अर्थ काय समजायचा? म्हणजे त्यांना “विकिपीडियावरून > विकिपीडियावरुन" असा बदल करून हवा आहे का? मराठीच्या नियमात ते बसेल का? “गुरे/गुरं या बहुवचनी शब्दाचे एकवचन गुरु होय.” हे ही बरोबर. मग "गुरुचे पाय धरा” असे काही वाक्य विकीवर आढळल्यास "जनावराचे पाय धरा” अशा अर्थाने असेल असे समजून सोडून द्यायचे का?
- त्यांचा अभ्यास, अनुभव आणि विकीवरील योगदान अतुलनीय आहे. तर काम करण्याची पद्धत अनाकलनीय आहे. मी त्यांच्या कार्यपद्धतीवर फार पूर्वीपासून नाराज आहे आणि हे त्यांनाही माहीत आहे. :) Shantanuo (चर्चा) ०९:५३, ३० मार्च २०२२ (IST)
Corrections as per Rule 5.2
संपादन- खालील चर्चा बंद करण्यात आली आहे. कृपया त्यात बदल करू नका. यानंतरच्या टिप्पण्या योग्य चर्चा पानावर कराव्यात. या चर्चेत आणखी कोणतेही संपादन करण्यात येऊ नये.
'परंतु, यथामति, तथापि', ही तत्सम अव्यये ऱ्हस्वान्त लिहावीत. शुद्धलेखनाचे_नियम#नियम५.२
_परंतू_ > _परंतु_
_यथामती_ > _यथामति_
_तथापी_ > _तथापि_
_अद्यापी_ > _अद्यापि_
_इती_ > _इति_
_कदापी_ > _कदापि_
_किंतू_ > _किंतु_
_प्रभृती_ > _प्रभृति_
_यथाशक्ती_ > _यथाशक्ति_
_यद्यपी_ > _यद्यपि_
_संप्रती_ > _संप्रति_
- added. —usernamekiran (talk) १५:१०, १९ एप्रिल २०२२ (IST)
Corrections as per Rule 5.4
संपादन- खालील चर्चा बंद करण्यात आली आहे. कृपया त्यात बदल करू नका. यानंतरच्या टिप्पण्या योग्य चर्चा पानावर कराव्यात. या चर्चेत आणखी कोणतेही संपादन करण्यात येऊ नये.
'आणि' व 'नि' ही मराठीतील दोन अव्यये ऱ्हस्वान्त लिहावीत. शुद्धलेखनाचे_नियम#नियम५.४
_आणी_ > _आणि_
_नी_ > _नि_
Shantanuo (चर्चा) १०:१९, ८ एप्रिल २०२२ (IST)
- added in वेलांटी setion. —usernamekiran (talk) १६:३९, १५ एप्रिल २०२२ (IST)
Corrections as per Rule 8.6
संपादन- खालील चर्चा बंद करण्यात आली आहे. कृपया त्यात बदल करू नका. यानंतरच्या टिप्पण्या योग्य चर्चा पानावर कराव्यात. या चर्चेत आणखी कोणतेही संपादन करण्यात येऊ नये.
तीन अक्षरी शब्दातील मधले अक्षर 'क' चे किंवा 'प' चे द्वित्व असेल तर उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी हे द्वित्व नाहीसे होते. शुद्धलेखनाचे_नियम#नियम८.६
- _रकम_ > _रक्कम_
- _रक्कमे > _रकमे
- _अकल_ > _अक्कल_
- _अक्कले > _अकले
- _कुक्कूट_ > _कुक्कुट_
- _कुक्कुटा > _कुकुटा
- _चकर_ > _चक्कर_
- _चक्करे > _चकरे
- _टकर_ > _टक्कर_
- _टक्करे > _टकरे
- _टक्करा > _टकरा
- _टकल_ > _टक्कल_
- _टक्कले > _टकले
- _टक्कला > _टकला
- _डूक्कर_ > _डुक्कर_
- _डुक्करा > _डुकरा
- _दूक्कल_ > _दुक्कल_
- _दुक्कला > _दुकला
- _दुक्कले > _दुकले
- _शकल_ > _शक्कल_
- _शक्कले > _शकले
- _छपर_ > _छप्पर_
- _छप्परा > _छपरा
- _छप्परे > _छपरे
- _शप्पथे > _शपथे
- _शप्पथा > _शपथा
- _चप्पले > _चपले
- _चप्पला > _चपला
- _तीप्पट_ > _तिप्पट_
- _तिप्पटी > _तिपटी
- _थपड_ > _थप्पड_
- _थप्पडा > _थपडा
- _थप्पडे > _थपडे
- _दूप्पट_ > _दुप्पट_
- _दुप्पटी > _दुपटी
या नियमात बसणारे शब्द फार नाहीत, जे आहेत ते देखील विशेष वापरात नाहीत. पण तरीदेखील या विषयाशी संबंधित आहे व इतर संकेतस्थळांना उपयोग व्हावा म्हणून ही यादी दिली आहे. Shantanuo (चर्चा) १०:२१, ९ एप्रिल २०२२ (IST)
- added in नियम ८.६ section. —usernamekiran (talk) १६:३९, १५ एप्रिल २०२२ (IST)
Corrections as per Rule 17
संपादन- खालील चर्चा बंद करण्यात आली आहे. कृपया त्यात बदल करू नका. यानंतरच्या टिप्पण्या योग्य चर्चा पानावर कराव्यात. या चर्चेत आणखी कोणतेही संपादन करण्यात येऊ नये.
'इत्यादी' व 'ही' हे शब्द दीर्घांन्त लिहावेत . 'अन्' हा शब्द व्यंजनान्त लिहावा. शुद्धलेखनाचे_नियम#नियम१७
_इत्यादि_ > _इत्यादी_
_हि_ > _ही_
_अन_ > _अन्_
Shantanuo (चर्चा) १०:५०, ९ एप्रिल २०२२ (IST)
- added in नियम १७ section. —usernamekiran (talk) १६:३९, १५ एप्रिल २०२२ (IST)
Corrections as per Rule 11
संपादन- खालील चर्चा बंद करण्यात आली आहे. कृपया त्यात बदल करू नका. यानंतरच्या टिप्पण्या योग्य चर्चा पानावर कराव्यात. या चर्चेत आणखी कोणतेही संपादन करण्यात येऊ नये.
पुनरुक्त शब्दांतील दुसरा व चौथा हे स्वर मूळ घटक शब्दांमध्ये ते दीर्घ असल्याने ते दीर्घ लिहावेत, परंतु पुनरुक्त शब्द नादानुकारी असतील तर ते उच्चाराप्रमाणे ऱ्हस्व लिहावेत. शुद्धलेखनाचे_नियम#नियम११
- _खरिखरि_ > _खरीखरी_
- _हळुहळु_ > _हळूहळू_
- _दुडूदुडू_ > _दुडुदुडु
- _रुणूझुणू_ > _रुणुझुणु_
- _लुटूलुटू_ > _लुटुलुटु_
Shantanuo (चर्चा) ११:३४, ९ एप्रिल २०२२ (IST)
- added in नियम ११ section. —usernamekiran (talk) १६:३९, १५ एप्रिल २०२२ (IST)
गुरु_ → गुरू_
संपादन@Shantanuo: गुरु_ → गुरू_ हा बदल होत नाहीये. पण विष्णु_ → विष्णू_हा बदल होतोय. मी _गुरु_ → _गुरू_ असा प्रयत्न सुद्धा केला, पण काहीच झाले नाही. कोणतीच string काहीच बदल करत नाहीये. विष्णु बदलत आहे, पण गुरु नाही. तुमच्या मते काय कारण असावं? programming च्या दृष्टीने सगळं व्यवस्थित आहे, पण मला वाटते मराठी character set किंवा wikimedia च कारण असावं. —usernamekiran (talk) १०:०७, ४ एप्रिल २०२२ (IST)
- ऱ्हस्व गुरुचे दीर्घ गुरू अपेक्षेप्रमाणे होत आहे. उदाहरणार्थ २९ मार्चला "चला हवा येऊ द्या" या लेखात बॉटने तीन ठिकाणी सोम-गुरु हा शब्द सोम-गुरू असा बदललेला दिसत आहे. Shantanuo (चर्चा) १०:४३, ४ एप्रिल २०२२ (IST)
- @Shantanuo: प्रॉब्लेम लक्षात आला. मी test घेण्यासाठी special:permalink/2073658 हि आवृत्ती वापरली होती. तिथे पहिल्या गुरु च्या शेवटी
]
होते, तर दुसऱ्या गुरु च्या शेवटी काहीच नव्हते, white space सुद्धा नाही. त्यामुळे काहीच बदल होत नव्हते. —usernamekiran (talk) १६:१०, ४ एप्रिल २०२२ (IST)
- @Shantanuo: प्रॉब्लेम लक्षात आला. मी test घेण्यासाठी special:permalink/2073658 हि आवृत्ती वापरली होती. तिथे पहिल्या गुरु च्या शेवटी
- त्या टेस्टमध्ये तुम्ही रेग्युलर एक्स्प्रेशन वापरून पहा. \ गुरु$ गुरूच्या आधीची स्पेस एस्केप केली आणि शब्दाच्या शेवटी डॉलर $ चिन्ह टाकले तर त्या दोनपैकी एक गुरु जाळ्यात येईल. :) Shantanuo (चर्चा) १८:१३, ४ एप्रिल २०२२ (IST)
- मला regex चा खूप कमी अनुभव आहे,जवळपास नसल्यातच जमा आहे. मी एक-दोन दिवसांपूर्वीच ऑनलाइन हा प्रश्न विचारला होता. तिथे मला एकच प्रतिसाद मिळाला:
'replacements': [ ('गुरु_ ', 'गुरू_'), ],
ऐवजी ( _ = space) पुढील regex वापरून बघावा असा.
'replacements': [ ('(?<=[^\w]|^)गुरु(?=[^\w]|$)', 'गुरू'), ],
- शब्द केवळ गुरु
- preceded by any character that's not a word character
[^\w]
, or the start of the line^
- followed by any character that's not a word character
[^\w]
, or the end of the line$
- हे चालेल का? मला वाटते कि हे regex मराठी अक्षराला सुद्धा अक्षर ग्राह्य धरणार नाही, कारण ते इंग्रजी नाही. मी लवकरच प्रयोग करून बघेल.
- आपल्याला 'गुरु_ ' शिवाय काहीतरी दुसरा उपाय शोधावा लागेल. कारण गुरू जरी वाक्याच्या शेवटी येणारा शब्द नसला, तरी इतर शब्द वाक्याच्या शेवटी, किंवा एखाद्या चिन्हाच्या आधी येऊ शकतात (उदा.
: / ) - ?
) "चला हवा येऊ द्या" या लेखावर सुद्धा तसे पहिले तर बुध/गुरु/शुक्र असायला पाहिजे होते, योगायोगाने तिथे space होती. —usernamekiran (talk) १६:२०, ५ एप्रिल २०२२ (IST)- @Shantanuo: "look behind requires fixed width pattern" asa error yetoy. —usernamekiran (talk) १६:३७, ५ एप्रिल २०२२ (IST)
- गुरु(\ |\?|\!|\-|\[|\]|\(|\)|\/|$) Shantanuo (चर्चा) ०९:२०, ६ एप्रिल २०२२ (IST)
migration
संपादन@Shantanuo: Currently I am on stretch grid. It is being migrated. I will move to buster grid. wikitech:News/Toolforge Stretch deprecation मला वाटते जोपर्यंत migration व्यवस्थितरीत्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपण जोखीम असलेले संपादने/regex टाळावीत. मी दोन वेग-वेगळे crontabs तयार केले होते, एक पूर्ण लेख नामविश्वासाठी, तर दुसरा केवळ विकिपीडिया:धूळपाटी/KiranBOT II साठी. आपल्याला तिथे काहीपण प्रयोग करता आले असते. migration successful झाल्याचं confirmation मिळेपर्यंत जसं आहे तसं चालवता येईल. जोखीमवाले प्रयोग करता येतील की नाही हे आज crontab सोबत काही प्रयोग करून उद्या कळवतो. —usernamekiran (talk) २१:२५, ८ एप्रिल २०२२ (IST)
- धूळपाटीवर प्रयोग करण्याची आपली सूचना चांगली आहे. पण काही वेळा सर्व शक्यता विचारात घेता येत नाहीत. एस. क्यु. एल. मध्ये limit 100 असे लिहून मर्यादित रिझल्ट पाहता येतात. तसे बॉटला "फक्त १०० पाने बदलून दे" असे काही सांगता येते का? म्हणजे काही चूक झाली तर ती १०० पाने पूर्वपदावर आणणे सोपे होईल. :) Shantanuo (चर्चा) ११:०७, ११ एप्रिल २०२२ (IST)
sections
संपादन@Shantanuo: मी माझ्या computer वर sections प्रमाणे नवीन फाईल तयार केली. त्याचे माहितीपत्रक सदस्य:KiranBOT II/sandbox वर आहे. नवीन फाईल वापरून मी सगळे बदल करून बघितले, मला काहीच अडचण जाणवली नाही. तुम्हाला काही शंका/प्रश्न/आक्षेप नसेल तर मी ती फाईल server वर अपलोड करेल. त्या file करवी केलेले बदल इथे आहेत. —usernamekiran (talk) २०:५१, ११ एप्रिल २०२२ (IST)
बरेच मुद्दे आहेतः
- यातील बरेचसे शब्द मीच सुचविलेले होते पण त्या चुका इथले सदस्य नेहमी करत नाहीत. उदा. बद्दलुन → बदलून ही नोंद तेव्हा आवश्यक होती. रोजच्या स्क्रिप्टमध्ये अशा शब्दांना स्थान नसावे.
- गट १ , गट २ अशी नावे दिली तर वर्गवारीचा मूळ उद्देशच असफल होईल. "जुने शब्द" किंवा "बॅकअपमधून" अशी नावे दिली तर त्या शब्दांचे मूळ कळेल.
- _नी_ हा शब्द "वेलांटी" आणि "दोन शब्दांमधील जागा" या दोन्ही विभागात कसा?
- 'सोव्हियेत', > 'सोव्हिएत' ही नोंद मी सुचविली होती. पण मला यावर अधिक अभ्यासाची गरज वाटते आहे. तो शब्द स्क्रिप्टमधून काढावा किंवा "शहराचे अचूक नाव" या विभागात ठेवावा.
- "तत्त्व आणि नेतृत्व" या विभागातील शब्द कुठे आहेत? ते शब्द नेहमीच्या वापरातील आहेत.
- "गुरूचा उकार" या विभागात पहिली नोंद "गुरु_ → गुरू_" अशी असेल तर इतर शब्दांची गरज नाही. जर "गुरु → गुरू" अशी नोंद असेल तरच पूर्वपदावरील गुरु शब्द ऱ्हस्व करावा लागतो. कारण त्यात सर्व ठिकाणचा गुरु बदलला जातो.
- "नियम ८.१" खाली आणखी बरेच शब्द येणार आहेत. स्क्रिप्टची लिमिट काय आहे? की ते शब्द वेगळ्या फाईलमध्ये ठेवणार आहात?
Shantanuo (चर्चा) १२:०६, १२ एप्रिल २०२२ (IST)
- १ आपण स्क्रिप्ट मध्ये जेव्हा एखादा नवीन शब्द टाकतो तेव्हाच botची संपादने जास्त होतात. नाहीतर दहापेक्षा जास्त संपादने होत नाहीत. मला वाटते जेवढ्या संभावित चुका आहेत, तेवढ्या सगळ्या स्क्रिप्ट मध्ये नेहमीसाठीच राहू द्याव्यात.
- ७ व २: स्क्रिप्टला code च्या lines, find-replace च्या entries, किंवा तत्सम काही लिमिट नाहीये. स्क्रिप्ट/program server ची किती RAM/processor वापरतोय त्यावर लिमिटेशन आहे. एकाच वेळेस पूर्ण स्क्रिप्ट run करण्याऐवजी section नुसार रन केली तर server चे resources जास्त वापरल्या जाणार नाहीत, असा माझा हेतू होता. जर sections तयार करायचेच आहेत तर व्याकरणाच्या नियमांनुसार केले असता आपल्याला प्रत्येक section व्यवस्थित अशी edit summary सुद्धा देता येईल असा मी विचार केला. जे शब्द नियमात बसत नव्हते असे शब्द मी गट १ व २ मध्ये टाकले. जे शब्द नियमात बसत नव्हते असे शब्द मी गट १ व २ मध्ये टाकले. उदाहरणार्थ हा बदल. जर शहराचे नाव बदलण्यात आले, तर edit summary "शुद्धलेखन — शहराचे अचूक नाव" अशी, व "शहराचे अचूक नाव" याला सदस्य:KiranBOT_II मधल्या योग्य त्या section ची लिंक असेल (नंतर सदस्य:KiranBOT_II/typos#शहराचे_अचूक_नाव).
- ३: "नी" हा शब्द फक्त "दोन शब्दांमधील जागा" इथे पाहिजे, तिथे टाकतो. नजरचुकीमुळे आला.
- ४: खात्री होईपर्यंत सोव्हिएत हा शब्द स्क्रिप्टमधून काढतो. खात्री झाल्यावर "शहराचे अचूक नाव" मध्ये टाकू.
- ५: मी आधी फक्त तुम्ही पाठवलेल्या "updated" file मधील शब्द टाकले. दुसरे काही राहिलेत, ते लवकरच टाकेल.
- ६: तुमचं बरोबर आहे. "गुरु_ → गुरू_" व "गुरु → गुरू" ह्या दोघांचीच गरज आहे. "उकार" ह्या section मध्ये टाकू का?
- ७: पुन्हा, पण किंचित वेगळं: स्क्रिप्ट run झाल्यावर विकिपीडियाच्या सगळ्याच लेखांमध्ये (सध्या जवळपास ८४,०००) search (व edit) करण्यास एक ते दीड तास लागतो. जर नियम ८.१ चा section खूप मोठा होत असेल तर तो section स्वतंत्रपणे run करत. म्हणजे सध्यातरी ७ sections ९:३० वाजता, ८ सेकशन्स ११:३० वाजता, व सोळावा म्हणजे ८.१ चा section रात्री दीड वाजता run करता येईल. सध्या आपण संपूर्ण स्क्रिप्ट एकदाच run करतोय, तरी काही अडचण आली नाहीये. म्हणजे ८.१ चा section कितीही मोठा झाला तरी अडचण लागलीच येणार नाही. जेव्हा अडचण येईल, तेव्हा अडचणीच्या अनुषंगाने उपाय करता येईल. —usernamekiran (talk) २२:३७, १२ एप्रिल २०२२ (IST)
- स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद. मला सर्व मुद्दे समजले. फक्त 'गुरु’ शब्दाचे तुम्ही काय करणार हा मुद्दा समजला नाही. जर "गुरु_ → गुरू_" ही नोंद घेणार असाल तर "उकार" विभागात ठेवता येईल. पण "गुरु → गुरू" ही नोंद देखील घेतली तर गुरुवार शब्द बदलून गुरूवार असा दीर्घ होईल. अशा वेळेला पूर्वपदावरील सर्व शब्द घ्यावे लागतील. Shantanuo (चर्चा) ०९:३५, १३ एप्रिल २०२२ (IST)
- मला "गुरु_ → गुरू_" व "गुरू → गुरु" असे म्हणायचे होते. जर गुरु एखाद्या शब्दानंतर आला तर त्याचा उकार कोणता असतो? उदा: महागुरू कि महागुरु? जर एखाद्या व्यक्तीचे टोपण नाव नाव+गुरु असे असेल तर? उदा: भारत कुलकर्णी धानोरकर उर्फ भारतगुरू कि भारतगुरु? —usernamekiran (talk) २२:२७, १३ एप्रिल २०२२ (IST)
- गुरू मधला रू शब्दाच्या शेवटी (स्पेसच्या आधी) आला तर तो दीर्घ आणि शब्दाच्या अधेमधे आला तर ऱ्हस्व. म्हणून महागुरू, भारतगुरू, विश्वगुरू हे सर्व दीर्घ, पण गुरुवार, गुरुपद, गुरुदेव यात मात्र रु पहिला आहे. गुरू शब्द शेवटी आला तरी त्यानंतर स्पेसच येईल असे काही जरुरी नाही. स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह असे काहीही त्यानंतर येऊ शकते. म्हणून
- गुरु_ > गुरू_
- गुरु$ > गुरू$
- गुरु? > गुरू?
- गुरु! > गुरू!
- गुरु. > गुरू.
- $ हे चिन्ह गुरु शब्द लेखाच्या अगदी शेवटी आला तर मॅच होईल. हे एक महत्त्वाचे रेग्युलर एक्स्प्रेशन आहे. स्वल्पविराम, पूर्णविराम काही वेळा एस्केप करावे लागतात. \, किंवा \. असे. Shantanuo (चर्चा) ०९:३६, १४ एप्रिल २०२२ (IST)
- "नी" हा शब्द फक्त "दोन शब्दांमधील जागा" इथे पाहिजे, तिथे टाकतो. नजरचुकीमुळे आला. असे आपण म्हटले आहे. पण मग खूप ठिकाणी नी बदलून नि असा कसा झाला? उदा. वंगारी_मथाई&diff=prev&oldid=2089953 ठीक आहे. आता तो _नि_ > नी_ असा बदलून दोन शब्दांमधील जागा भरून काढू शकता ! ही नोंद "corrections" विभागात केली तर बॉटच्या चुका दुरुस्त केल्याची नोंद राहील. Shantanuo (चर्चा) १२:१३, १७ एप्रिल २०२२ (IST)
योग्य रकार
संपादननमस्कार. "उपयोगार्ह" योग्य कि "उपयोगाऱ्ह"? special:diff/2111435. —usernamekiran (talk) २१:२०, १६ मे २०२२ (IST)
- माझ्या मते उपयोगार्ह हे योग्य आहे. फोड=उपयोग+अर्ह संतोष गोरे ( 💬 ) २२:५२, १६ मे २०२२ (IST)
- Yes, you are correct. I have updated the list. Shantanuo (चर्चा) १०:०१, १७ मे २०२२ (IST)
नवीन bot
संपादन@Shantanuo: नमस्कार. मी हे बऱ्याच दिवसांपूर्वी सुचवणार होतो, पण राहून गेलं. आपल्या दोघांचा online येण्याच्या वेळा वेगळ्या असल्यामुळे, व इतर कारणांमुळे आपल्याला म्हणावं तसे प्रयोग करता येत नाहीयेत. जर तुम्ही bot सुरु केला, तर तुम्हाला प्रयोग करणे खूप सोपे जाईल, आणि म्हणावं तेवढे/तसे प्रयोग करता येतील. AWB tool वापरायला खूप सोपे आहे, आणि en:Wikipedia:AutoWikiBrowser/User_manual वर पूर्ण manual उपलब्ध आहे, आणि मला त्याचा खूप अनुभव आहे. bot flag मिळाला तर डेस्कटॉप वर python bot इन्स्टॉल करता येतो, आणि तुम्हाला python बद्दल आधीच भरपूर अनुभव आहे. दोन्ही bot साठी एकदाच परवानगी व एकच नवीन खाते लागेल. फक्त तुमच्या userspace व धुळपाटीवर प्रयोग करण्यासाठी bot फ्लॅग सहजतेने मिळेल, आणि वेगवेगळे व भरपूर प्रयोग करणेसुद्धा सुकर होईल. तुमच काय मत आहे? —usernamekiran (talk) २३:११, १८ मे २०२२ (IST)
- मला बॉटचा (किंवा इतर कोणताच) विशेषाधिकार नको आहे. त्याला कारणे बरीच आहेत. त्यातील काही निवडक कारणे खाली देत आहे.
- 1) मला सध्या वेळ असला तरी पुढे अजिबात वेळ मिळणार नाही. तसेच माझा सहभाग फक्त शुद्धलेखन या एकाच विषयाशी संबंधित आहे.
- 2) मी फक्त विकीपुरता विचार न करता पूर्ण मराठी भाषेच्या संदर्भात विचार / सूचना करतो. विकीच्या तत्त्वांशी एकनिष्ठ राहणे मला जमणार नाही.
- 3) तुम्ही केलेल्या मार्गदर्शनामुळे आणि प्रोत्साहनामुळे मी काही काम करू शकलो. मॅनॅजमेंटमधील इतर कोणाशीही माझे जराही पटत नाही.
- मला वाटते मी तुमचे विचार थोड्याफार प्रमाणात समजू शकतो, आणि थोड्याफार प्रमाणात सहमत सुद्धा आहे. थोडक्यात सांगायचे तर, तुम्ही आणि मी आणि इतर कोणीही wikipedia शी बांधील नाही. हा bot तयार करण्यामागे हेसुद्धा एक कारण आहे - यदा कदाचित भविष्यात जर माझी येथील सक्रियता कमी झाली किंवा पूर्णपणे थांबली तरी ह्या bot ची संपादने व शुद्धलेखन अवितरतपणे चालावी अशी माझी अपेक्षा आहे.
- तुम्ही यादी सुचवण्यापूर्वी माझी यादी खूप बालिश व अविकसित होती. केवळ तुमच्या मदतीमुळे व प्रोत्साहनामुळे ती आजच्या स्वरूपात आली आहे. जर मला तुमचे मार्गदर्शन असेच मिळत राहिले तर मला वाटते ह्या यादीमध्ये जवळपास सगळ्याच संभाव्य चुका समाविष्ट होतील.
- जर तुम्ही AWB आणि/किंवा python bot वापरून केवळ तुमच्या userspace मध्ये (user:Shantanuo/sandbox) किंवा विकिपीडिया:धूळपाटी/KiranBOT II वर फक्त शुद्धलेखन संदर्भात प्रयोग केले असता कोणाला काही आक्षेप किंवा अडचण असेल असे मला वाटत नाही. सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला हवं तेव्हा, हवे तसे व हवे तितके प्रयोग करून बघता येतील. मला वाटते तुम्ही AWB तरी वापरून बघावं. शेवटी निर्णय तुमचाच आहे. —usernamekiran (talk) १०:१५, २० मे २०२२ (IST)
टंकभेद की लेखनभेद
संपादन"अधिक माहिती" या दुव्यावर क्लिक केली की "typos#टंकभेद” या दुव्यावर नेले जाते. पण तो दुवा अस्तित्त्वात नाही. त्याबदली “typos#लेखनभेद" येथे नेले गेले पाहिजे. Shantanuo (चर्चा) १०:४७, ३१ मे २०२२ (IST)
- केले. —usernamekiran (talk) ००:२५, ५ जून २०२२ (IST)
एअरलाइन्स सुधारणेविषयी
संपादनगट २ मधील "एरलाइन्स → एअरलाइन्स" ही नोंद कमेंट करावी. वास्तविक "एअरलाइन्स" हाच शब्द सर्वानुमते बरोबर असला तरी दोन बॉट्सच्या माध्यमातून "एडिट वॉर" होऊ देऊ नये. Shantanuo (चर्चा) ११:११, ३१ मे २०२२ (IST)
- केले. —usernamekiran (talk) ००:२६, ५ जून २०२२ (IST)
github
संपादन@Shantanuo: Hello. I created "mediawiki-bots" repository, and created replacebot.py with the correct version. I was updating a similar file in the past, but later I deleted it. —usernamekiran (talk) २२:०१, १५ जून २०२२ (IST)
- github वरील तुमच्या मदतीसाठी खूप खूप आभार. —usernamekiran (talk) ००:०४, १८ जून २०२२ (IST)
फेर पडताळणी
संपादनतसं बघितलं तर माझाही मराठी व्याकरणाचा सखोल अभ्यास नाही. दहावी पर्यंत शाळेत होतं तेवढंच. वाचन भरपूर आहे, पण व्याकरण/शुद्धलेखनाचा अभ्यास जास्त नाही. आपण जे काम करतोय, त्यासंदर्भात आपल्याला कुठे माहिती मिळू शकेल का? एखादं पुस्तक किंवा वेबसाईट? किंवा एखादी संस्था? —usernamekiran (talk) २२:२०, १० जून २०२२ (IST)
- मी अरुण फडके यांचे "शुद्धलेखन ठेवा खिशात" हे मोबाईल ॲप व "मराठी लेखन कोश" हे पुस्तक प्रामुख्याने वापरतो. त्यातून अपेक्षित माहिती मिळाली नाही तर क्वचित इतर काही कोष देखील वापरतो.
- "ज" आणि अभय नातू हे दोन तज्ज्ञ विकीचे सदस्य आहेत. त्यातील "ज" यांनी त्यांचे लिखाण काही कारणाने थांबविले आहे तर अभय नातू यांच्याबरोबरचा संवाद मी माझ्या बाजूने थांबविला आहे. मराठीचे इतर कोणी जाणकार माझ्या माहितीत नाहीत. असले तरी ते अशा चर्चा वाचत नसावेत किंवा त्यांना अशा चर्चेत रस वाटत नसावा. Shantanuo (चर्चा) ०९:४९, ११ जून २०२२ (IST)