Janavigyan
गावांची नावे
संपादननमस्कार,
मराठी विकिपीडियावरील शीर्षकलेखन संकेतांनुसार कृपया गावांच्या नावामागे प्रत्यय लावू नये. त्याच बरोबर मथळ्यांचे लेखन व्यवस्थित करावे.
याची लगेचच दखल घ्यावी.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १२:०४, ११ जून २०२३ (IST)
- कृपया सूचनांचे पालन करावे. आपण परत एकदा मरकागाव हा लेख हलविल आहे. लेख नाव तसेच लेखातील मजकूर हा विश्वकोशीय असावा असे अपेक्षित आहे.- संतोष गोरे ( 💬 ) १०:३८, १२ जून २०२३ (IST)
- नमस्कार,
- आपण माझ्या कामाचे परिशीलन केले यासाठी धन्यवाद.
- शीर्षकातील गावांची नावे सरकारी नोंदी प्रमाणे आहेत. त्यात कुठे प्रत्यय लावला असल्यास नेमकेपणाने दाखविल्यास आभारी होईन.
- कंसातील तालुका व जिल्ह्यांच्या नावाला प्रत्यय म्हणता येणार नाही हे आपणाला देखील मान्य व्हावे.
- या पुढील कामासाठी शीर्षकाबाबत विचार सुरू आहे.
- एव्हाना आपण माझ्यावरील निर्बंध काढला असावा ही अपेक्षा.
- सस्नेह, Janavigyan (चर्चा) १३:१८, १२ जून २०२३ (IST)
आपली संपादने
संपादननमस्कार, आपली संपादने छान चालू आहेत. गावांच्या लेखात नसलेल्या सुविधा काढल्यास अजून बरे होईल. तसेच सलानटोला चक या लेखातील मी केलेला बदल पहावा. यात {{संदर्भनोंदी}} ऐवजी
== संदर्भ ==
{{संदर्भ यादी}}
असे जोडले आहे आणि हेच अपेक्षित आहे.
- संतोष गोरे ( 💬 ) १९:५०, ५ जुलै २०२३ (IST)
- एका कल्याणकारी राज्यात नागरिकांना काय सुविधा असाव्यात याचे जणू चित्रणच सेन्सस मध्ये आलेल्या मुद्दयात असते असे मी समजतो. प्रत्यक्षात गडचिरोली सारख्या दुर्लक्षित भागात काय स्थिती आहे हे नागरी-सभ्य समाजापुढे यावे हाच माझा उद्देश्य आहे. या भागात मी गेली २५ वर्षापेक्षा जास्त काळापासून वास्तव्य /संपर्क ठेऊन आहे. या लेखांच्या आधारे काही आदिवासी तरुण मित्र त्या भागात जाणीव जागृती करतील असे आम्ही योजतो आहोत. अश्या प्रकारची माहिती विकिपीडियाच्या माध्यमातून प्रकाशात आणल्याने विकिपीडियाला कुठलाच उणेपणा येणार नाही किंबहुना तो वास्तवाचा आरसा होईल अशी माझी खात्री आहे. धन्यवाद. Janavigyan (चर्चा) २२:४७, ५ जुलै २०२३ (IST)
विकिपीडिया आशियाई महिना २०२३
संपादनप्रिय विकिसदस्य,
विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.
प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.
जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संतोष गोरे , संदेश हिवाळे किंवा टायविन यांना संपर्क करावा.
धन्यवाद.
- आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.