बोधकथा 1} एका श्रीमंत गृहस्थापाशी एक पोपट होता. त्या पोपटास त्याने एका मोठ्या व सुंदर पिंजऱ्यात ठेवलेे होते व तो त्यास उंची फळफळावळ खावयास घालीत असे. त्या पोपटास येथे सर्व सुखे अनुकूल होती. तथापि तो मनात नित्य झुरत असे व म्हणे, की "माझे भाऊबंद जसे स्वेच्छेने या राईतून त्या राईत व या खांदीवरुन त्या खांदीवर उड्या मारतात, तसे जर मला करावयास सापडेल, तर किती चांगले होईल.' एकेवेळी दैववशात पिंजऱ्याचे दार उघडे राहिल्यामुळे त्या पोपटाची इच्छा पूर्ण झाली. तो त्या पिंजऱ्यातून त्वरेने बाहेर पडला व लांबच्या एका आंब्याच्या झाडावर जाऊन बसला. थोड्या वेळाने त्यास भूक लागली. तेव्हा तो इकडे तिकडे पाहू लागला.पण कोणत्याच झाडावर एकही फळ दिसेना. रात्री विजांचा चकचकाट, मेघगर्जना होऊन पाऊस पडण्यास सुरुवात झाली. त्या बिचाऱ्या पोपटाचे हाल आता कुत्रे खाईना. त्याला असल्या स्थितीची जन्माची सवय नव्हती. शेवटी पाण्याने भिजून व थंडीने काकडून त्याने तिथे प्राण सोडला. मरता मरता तो म्हणाला,"मला जर फिरुन पिंजऱ्यात जाता येईल तर त्याबाहेर पडण्याची मी पुन्हा कधीही इच्छा करणार नाही.
तात्पर्य : ठेविले अनंते तैसाचि रहावे। चित्ती असो द्यावे समाधान
2} बोधकथा एक वैदू एका जत्रेत आपली औषधे व गोळ्या लोकांस दाखविण्यासाठी बाहेर काढून बोलत बसला असता हजारो लोक त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहू लागले व त्याचे बोलणे वेदवाणीप्रमाणे ऐकू लागले. इतक्यात एक दरवेशी त्या रस्त्याने अस्वलाच्या नाकात कडे अडकवून त्यांस नेऊ लागला. लोकांचे मन या नवीन देखाव्याने आकर्षिले जाऊन त्या वैदूला सोडून अस्वलाच्या जवळ त्यांच्या झुंडीच्या झुंडी जमल्या व मोठ्या मिरवणुकीप्रमाणे ते आरडत-ओरडत त्याच्या मागून चालले. अस्वल जरी विशेष अक्कलवान प्राणी नव्हते तरी त्याने ती गडबड व आरडाओरड ऐकून मंडळीस उद्देशून विचारपूर्वक भाषण केले, की "मित्र हो, ऐका माझ्या नाकात वेसण घालून हा दरवेशी मला वाटेल तिकडे नेतो, हे पाहून तुम्ही हसता याबद्दल आनंद वाटतो. पण हे पहा, आपण आळीपाळीने एकमेकांना हसू, कारण तुम्ही देखील माझ्या इतकेच हास्यास्पद आहात. तुमचे कान धरुन हा वैदू तुम्हास वळवीत आहे व माझा धनी माझ्या नाकात वेसण अडकवून मला वळवित आहे. एवढाच आपणा दोघात फरक आहे. तात्पर्य : आपल्यामध्ये तोच दोष नाही याची खात्री करून घेतल्याखेरीज दुसऱ्याची एखाद्या दोषाबद्दल कधीही थट्टा करू नये.
अडगळीच्या खोलीमधलं
-अडगळीच्या खोलीमधलं दप्तर आजही जेव्हा दिसतं |
मन पुन्हा तरूण होऊन बाकांवरती जाऊन बसतं ||
प्रार्थनेचा शब्द अन शब्द माझ्या कानामध्ये घुमतो | गोल करून डबा खायला मग आठवणींचा मेळा जमतो ||
या सगळ्यात लाल खुणांनी गच्च भरलेली माझी वही | अपूर्णचा शेरा आणि बाई तुमची शिल्लक सही ||
रोजच्या अगदी त्याच चुका आणि हातांवरले व्रण | वहीत घट्ट मिटून घेतलेत आयुष्यातले कोवळे क्षण ||
पण या सगळ्या शिदोरीवरंच बाई आता रोज जगतो | चुकलोच कधी तर तुमच्यासारखं स्वतःलाच रागवून बघतो ||
इवल्याश्या या रोपट्याची तुम्ही इतकी वाढ केली आहे | हमखास हातचा चुकण्याची सुद्धा सवय आता गेली आहे ||
चांगलं अक्षर आल्याशिवाय माझा हात लिहू देत नाही | एका ओळीत सातवा शब्द आता ठरवून सुद्धा येत नाही ||
दोन बोटं संस्कारांचा समास तेवढा सोडतो आहे | फळ्यावरच्या सुविचारासारखी रोज माणसं जोडतो आहे ||
योग्य तिथे रेघ मारून प्रत्येक मर्यादा ठरवलेली | हळव्या क्षणांची काही पानं ठळक अक्षरात गिरवलेली ||
तारखेसह पूर्ण आहे वही | फक्त एकदा पाहून जा | दहा पैकी दहा मार्क आणि सही तेवढी देऊन जा ||
खरंच काय होते ते दिवस....
अडगळीच्या खोलीमधलं
-अडगळीच्या खोलीमधलं इवल्याश्या या रोपट्याची दप्तर आजही जेव्हा दिसतं | तुम्ही इतकी वाढ केली आहे | मन पुन्हा तरूण होऊन हमखास हातचा चुकण्याची सुद्धा बाकांवरती जाऊन बसतं || सवय आता गेली आहे || प्रार्थनेचा शब्द अन शब्द चांगलं अक्षर आल्याशिवाय माझ्या कानामध्ये घुमतो | माझा हात लिहू देत नाही | गोल करून डबा खायला एका ओळीत सातवा शब्द मग आठवणींचा मेळा जमतो || आता ठरवून सुद्धा येत नाही || या सगळ्यात लाल खुणांनी दोन बोटं संस्कारांचा गच्च भरलेली माझी वही | समास तेवढा सोडतो आहे | अपूर्णचा शेरा आणि फळ्यावरच्या सुविचारासारखी बाई तुमची शिल्लक सही || रोज माणसं जोडतो आहे || रोजच्या अगदी त्याच चुका योग्य तिथे रेघ मारून आणि हातांवरले व्रण | प्रत्येक मर्यादा ठरवलेली | वहीत घट्ट मिटून घेतलेत हळव्या क्षणांची काही पानं आयुष्यातले कोवळे क्षण || ठळक अक्षरात गिरवलेली || पण या सगळ्या शिदोरीवरंच तारखेसह पूर्ण आहे वही | बाई आता रोज जगतो | फक्त एकदा पाहून जा | चुकलोच कधी तर तुमच्यासारखं दहा पैकी दहा मार्क स्वतःलाच रागवून बघतो || आणि सही तेवढी देऊन जा || इवल्याश्या या रोपट्याची खरंच काय होते ते दिवस.... तुम्ही इतकी वाढ केली आहे | हमखास हातचा चुकण्याची सुद्धा सवय आता गेली आहे ||
स्वागत | Shivdas Shinde, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Shivdas Shinde, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,४९३ लेख आहे व १४० सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपणास विकिपीडियावर तांत्रिक गोष्टी कठीण जातात ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
नमस्कार, तुम्ही मराठी विकिपीडिया साठी महत्वाचे योगदान द्याल याची अपेक्षा आणि खात्री बाळगतो....
काही मदत लागल्यात अवश्य सांगा.....