@अभय नातू: नमस्कार, अभय जी... मी आपल्या मराठी विकिपीडियाचा नवीन संकलन सभासद आहे. मी गेले २-३ दिवस सर्व नवीन , जुने लेख, लोकांची संकलने यांवर नजर मारत होतो, मारता मारता असं आढळलं, इथे खूप पाय खेचाखेची सुरु आहे, अर्थात मराठी बांधवांची सवयच आहे ती. जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही असो! तर सर्व बघता बघता वगळायचे लेख, विनंत्या अशा पानांवर येऊन ठेपलो, विचार केला ह्यात सुधारणा करता येऊ शकते, पण सर्व पाहिल्यावर ह्या निष्कर्षावर पोहोचलो कि इथे लेख उपलब्ध संदर्भ / दुवे अर्थात सोअर्सेस वेबलिंक्स महत्वाच्या नाहीत. कोण जास्त काळ ह्या विकिपीडियावर काम करतो त्याचे लेख इथे रहातात ... तसेच काही निबंध सदृश्य लेख आहेत जे वगळायला प्रलंबित आहेत, काही लेख आहेत जे मध्यम म्हणजे बी किंवा सी दर्जाचे पण काही दुव्यासकट आहेत पण वैयक्तिक रोषाने उल्लेखनीयता नावाने प्रलंबित आहेत, जे कि विकिपीडियाच्या अर्थात इंग्लिश विकीच्या नियमात बसतात... काही संकलक ओरडून सांगून पण ते अश्या साच्यात प्रलंबित पडतात. मला वाटते एकदा आपण स्वतः या गोष्टीत लक्ष घालून हे सर्व लेख वगळणे किंवा ठेवणे हे मार्गी लावणे गरजेचे आहे. तसेच सर्व लेखांना उल्लेखनीय उदा. राष्ट्रीय स्तरावरील डिजिटल वृत्तपत्राचे संदर्भ अत्यावश्यक करावेत हि सूचना आहे. तसेच आपल्या ह्या 'स्व-घोषित' प्रशासकांना पानांवर उगाचच उल्लेखनीयता , जाहिरातबाजी तत्सम साचे टाकण्यापासून बंदी घालावी, लागलेच तर त्यास तसे केल्यास काही कालावधी साठी संकलना पासून दूर ठेवावे. पटल्यास पहा, कदाचित मराठी विकिपीडिया सुंदर बनू शकेल . AnishJog (चर्चा) २२:२०, ८ मे २०२० (IST)Reply

नमस्कार,
मराठी विकिपीडियावर लक्ष घालून त्यातील त्रुटी दाखवून दिल्याबद्दल, त्यापेक्षाही त्यावर उपाय सुचवल्याबद्दल धन्यवाद.
येथील संपादक तुम्ही उद्धृत केलेल्या समस्या व इतरही अनेक समस्यांमधून मार्ग काढत तुटपुंज्या बळाने काम करीत मराठी विकिपीडिया पुढे नेत आहे. त्यात तुमचे योगदान मिळेल अशी आशा आहे.
सुरुवात म्हणून येथे लिहिलेल्या समस्यांची एखाद्या प्रकल्प पानावर यादी करावी. तेथून त्यांचे प्रायोरिटायझेशन करुन प्रत्येक समस्या सोडविण्याची मोहीमच सुरू करता येईल. आपली मुख्य समस्या हे मर्यादित मनुष्यबळ आहे तरी असे केल्याने सगळ्यात महत्वाच्या कामांना आधी गती देता येईल.
तुमच्या मजकूरावरुन तुम्हाला इंग्लिश (किंवा इतर) विकिपीडियावर अनुभव असल्याचे जाणवते तरीही या कामात मदत लागल्यास निःसंकोच साद द्यावी.
पुन्हा एकदा धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०३:०९, ९ मे २०२० (IST)Reply

@अभय नातू: आपल्या पुनः संदेशाबद्दल शतशः धन्यवाद! सकाळ पासून काही पाने पहात होतो, साचा:मृत्यू दिनांक आणि वय हे पण पाहताना व्याकरणात चुका आढळल्या, तसेच आपल्या, चावडीच्या चर्चा विभागात पहाताना काही संदेश वाचन केले. सगळे हेवे दावे पहिले. मला वाटते आपण काही सदस्यांना मोकळीक दिलेली आहे त्यांना लगाम घालणे गरजेचे आहे, काही सदस्य हेवे डाव्यांतून स्वतःचे सुंदर लिखाण सोडून दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालण्यात गुंतले आहेत. शुद्धलेखन खूप महत्वाचे आहे. तर 'साचा:मृत्यू दिनांक आणि वय' हे पान सुरक्षित असावे कारण त्यात फक्त VIEW SOURCE हा पर्याय आहे. तसेच मी वगळायचे लेख यावर काम करू इच्छित होतो म्हणून Bombay , Delhi हा लेख उघडला असता, इथे युनिकोड हवाच असा अनिवार्य केलेलं दिसत आहे, माझी सूचना आहे हा पर्याय काढून टाकावा, कारण काही प्रणाली जसे कि मॅक, उबंटू, विंडोज च्या काही प्रणाली ह्यात युनिकोड टाकूनही तो शोधला जात नाही व संपादनाचा पर्याय बंद होतो. कृपया लक्ष घालावे. तसेच या सर्व हेव्या-दाव्यात पडण्यापेक्षा मी आपणांस समस्यांची यादी इथे किंवा आपल्या चर्चा पानावर देण्याचे प्राधान्य ठेवीन. धन्यवाद. अनिश जोग (चर्चा) ११:३७, ९ मे २०२० (IST)Reply

अभय जी नमस्कार मी नुकतेच २ पानांचे साचे हटविले आहेत ती पाने पुढील प्रमाणे ; १.इस्लामिक सहकारी संघटना २.वर्ग:दिग्दर्शक - मराठी चित्रपट जर ते हटविणे योग्य असेल व दिलेले कारण योग्य असेल तर तसे सांगावे, मी स्वयंस्फूर्तीने व सवडीने सर्व लेख तपासू शकतो तसेच काही लेख हे रिकामे किंवा कोणत्याही संदर्भ शिवाय आहेत, त्यांच्या Discussion पानावर आपल्याला साद घालून हटविण्यासाठी नामनिर्देशित करू शकतो. तसे कळवावे फक्त एकच विनंती त्या साच्याच्या हटविण्यावरून नंतर कोठलेही राजकारण झाले तर त्यात माझा बद्दलकोणताही पूर्वग्रहदूषित कोणीही ठेवू नये हि विनंती.

अनिश जोग (चर्चा) १८:४५, ९ मे २०२० (IST)Reply

मी वर्ग:अत्यंत छोटी पानेवर्ग:रिकामी पाने या वर्गातील काही लेख सुधारले होते, परंतु विकिपीडिया वरील अतिवाद्यांच्या वादावादीला कंटाळून हे काम बाजूला पडले. जर सर्वांचे थोडे थोडे सहकार्य लाभले तर आपण यात मोठी सुधारणा करुन लेखांचा किमान विस्तार करु शकतो. सदरील वर्गांत काही महत्त्वाचे लेख आहेत ज्यांचा विस्तार व्हायला हवा, व इतर जे लेख उल्लेखनीय नाहीत, त्यांना हटवायला हवे. पण या दरम्यान लेख निर्मिती ही जोमाने व्हायला हवी. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २०:१३, ९ मे २०२० (IST)Reply

@अभय नातू:@Sandesh9822: ह्या वर्गांनी तर काम फारच सुलभ केले आहे. चला काही का होईना लेख त्याची पाने हे सुधारणे गरजेचे आहे, तसेच संदेशजी मला वाटते हि वादावादी दुर्लक्षित करा, आपण आपले काम योग्य करायचे बस्स... आपले अभय सरांचे मार्गदर्शन महत्वाचे आहे. मी केलेला बदल आपणांस रुचला का? असेल तर आता रिकाम्या लेखात संदेशजींनी सुचविला तसा वर्ग टाकू व उल्लेखनीयता साचे हटवून टाकू, ज्यांच्यात बाकी असतील ते प्रशासक/प्रचालक मिळून हटवतील चालेल? तसेच मला वाटते प्रत्येक लेख साचा हटविण्यापूर्वी त्यातील गुणवत्ता व मुख्यत्वे त्याच्यातील संदर्भ, दुवे हे नीट तपासून पाहावे, जर ते खरंचच खरे व चांगले असतील व लेख उल्लेखनीय असेल तर आणि तरच तो ठेवण्यात यावा. तसेच त्याचे काही गुणवत्ता तक्ता निकष आहेत, जे विकिपीडिया:उल्लेखनीयता येथे आधीपासून आहेत, ते तंतोतंत तपासूनच आपण पुढे जाऊयात व त्या गोष्टीचा एक छोटा लेखाजोगा अर्थात रिपोर्ट त्या लेखाच्या Discussion पानावर नोंदवुयात चालेल? अनिश जोग (चर्चा) २२:२८, ९ मे २०२० (IST)Reply

तुमची संपादने पाहिली. ती योग्यच आहेत.
वरील लेखनातून पुढे आलेली कामे --
१. {{मृत्यू दिनांक आणि वय}} मधील व्याकरण बदलणे. हा साचा सुरक्षित असला तरीही त्यातील मजकूर आपल्या धूळपाटीवर (सदस्य:AnishJog/धूळपाटी/साचा:मृत्यू दिनांक आणि वय}} घालून तेथे प्रयोग करावे. योग्य ते बदल झाल्यावर मला साद घालावी. ते बदल एकदा नजरेखालून घालून मुख्य साच्यात स्थलांतरित करता येतील. येथील सदस्य @Tiven2240: हे सुद्धा तांत्रिक गोष्टींत निष्णात आहेत तरी त्यांचीही मदत घ्यावी.
२. शुद्धलेखन - आपण बदल करीत असलेल्या लेखांतील शुद्धलेखन, व्याकरण बदलावे. शक्य असल्यास एखादा सांगकाम्या तयार करुन त्याकडून अशी रपेटीची कामे करुन घ्यावीत. यासाठी AWB हे सॉफ्टवेर मला उपयोगाचे वाटते.
३. विकिपीडिया अनेक ऑपरेटिंग सिस्टम, आणि हार्डवेर वर वापरले जात असल्याने बव्हंश ठिकाणी वापरली जाणारे म्हणून युनिकोडला आपण सहसा प्राधान्य देतो. मॅक किंवा उबंटुवर नेमक्या काय अडचणी आहेत हे कळविल्यास त्यावर उपाय योजता येतील. वेळप्रसंगी विकिमीडियाच्या डेव्हलपरकडून बदलही करुन घेता येतात. टायवीन यांनी अनेकदा असे बदल करुन घेतलेले आहेत.
४. मराठी विकिपीडियावर आपण शुद्धलेखन, व्याकरण, इ. चा आग्रह धरीत असलो तरीही अतिआग्रह नाही. आपला पहिला उद्देश आहे तो अधिकाधिक संपादक मिळवणे. यासाठी प्रमाण मराठी न लिहिणाऱ्यांचेही योगदान आपल्याला हवे. त्यांनी आणलेली माहिती सुधारणे सोपे आहे पण ही माहिती मिळवणे कठीण. तरी अशा गोष्टी इकडच्या तिकडे झाल्या तरीही त्याकडे नाक न मुरडता (हे फक्त साधारण विधान आहे. तुम्ही असे केले हे मुळीच म्हणणे नाही!) अशा योगदानाचे आपण स्वागत करतो आणि अशा नवीन संपादकांना त्यांचे योगदान कसे अधिक चांगले होईल यासाठी मार्गदर्शन करतो. असो.
ही कामांची यादी येथेच ठेवली तर ती चर्चेमध्ये हरविण्याची शक्यता आहे तरी त्यासाठी वेगळे पान करावे असे वाटते.
अभय नातू (चर्चा) २३:२५, ९ मे २०२० (IST)Reply


@अभय नातू: संपादनाच्या प्रमाणाबद्दल धन्यवाद, {{मृत्यू दिनांक आणि वय}} वर आजच काम सुरु करतो व आपणांस झाल्यावर कळवितो.अभय दादा किती छान लोकं आपल्याकडे आहेत, आता आपल्याला समस्या माहित आहेत, तांत्रिक निष्णात साथीदार आहेत,तरी मग आपण का मागे आहोत?????? @Sandesh9822: यांनी काम उत्तम केलेले दिसले. @Tiven2240: यांचा चरित्रात्मक लेख वाचला ते सर्वच विकिपीडियावर प्रशासकीय सेवेत असल्याचे दिसले मला वाटते सर्वानी एकत्र येऊन ह्या समस्या सोडवायला हव्यात. मला वाटते ह्यां दोन मित्रांसारखे अजून २-४ संपादक सवंगडी इथे नक्की असतील, आपण हे नक्कीच सुधारित करू शकू. संदेशजी, टायवीन जी चला हे योग्य कार्य करूयात मला वाटते आपण जास्तीत जास्त लेखांची गुणवत्ता पाहूया. ज्यात विकिपीडिया:उल्लेखनीयता चे निकष पालन करूयात. तसेच खालील मुद्द्यांवर काम करूयात. १. लेखांचे व्याकरण २. शुध्द्लेखन ३. मॅक व उबंटू वर देवनागरी कीबोर्ड घेतला कि येणारी मुख्य समस्या म्हणजे ते कीबोर्ड हे गुगल इनपुट साधना सारखे नाहीत, त्या मुळे ते वापरता येत नाहीत व त्या अभावी या प्रणालीवर काम करणारे लोक काही लेख संपादन करू शकणार नाहीत. ह्या समस्येचे निराकरण करणे गरजेचे आहे. ४. नवनवीन लोकांना इथे आणणे व त्यांना मदत करणे, या साठी मदत कक्ष सुरु करू शकू... कसा काय हे सर्वाना मिळून ठरवावे लागेल. ५. वगळायचे लेख याबद्दल मी वर नमूद केल्या प्रमाणे त्यांची तपासणी करून ते लेख कायम करणे किंवा जर तो विकिपीडिया:उल्लेखनीयता मध्ये बसत नसेल तर, discussion पानावर पुन्हा हाच साचा टाकून, तो का वगळावा याचे निष्कर्ष नमूद करणे व प्रचालक व प्रशासक यांनी त्यावर कार्यवाही करणे, त्याना ते गुणप्रमाणं झाल्याचे समजावे म्हणून, आपण एक वर्ग निर्मित करू शकू. सध्या लोकडाऊन मध्ये वेळ मिळतो आहे तो सत्कारणी लावूयात, चला मराठी विकिपीडियाला सुंदर व आकर्षक बनवूयात ! कशी वाटते कल्पना ?

अनिश जोग (चर्चा) ०७:४७, १० मे २०२० (IST)Reply

आत्ताच शिवाजी महाराज लेख वाचत होतो, संरक्षित लेख आहे. त्यात राज्याभिषेक या अनुक्रमात शेवटचे वाक्य तसेच त्याज कसडून 'करणकौस्तुभ' नामक ग्रंथही लिहवून घेतला. अशी आहेत. याच्या शुद्धलेखनावर काम करणे गरजेचे आहे, आपल्या पैकी कुणीतरी त्यात सुधारणा करावी.

अनिश जोग (चर्चा) ०८:१०, १० मे २०२० (IST)Reply

नमस्कार अनिस, विकिपीडियावर आपले इतर सदस्य खाते आहेत का? जर असले तर कृपया जाहीर करावे. धन्यवाद--Tiven2240 (चर्चा) ०९:१९, १० मे २०२० (IST)Reply

@Tiven2240: नमस्कार, माझे विकिपीडियावर हे सोडून कोणतेही खाते नाही! आपल्या प्रश्नाचा रोख विस्तारून सांगाल का? अनिश जोग (चर्चा) १०:४१, १० मे २०२० (IST)Reply

STOP YOUR VANDALISM

संपादन

--Tiven2240 (चर्चा) ०९:३२, १० मे २०२० (IST)Reply

मी कोणत्या चित्रपटाचे संकलन केले आहे हे कृपया स्पष्ट करावे... तसेच जाहिरात कोणती केली आहे हे स्पष्ट करावे! अनिश जोग (चर्चा) १०:४१, १० मे २०२० (IST)Reply

काय केले आहे आणि काही नाही ते स्पष्ठ दिसत आहे. नेमकी विकिपीडिया हे संकेतस्थळ तुमच्यासाठी नाही. हे सर्व बंद करून काही चांगले काम करा. विकिपीडिया इथे जाहिरात व अनेक खाते उगडून नासाडी करणारी वेबसाईट नाही. तुम्ही कितीही खाते उगडा व कितीही ठिकाणी आपली जाहिरात करा मी सर्व खाती बंद करूनच राहील. समजून घेण्यासाठी धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) १०:५२, १० मे २०२० (IST)Reply

मी कशाला उगाचच खाती उघडू? तसेच आपण धमकी देत आहात का?? तसेच हवेत बोलण्यापेक्षा स्पष्ट करावे काय केली! @अभय नातू: अभयजी आपल्याकडे विकिपीडियावर वैयक्तिक धमकी, तसेच अशा गोष्टींना थारा नसतो, मान्य आहे श्री. टायवीन हे एक चांगले तांत्रिक संपादक आहेत पण हे असे धमकी देणे व अशुद्ध भाषेत बोलणे योग्य आहे का? आपला हस्तक्षेप हवा!!!!

अनिश जोग (चर्चा) ११:०२, १० मे २०२० (IST)Reply


सदस्य:DMacks , सदस्य:DeltaQuad Kindly read above posts by सदस्य:Tiven2240 Its DIRECT THREATS and ABUSE to me in MARATHI LANGUAGE! It fits for punishment as per Policy WP:ABUSE , WP:AbRep , WP:ISP This user is threatening me insisting Me as sockpuppet of some Ivan apart I had submitted article for En Wikipedia which was written as per Policty and fits in WP:AUTHOR WP:DIRECTOR and the person is article was winner of TIME GROUP Notable award he had given request to delete it and DMacks had deleted it without reading article. The article was well-written in Neutral POV. Rather I have seen the above user who is threatening is doing paid edits, I have seen his posts/advertisements mentioning his name and saying they can create wikipedia page is available of Freelancer site! Kindly take necessary action against it and help preventing everyone from such Personal Attacks and Threatening . Such users should be GLOBALLY BAN forever!!!!