माळवी - दापोली संपादन

क्षेत्रफळ
उंची

• २६ मी
मोठे शहर रत्नागिरी
प्रांत कोकण
लोकसंख्या
लिंग गुणोत्तर
 (2011)
१,१५० /
भाषा कुलवाडी,मराठी
कोड
दूरध्वनी

• +०२३५४
माळवी
जिल्हा रत्‍नागिरी जिल्हा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या २२६
२०११
दूरध्वनी संकेतांक ०२३५४
टपाल संकेतांक ४१५७१४
वाहन संकेतांक MH-०८
निर्वाचित प्रमुख N/A
(मालप)

साचा:Infobox actor

मुक्काम-माळवी, ता.दापोली, जि.रत्नागिरी संपादन

गावाची भयाण अवस्था संपादन

विचाराने दोघे काम करतात. गावातील माणसांच्या आरोग्यात फार फरक पडलेला जाणवत होता. अंगावर मांस न दिसणारी माणसे बदललेली दिसू लागली. महिलांमध्ये क्रांतीचा बदल दिसू लागला. गावातील माणसांच्या अंगावर कपडे, खायला अन्न पुरेसे नसायचे, एकूणच हलाखीचे जीवन जगणारी हीच माणसे आता बदलणारी दिसू लागली. बदलाने गावातील खेडूत महिला आता काही महिन्यात ओळखू न येऊ लागल्या. बोली-भाषा बदलाची बोलण्यातून दिसू लागली पूर्वी जी महिला आपली बोली-भाषा (तुका, मना, तवा-कवा, काईसा, आनी, पानी नी तांद्लाच्या गोनी, पलाला) आशा शब्दानी सुरु करायच्या त्याच महिला आज मुंबई सारखी सुधारीत भाषा बोलू लागल्या. एकूणच त्यांच्या बोलण्यातील बदल तसेच वागण्यातील बदल हा सुधारीत दिसू लागला. पूर्वीचे नेहमी बोलीभाषेचे शब्द मागे पडू लागले. गावातील सर्व वातावरणात शेतात जमिनीशी नाळ इमाने – इतबारे काम करणारी, रान-जंगल निसर्ग मना-मनात रुजविणारी, उन्हाळा-पावसाळा-हिवाळा आपलासा करून आपल्या परिवारासाठी मेहनत करणारी महिला आज मुंबई सारख्या शहरात अगदी सहज शहरसारखी झाली. हे कधी समजले ही नाही. शहरीकरण झपाट्याने वाढले पण मु.माळवी सारखी कोकणातील अनेक खेडेगावे आज ही रिकामी – भकास दिसू लागत आहेत. गावातील घरे हळू-हळू कडी कुलापत दिसू लागली, गजबजलेल्या शाळा ओंस पडू लागल्या, शाळेतील शिक्षक कमी झालेत. शेतीची कामे कमी झाली, कारण शेतीसाठी राबणारे हात कमी पडू लागलेत. गावातील लोकांना समजायला आलेलं लहानस पोर त्याचे आई-वडील त्याला शहराचा रस्ता दाखवू लागले, एकेकाळी गुरा-ढोरानी गजबजलेले जनावराचे गोठे रिकामी झाले. शेती कमी, पोटा पुरती शेती करण्याची घातक कल्पना घरा-घरात रुजू झाली. अनेकांनी जनावरांना सांभाळता येत नाही म्हणून जनावरे ही विकून टाकली. गावात दुध-दही रेलचेल असायची पण आता सध्या चहा साठी पण दूध मिळणे कठीण झाले. तर लहान मुलाने गाईचे दूध मिळणे फार दुःखाची बाब झाली आहे. काहींच्या जनावराच्या गोठ्यात फक्त नावाला बैल आहेत ते ही शेतीसाठीचे. गावातील कमी झालेली माणसे, अपुरे मिळणारे उत्प्पन त्यामुळे अनेकांनी आपली असलेली वडिलोपार्जित जमीन विकून टाकली. तर काहींनी शेतीच कमी केल्यामुळे जमिनीला जंगलाचे स्वरूप आले. पूर्वी पायदळी तुडवली जाणारी परिचित शेतजमीन वावर नसल्यामुळे आता त्या शेतात पाय ठेवणे ही घातक वाटू लागले आहे. नेहमीची चालणारी वाट ही आता पुसून गेली.माझे एकेकाळी गजबजलेले माणसांनी, जनावरांनी फुललेले गाव शहरीकरणामुळे हळू-हळू भयानक दिसू लागले. शहरीकरणाच्या रोजगार विचार बदलाने कोकणातील माझ्या गावासारखी अनेक गावे पुसली जाताना दिसू लागली.

शहराकडे ओढा संपादन

माझ्या खेड्यातील होतकरू, शिक्षण अपूर्ण तसेच टाकून रोजगारासाठी शहराचा रस्ता धरू लागला. गावाची भली मोती शेती आता उरली फक्त पोट भरण्यापुर्ती, कारण माझा गजबजलेला गाव मोकळा होताना खूप वाईट वाटते. शेतातील काम कमी झाल्यामुळे डोंगराळ भागातील शेती, करण्याची लोकांनी सोडून दिली. खर म्हणजे शेतातील अंग मेहनत कमी झाले. त्यामुळे त्या शेतात जाणाऱ्या पायवाटा आता दिसेनाशा झाल्या. रान चौफेर वाढले. पूर्वीची शेती घनदाट जंगलात रुपांतरीत झाली. घातक जनावराचा वावर वाढला. शेतीची मशागत नसल्यामुळे गावातील माणसाना सरकारी रेशन वर आता अवलंबून राहावे लागते. गावातील १० ते १२ वर्षाचा मुलगा झाला की त्याला मुंबईचा रस्ता दाखविणारे जबादार आम्हीच. शेतीसाठी माणसे मिळेनाशी झाली. शहरात रोजगार मिळतो म्हणून माझा शेती पिकावर सुखात जगणारा मुंबईतल्या लोकांना हे कधीच कळले. पण गावातील जमिनी मशागत नसल्यामुळे रखरखीत झाल्या आहेत. गावातील तरुणांनी जमिनीत (आंबा, काजू,) या सारख्या उत्त्पन्न देणाऱ्या लागवड जरी केल्या तरी गावातील जमिनी देखभाल होईल. गावच्या जमिनीची नाळ साबूत राहील. गावातील तरुण मंडळीना हाताला काम मिळेल.त्यामधूनच गावाचा विकास होण्यास सुरुवात होईल. प्रत्येक घरातील तरुण आपल्याच शेतात राबेल मेहनत करून शेती संपन्न करील. जर गावतील प्रत्येकाने शेतीच करायची हळू-हळू कमी केली तर हीच भूमाता या बळीराजावर नाराज होईल. प्रत्येकाने जमिनीचा तुकडा करायचा सोडला तर हे गावच ओसाड होण्यास वेळ लागणार नाही.

गावात शिक्षणाची पाया संपादन

१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशातून ब्रिटीश इंग्रज लोक भारत देश सोडून त्यांच्या देशात निघून गेले. सुमारे दीडशे वर्षं त्याने आपल्या देशावर राज्य केले. आपल्या देशातील लोकांनी त्यांना ‘सळो की पळो’ करून भारत देशातून त्यांची हकालपट्टी केली. आणि आपला देश स्वतंत्र झाला. १९५२ साली लोकसभेची पहिली निवडणूक झाली आणि स्वतंत्र भारताचे श्री. पंडित जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान झाले त्यांच्या कारकिर्दीत अनेक योजना आल्या. खेड्यापाड्यांचा आपला भारत देश. खेडीपाडी शिक्षणास मागास होती. कारण ब्रिटीश काळात खेड्यापाड्यात शाळा नव्हत्या. खेदेपाडी अडाणी होती. शिक्षण त्यांना ठावूक नव्हते. देशातील प्रत्येक खेड्यात शाळा असावी अशी योजना भारत सरकारने चालू केली. बंधू-भगिनीनो, आपल्या गावातील श्री.राजाराम धाडवे व श्री. गंगाराम चव्हाण अन्य लोकांनी ही योजना राबवायचे ठरविले. त्यासाठी माळवी ग्राम विकास मंडळ स्थापित झाले. सरकारकडे, शासनाकडे, अर्ज- विनंत्या केल्या. मुंबईत आझाद मैदानात त्यांची बैठक झाली. बौध्दवाडी व कुणबीवाडी एकत्र आल्या. शाळा बांधण्याचा संकल्प केला.शासनाकडून इमारत बांधण्याची मंजुरी आली. १९५८ साली इमारतीसाठी जागा नक्की झाली. सरकारकडून शिक्षकांची नेमणूक झाली.‘श्री. राजाराम धाडवे व श्री. गंगाराम चव्हाण यांचे गाव ऋणी आहोत. शाळेच्या इमारतीच्या बांधकाम चालू असताना श्री.शंकर रा धाडवे यांचा अंगणात श्री. राजाराम धाडवे यांनीरात्रीचे वर्ग सुरु करून आपला भाऊ महादेव वी धाडवे यांना शिक्षक नेमून गावातील मुला-मुलींना प्राथमिक शिक्षणा देण्यास सुरुवात केली. शाळेचे बांधकाम पूर्ण झाल्या नंतर अंगणात शिकणारे विध्यर्थी गावतल्या शाळेत भरती झाले. आणि आपली गावाची शाळा सुरु झाली. आज हेच विध्यर्थी गावकार्य करित आहेत. बंधुनो, शाळेच्या पटांगणात भलं मोठ कलम आंब्याचे झाड आहे. त्याची लागवड शाळेतील पहिल्या विध्यार्थ्यानी पाणी घालून त्याला मोठा केला. ह्याच विध्यार्थांची आठवण म्हणजे ते झाड जागृत आहे. गेली कित्येक वर्षं ह्या झाडाचे आंबे विकले जात आहेत. गावाच्या कार्याला पैसा लाभत आहे. २५ व्या श्री. रामनवमी उत्सवाच्या निमिताने ह्या सर्वांचे अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा. दिवंगत के श्री. राजाराम धाडवे आणि गंगाराम चव्हाण ह्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही गावाकडून प्रार्थना.

गावातील संघटना कार्य संपादन

गावात गाव संघटनेची गरज काय? संघटना हवी कशाला? संघटना नसेल तर काय होईल.? संघटना का निर्माण झाल्या व कश्यासाठी हा प्रश्न आपल्या मनात येत असतो. माझ्या बांधवानो, १५ ऑगस्ट १९४७ साली आपला देश स्वतंत्र झाला. इंग्रज भारतातून निघून गेले. २६ जानेवारी रोजी प्रजासत्तक दिन साजरा केला जातो. १९५२ रोजी देशातील पहिली निवडणूक पार पडली. १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाली. आणि महाराष्ट्रात पंचायत राज सुरु झाले. पंचायत राज म्हणजे ग्रामस्तरावर ग्रामपंचायत, तालुका स्तरावर पंचायत समिती व जिल्हास्तरावर जिल्हा परीषद हे स्थानिक स्वराज्य संस्थचे तीन प्रक्रार सुरु झाले. त्यामुळे खेडे-पाड्यातील रयतेचा विकास स्थानिक लोकसह्भाग साधून त्याची उन्नती करणे व त्यांचे जीवनमान उंच करणे हा सामुदायिक विकास कार्यक्रम सुरु करण्यात आला. त्यामुळे बंधुनो सरकारी योजना सार्वजनिक हिताच्या योजना प्रत्येकाला मिळत नाही तर संपूर्ण गावासाठी सरकारी योजना असतात. म्हणूनच आपल्या मु.मालवी गावाने “मु.मालवी ग्रामस्थ विकास मंडळ.” स्थापन केले. त्यामुळे मंडळ, संस्थाच्या नवे अर्ज करून विविध सरकारी योजना गाव विकाससाठी राबविण्यात येऊ लागल्या. याची दुसरी बाजू म्हणजे “गाव तेथे बारा भानगडी” गावातील चांगली सरकारी योजनाची कामे करण्यापेक्षा गावातील नकारात्मक विचाराची माणासे अनेक प्रकारची नाना अडचणी विकास कामात आणून एक तर गाव विकास होत नाही. गाव विकास बाजूला पडतो व सुरु होतो तो गावात भांडणाचा राडा, मारामारी विचाराचा भेदभाव यातून निर्माण केला जातो माणसा-माणसातून अहंकार, तर काही जण लोक फक्त बघ्याची भूमिका घेतात. आपला काय संबंध? असा विचार मनात आणून सरळ बाजूला जातात. वरील सर्व बाबीचा विचार करता सरकारी विकास योजना गावात राबविण्यापेक्षा अशा नकारात्मक विचाराने गाव विकास विचारापासून दूर दूर जातो. म्हणून माझी आपणास विनंती आहे. गावात मंडळ, संस्था खरच एक विचारी असेल. तर गाव विकास होणारच यात शंका नाही. पण हवी गावकऱ्यांची विचाराची व एक निष्ठेची साथ. यामधून होतो तो फक्त गावाचा-गावातील माणसांचा विकास.

ग्राम माहीती व बदलता विचार संपादन

आपणांस कळविण्यात आनंद होत आहे कि...मु. माळवी, हे गाव, ता-दापोली, जि,रत्नागिरी, म्हणजे आडे पंचक्रोशी केसरी खाडीच्या पवई स्थानका पासून ते लोणवडी सुमारे १कि.मी.अंतरावर उंच डोंगराच्या कुशीत दुर्गम भागात वसलेले आहे. पूर्वेला डोंगराच्या खाली शेती आहे. तसेच खाली जाण्यासाठी शाळा ते गोसमा अशी बनवलेली डाग आहे. गावातील कार्यकर्त्याने डागेनी खाली जाणारा रस्ता बनवलेला कच्च्चा आहे.यासंबंधी सरकारकडे विनंती करून ही सरकार लक्ष देत नाही. अजून गावात असुविधा तशाच आहेत. व्यापार विचारगुण अंगी बाळगताना माणुसकी सोबत ग्रामसंघटनेशी एकरूप झाला. गावात राहणाऱ्या गावकऱ्यामुळे गावातील परंपरा आज ही चालू आहेत. बांधवानो आपल्याच गावातील काही होतकरू तरुण, विविध (काजू, आंबा लागवड व खरेदी – विक्री) व्यवसाय कमी शिक्षण असूनही खूप चांगल्या प्रकारे करीत आहेत. काहीजण तर ठेकेदारी करीत आहेत. आंबा, काजू संबंधी वेगवेगळे व्यवसाय करीत आहेत. ठेकेदारीत ( नवीन घर बांधणे ) सोबत आपली ही शेती करणे, इतरांची शेतीला हातभार लावणे, तसेच काहीजण नवीन बदला सोबत वाहतूक सेवा देण्यासाठी स्वतःची रिक्षा, दुचाकी, चारचाकी – वाहन चालवून आपल्या घराला हातभार लावीत आहेत. अशा कर्तबगार गावकऱ्याचा गावच्या विकास कामात सतत सहकार्य मिळत आहे. त्यासोबत गावातील ग्रामदैवत याची पूजा-अर्चा, रिवाज प्रमाणे राखण देणे. या बाबी न चुकता होत आहेत. गावातील विकास कामे करताना गावातील प्रमुख पाणी प्रश्न समस्त ग्रामस्थानी एकजूट करून निकालात काढताने पूर्वी सारखी आता गावात पाण्याचा त्रास दूर झाला. अशा सामाजिक कामासोबत गावातील सुख-दुःखाची ही काळजी घेणारे अनेक मदतीचे हात सतत सहकार्यासाठी पुढे येत आहे. मालवी गाव हे गाव नसून एकप्रकारचा परिवार आहे. जो परीवर सर्वाना सतत सहकार्य करीत समाधाने नांदत असतो. मालवी गावची एकजूट आज ही श्री प्रभू रामचंद्राच्या कृपेने भक्कम आहे. त्यामुळे गावातील कुठल्याही, कशाही कार्याला समस्त मुंबईकर तत्परतेने धावून येतात. हीच मालवी ग्रामस्त संघटना गावातील प्रत्येकाच्या मना-मनात घर करून राहिली आहे. म्हणूनच “श्री राम नवमी” उत्सवाला समस्त मुंबईकर धाऊन येतात. मालवी गाव हा आपला समस्त परीवार असे समजतात, म्हणूनच मुंबईला दि.२६ जानेवारी व १५ ऑगस्ट या दिवशी सर्व मालवी परीवार “गाव विकासासाठी” एकजूट करतो. तसेच पुढे नदीच्या तीरावर श्री.महामाई देवीचे ग्राममंदिर आहे. दोन वर्षा पूर्वी समस्त ग्रामस्थांनी जुन्या मंदिराचे नूतनीकरण करून मंदिरात बदल करताना शुशोभिकरण केले आहे. आपल्या पुर्जनी पूर्वी ग्रामःदेवतांची मंदिर बांधलेली आहेत. त्यासाठी गावातील रयतेने वर्गणी काढली तसेच बाहेरील भक्तांनी देणगी स्वरुपात हातभार लावला. आशाप्रक्रारे जुन्या मंदिराचे शुशोभिकारण करून उद्घाटन करण्यात आले. तसेच गावाने फार पूर्वी देवी भोस्कर ग्रामदेवतेचे मंदिर बांधले, ही ग्रामदेवता ... हाकेला उभी राहणारी, नवसाला पावणारी ग्रामदेवता आहे. समस्त गावाने “श्री देवी महामाई, जाखमाता, कालकाय, भोस्कर, खेतुरपाल, या ग्राम देवतांच्या चांदीच्या नवीन मुर्त्या घडविण्यात आल्या. त्यासाठी गावातील व मुंबईतील समस्त ग्रामस्थ यांचे मनापासून कौतूक. तसेच गावात पाण्याचा प्रश्न गंभीर होता त्यासाठी दोन नळपाणी योजना राबून पाणी टंचाईतून गावाला मदतीचा हात दिला. नाहीतर गावातील महीला डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन कोस-कोस अंतर पायी चालत होत्या.त्याच्या डोक्यावरील त्रास कमी झाला. गाव पाण्यासाठी तरी सुखी झाला.

गावातील मार्गी कामे संपादन

१) सेतुपाल मार्ग ते कृष्ण मंदिर पक्का रस्ता २) श्री राम मंदिर ते कृष्ण मंदिर पक्का रस्ता. ३) गाव ते कोंडी पर्यत रस्ता ४) कोंडी नदीवर पूल. ५) कोंडी नदी जाणाऱ्या रस्त्याला जोडून स्मशानभूमी पर्यंत पक्का रस्ता. ६) स्मशानभूमी धर्मशाळा ७) महामाई मंदिराचा जीर्णोदर व सुशोभिकरण. ८) देव खेतूरपाल ग्रामदैवतांचा देऊळ बांधण्याचा संकल्प. ९) माळवी शाळा ते गोसमा, महामाई देवळापर्यंत रस्त्याचे बांधकाम सुरु

गावात श्री.राममंदीर प्रस्ताव संपादन

आज ज्या ठिकाणी श्री प्रभू रामाचे मंदिर आहे.पूर्वी त्या ठिकाणी एका कुटुंबाचे राहते घर होते. खरतर त्या घराचे मालक श्री गोविंद मालप होते. त्यांना एक मुलगी होती. तिचा विवाह मु.वांझळोळ गावात श्रीयुत धाडवे परिवारात करण्यात आला होता. श्री गोविंद मालप यांच्या मृतुनंतर त्या मुलीला घराचा हक्क मिळाला होता. वडीलांच्या मृतुनंतर त्यांची मुलगी परिवारासोबत मु. मालवी गावात राहू लागली. कालांतराने त्या परिवाराने राहते घर विकण्याचा निर्णय घेतला. घर विकण्याचा विचार समस्त ग्रामस्ताना कळविला. शेवटी मालवी गावाने त्यांचे घर विकत घेण्याचा निर्णय घेतला. सभेत तसा ठराव ही मंजूर झाला. मंडळाने रोख र. ७०० (सातशे) रक्कमेला घर विकत घेतले. सदर घर मालवी गावातील मंडळाच्या नावावर चढले. शेवटी गावातील माणसांच्या मनात घर कश्यासाठी विकत घेतले हा प्रश्न होताच? कारण गावात वाचनालय, ग्रंथालय निर्माण करण्याचा विचार मनात होता? पण हे “लायबरी” खरच गरजेची आहे का? या विषयावर अनेक वेळा बैठका झाल्या. पण गावातील माझ्या माणसांना हा विषय “लायबरी” असावे हीच मनात इच्छा होती. पण मात्र मुंबईकराचा प्रखर विरोध होता. त्यांना याचे मर्म समजत नव्हते. अनेक वेळा हा विषय तसाच पडून राहत होता. खरच “लायबरी” म्हणजे सार्वजनिक वस्तू, भांडी, तासे, ढोल, सनई, टाळ, पेटी, इतर सार्वजनिक वस्तू ठेवण्याची एक सामुदाईक जागा, जी वापरण्यासाठी आहे. असा मुंबईकरांचा समज होता व तसेच त्यांना वाटत ही होते. यासंबंधी अनेक वेळा चर्चा ही झाली व तशीच अनेक वर्षं ही निघून गेली. पण हा विषय काय मार्गी लागत नव्हता. आशीच समस्त मुंबईकरांची मुंबई मधील सार्वजनिक वास्तूत बैठक झाली या बैठकीला सर्व मुंबईकर झाडून उपस्थित होते. विचाराची अनेक खलबते झाल्यानंतर गावातील विकत घेतलेल्या जागेत श्री प्रभू राम मंदिर बांधण्याचा विचार शेवटी अंतिमस्वरुपात एकमताने ठरवात मंजूर झाला.

श्री.राममंदीर गावात निर्माण झाले संपादन

श्री प्रभू रामाची लोभस अशी मूर्ती मुंबई मधून आणण्यात आली होती. प्रभू सेवेसाठी गावकर्यांनी पुष्पहार, साज – सजावट साहित्य घेवून येण्याची लगबग ग्रामास्थ यांच्या मध्ये दिसत होती. रात्रभर जागरण करताना सर्वांच्या मुखी प्रभू रामाचा गजर, गायन, स्तुती गायनातून जाणवत होती. गावातील पुरुष – महिला आपल्या परीने श्री रामाच्या सेवेत सेवेकरी म्हणून स्वतःला वाहून घेत होते. गावातील रस्ते झाडून लखलखीत दिसत होते. काही पुरुष मंडळी मंडप बांधणीमध्ये गुंतले होते. तर काही फुलांची सजावट करण्यात व्यस्त होते. काही महिला पाण्याची सोय करण्यात तर काही सडा-रांगोळी करण्यात गुंतल्या होत्या. शाळकरी मुल ही जमेल तशी मोठ्या मंडळीना मदत करीत होती. गावातील प्रमुख गावकऱ्यांसाठी खुर्च्या, टेबल, बैठक, मांडण्यात आली होती. गावातील प्रमुख जोगोजागी श्रीप्रभू राम नवमी कार्यक्रमाचे मोठ मोठे फलक पंचक्रोशीत लावण्यात आले होते. एकूणच गावातील व पंचक्रोशीतील वातावरण श्रीप्रभू राम आगमनासाठी आतुर झाले होते. पंचक्रोशीतील राजकीय व्यक्तींना ही कार्यक्रमाचे निमंत्रण गावातील प्रमुख पदाधिकरी यांनी व्यक्तिगत भेटून देण्याची जबाबदारी घेतली होती. तसेच पंचक्रोशीतील गाव प्रमुखांना ही निमंत्रण देण्यात आले होते. गावातील निवडक महिला सकाळपासून महाप्रसादाच्या तयारीला लागल्या होत्या. पुरुषवर्ग त्यांना मदत करत होते. त्यांची धावपळ दिसून येत होती. इकडे गावोगावचे पाहुणे येत होते. महिला मंडळाची हजेरी लागत होती. काही कार्यकर्ते त्यांची काळजी घेत होते. पंचक्रोशीतील प्रतिष्ठीत मंडळीनी हजेरी लावली होती. राजकारणी लोकही आले होते. आमदार हजर होते. शासकीय अधिकारी वर्ग हजर होते. सारा गाव चावडीवर उपस्थित होता आणि सर्वांच्या उपस्थितीत “श्रीप्रभू रामचंद्राची चैत्र शुध्द श्री रामनवमी” या शुभदिवशी पुरोहीत विनायकदादा जोशी यांच्या हस्ते श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मु. माळवी गावातील नूतन मंदिरात करण्यात आली. यांच्या सोबत मदतीस श्री.राम मोरे व दोन गुरुजी प्राणप्रतिष्ठा मध्ये होते. गावातील वातावरण श्री रामप्रभूमय झाले. सारा गाव समाधानी व आनंदी झाला. लोकांच्या कल्याण्यासाठी श्री प्रभूराम जणू माळवी गावात लोक उद्धारासाठी, कल्याणासाठी अवतरले.गावातील वातावरण आनंदीमय झाले. ग्रामस्थच्या मुखातून एकच नाव बाहेर पडले..ते होते श्री प्रभूराम यांच्या नावाच्या गजराने गावातील नवमीचा सोहळा आनंदमय दिसू लागला. गावातील रयतेला विश्वासात घेऊन श्रीप्रभू राम यांचे गावात भव्य असे मंदिर असावे. हा ग्रामस्था समोर मांडलेला संकल्प पुर्णास्तवाचा दिवस आज उजाडला. दि.१६ मे १९९३ रोजी श्रीप्रभू रामाचे उभारलेल्या मंदिरात श्रीप्रभू राम लोभस मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा पुरोहित श्री.विनायकदादा जोशी यांच्या हस्ते विधियुक्त पूजन करण्यात आले. अशा मंगलमय समयी पंचक्रोशीतील पदाधिकारी, राजकीय मंडळी, समाजातील मान्यवर, मालवी गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. मोठ्या मानाने व भक्तिभावाने हा आनंदी सोहळा गावातील मंडळींनी याची देह – याचा डोळा आसा मंगलमय सोहळा पहिला. श्रीराम मंदिर पाहून मनाला समाधान होताना, श्रीप्रभू याचे मनोमनी आभार ही मानले. सारा गाव श्री प्रभू राम भक्तिमय झाला. गावातील प्रत्येकाच्या मना-मनात “राम” भक्तिमय झाला. भक्तिसागर बघता-बघता कधी पंचविशी जवळ आली हे कधीच कळलेच नाही. आणि एका मनात विचार आला. अरे....अरे..अरे... विसरलात कि काय...आज आहे आमच्या “श्री प्रभू रामाचा पंचवीसावा” सुवर्ण सोहळा. आहे चला लगबग .....बोला ....”जय श्री राम “श्री राम जय जय राम” ...”श्री राम जय राम” “ रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम. हरे राम हरे राम, जय जय राम.” जय श्रीराम, जानकी, लक्ष्मण, हनुमंताय, नमोनमः” हरे राम, हरे कृष्ण, हरे कृष्ण, हरे हरे” रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम”

पहिला रामनवमी उत्सव सुरु झाला संपादन

१६ मे १९९३, अखंड गावाचे “भक्ती भावाने श्री राम नवमी उत्सव सुरु केला. पालखी तयार होती.ती सजवली होती.श्री प्रभू रामाच्या पादुका पालखीत बसविल्या होत्या. पादुकाची स्थापना केल्यानंतर सजवलेली पालखी गावच्या अंतर्गत रस्त्याने श्री प्रभू रामाची मिरवणूक निघाली. रामभक्तांनी सफेद सदरा व लेंगा परिधान करून डोक्यावर सफेद टोपी ही घातलेली होती.सारा गाव श्री प्रभू राममय वातावरण सजला होता. गावातील बालगोपाळ, जेष्ठ, महिला, युवा ही श्री प्रभू मिरवणूकीत आंनदीमय वातावरणात सजल्या होत्या. टाळ,ढोलकी,सनई, विविध तालात सोबत श्री प्रभू गजरात अभंग-गायन करीत मिरवणूक वाजत-गाजत पुढे पुढे जात होती. सोबत मिरवणूकीत फटाक्याची आतिषबाजी सुरु होती. जोरदार टाळ धरणारे व रंगणारे लेझीम पथक रंगत आणीत होते. गुलाल उधळत व प्रत्येकाच्या माथी श्री प्रभू नावाचा गुलाल लावीत श्री राम गजर करीत महिला-पुरुष श्री राम नावावर ताल धरून नाचत-नाचत मिरवणूक पुढे पुढे जात होती.गावातील महिला आपल्या घराबाहेर उभ्या राहून श्री प्रभू – पादुका पुजानासाठी आपल्या घरातून आरती घेऊन पादुका पूजनासाठी तयारीत होत्या. सोबत श्री.राम पादुका पूजांचा आनंद आपल्या चेहऱ्यावर दाखवित होत्या.एकूणच मिरवणूक श्री प्रभू राम मय वातावरणात रंगून भिजली होती. असा २५ वा श्री राम नवमी उत्सव मंगलमय वातावरणात “आनंदीमय” सोहळा पार पडला...... “जय श्रीराम, जानकी, लक्ष्मण, हनुमंताय, नमोनमः”

सामाजिक उपक्रम संपादन

गावचा पतपेढीचा ६ वा वार्षिक अहवाल सादर करताना, श्री.वसंत मिसाळ म्हणाले, “मला अतिशय आनंद होत आहे. श्री लक्ष्मण माळवे यांच्या सुविचाराने व श्री.शांताराम भोगलं यांच्या पुढाकारने ९ ऑक्टोबर २००८, रोजी भाग भांडवलदारवर श्री.रामकृष्ण नागरी सहकारी पतपेढी स्थापना विजयादशमीच्या मुहूर्तावर करण्यात आली”. गेल्या दोन वर्षाच्या वाटचाली मध्ये आमच्याच पतपेढी ने नेत्रदीप प्रगती केली असून, संपूर्ण गावात सहकार क्षेत्रांतील काही नामांकीत पतपेढी म्हणून नावलौकिक मिळवीत आहे. ध्येय व कार्य यांचा सतत पाठपुरावा करीत आपुलकीचे ग्राहक सबंध जपत व्यावसायिक व्यावस्थापन अत्याधुनिक सेवा व उच्च प्रतीने मनुष्य बळ विकसित करून आपल्या पतपेठीला परिपूर्ण सेवा देणारी एक उत्कृष्ट आर्थिक संस्थाबनविण्याचे दीर्घ कालीन उद्दिष्ट पतपेढीने डोळ्यासमोर ठेवले आहे. पतपेढीचे अधिकारी ( संचालक मंडळ ) आणि सदस्य यांनी समर्पित भावनेने दिलेल्या ग्राहक सेवेमुळे पतपेढीच्या प्रगतीस हातभार लागलेला आहे. शिवाय पतपेढीचे सभासद ग्राहक आणि खातेदार यांनी ढाखविलेला विश्वास व सल्लागार श्री.पांडुरंग सो.पाडावे यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन व सहकार्य लेखा परीक्षकांनी केलेल्या मौलिक सूचना इत्यादीचा पतपेढीच्या यशस्वी वाट चालीमध्ये मोलाचा वाटा आहे.

महिला विकास मंडळ संपादन

काळानुसार बदल होत गेला. महिलांचा विकास झाला तरच मुलांचा विकास होईल, यामुळेच गावाचा विकास होण्यास महिला विकास हे काळाची गरज आहे. मुलांची शिक्षण, आरोग्य, महिलांच्या समस्या, गाव संस्कृति, रूढी-परंपरा, सामाजिक सहभाग, गावविकासासाठी राजकारणात शिरकाव, ग्रामपंचायत निवडणूक, गावविकासासाठी विकासक ध्येय-कार्य यासाठी महिला विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. भजन मंडळ पुर्वी अस्तित्वात होती. आपल्या गावी वार्षिक पूजा घालित. त्यावेळी मुंबईकर आपले भजन मंडळ जात असे. त्यावेळी विविध प्रकराची वाद्य बघायला मिळत होती. वाद्य वाजवणारे लोक बघायला मिळत होते. ‘भजन’ ऐकायला मिळे. नाना तऱ्हेचा गाणी ऐकायला श्री.राजाराम धाडवे त्यांच्या नंतर श्री. जानु धाडवे उर्फ कड्क्या बुवा पेटी वाजवू लागले. त्यांना कड्क्या बुवा ही पदवी दिली गेली. भजनाच्या दिवशी गावकर्याच्या खोलीवर भजनासाठी सारा गाव जमा व्ह्याचा. खूप खूप मजा व आनंद मिळायचा परंतु त्यांच्या आजरा नंतर भजन मंडळ बंद पडले. वाद्य वाजवणारे पण म्हातारे झाले. गावी गेले. इकडे गावकर्याच्या खोलीमध्ये एक पेटी होती. त्या पेटीत वाद्य ठेवली जायची. टाळ, पेटी, तबला, नाल, मृदुंग, ढोलकी, चकवा, तुणतुणा ही वाद्य. त्या पेटीत ठेवली जायची. आडे कोंडावरचे श्री. हरिश्चंद्र मालप यांच्या नेतृत्वाखाली पोवाडा सुरु केले गेला होता. त्या कार्यकारणीने महत्वाचा वाटा उचला होता. परंतु कार्यकर्ते मुंबईत बिखारले गेले त्यामुळे चालना मिळाली नाही. आपल्या गावातील ‘तरुण’ संगीत कलेकडे वळतील अशी अपेक्षा करू या! २५ व्या श्री. रामनवमी उत्सवाच्या निमिताने भजन मंडळाचे अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.महिलांचा विकास साधला जावा, मुलांचा विकास साधला जावा, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले जावे. महिलांच्या अडी-अडचणी सोडविल्या जाव्यात, महिलांनी समाजकारण-राजकारणात मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, ग्रामपंचायत, तालुकापंचायत, जिल्हापंचायत, जिल्हापरीषद मध्ये सहभागी होऊन ग्राम विकास कसा साधता येईल याचा अधिक विचार करून, महिलांच्या व गावाच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी, तसेच निवडणूक लढऊन राजकारणात आपला सभाग अधिक द्यावा.यासाठी मंडळाच्या कार्यकत्यांनी श्री.पांडुरंग पाडावे, श्री.अनंत धाडवे, या मंडळीने अनमोल सहकार्य केले. गाव-विकास कामासाठी महिला पदाधिकार्यांच्या नेमणूका करून काम कण्याची जबाबदारी प्रत्येकानी घेतली.“चूल आणि मूल” या चक्रातून गुरफटून पिचलेल्या महिल्या प्रथमच बाहेर होत्या. त्यानी घराचा प्रथमच उंबरडा ओलाडून राजकारणा सोबत समाजकारणा उतरण्याचा निर्णय घेतल. जिद्द व मेहनतीच्या जोरावर गावातील अडचणीला न्याय देण्यासाठी ग्रामपंचायात मधील सरपंच व उपसरपंच जागा पटकावल्या. स्थानिक स्वराज संस्थेमधील ३३ टक्के “महिला आरक्षण” मधील राखीव जागासाठी गावातील महिलांनी पदर खोचून राजकारणाच्या मैदानात उतरून राजकारणात आपला मेहनतीचा ठसा निर्माण केला. मु.इळने- ग्रामपंचायात मधून गावातील श्रीमती सुनंदा आंबेकर या सरपंच म्हणून निवडून आल्या. सदस्य मंडळीने निवड झाल्यानंतर गावात कामाची सुरुवात करून आपल्या कामाचा ठसा निर्माण केला.या पूर्वी काही वर्षपूर्वी मौ.इळाने ग्रामपंचायत मधून सरपंच श्री.सोनू मिसाळ व उपसरपंच श्री. तुषार माळवे म्हणून निवडून आले. ग्रामसभासाठी सदस्य उपस्थित राहून आपल्या गावातील समस्य सोडून गावात विकास घडून आणू लागली. सरकारी विविध योजना गावात राबू लागली. गावाच्या विकासा सोबत महिला मंडळानी गावात नव्याने “फंड” सुरु केला. गावाचा पैसा गावासाठी उभा राहीला. यामुळे महिलांच्या आर्थिक अडचणीना आधार मिळाला. यातून गावाची कामे होतात.श्रमदान :- बंधुनो गेली कित्येक वर्षं अनेक सुधारणा करीत आहोत योजना राबवत आहोत. पैशांचा अभाव त्यानुळे श्रमदान करण्याची ग्रामीण महिलांना श्रमदान करावे लागते. त्यामुळेच गावाचा विकास घडून आला आहे. श्रमदान म्हणजे मोबदला न घेता करण्यात महिलांचा सिंहाचा वाटा आहे. यासाठी गावातील खालील महिलांचा सहकार्य लाभले..

गावाचा विकासक प्रवास संपादन

सरकारने गावासाठी रोजगार हमी योजना फलोत्पादन योजनेंतर्गत..”देऊळ लागग” जमिनीवर आपण समस्त गावाने ग्रामस्थ मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री.मधुकर मालप, मंडळाचे सदस्य यांच्या सहकार्याचे गावात ही योजना राबविली.ती कार्यकारणी पुढीलप्रमाणे.श्री.पांडुरंग पाडावे, श्री.शांताराम भोगलं, श्री.वसंत मिसाळ, श्री.अनंत धाडवे, श्री.भालचंद्र मोडकले, श्री.अर्जुन धाडवे, श्री.वसंत बटावले, श्री.महादेव मिसाळ, श्री.हरी.भा.मिसाळ, श्री.बबन रोडत, श्री. एकनाथ धाडवे, श्री.किसन रोडत.समस्त युवा कार्यकर्ते आशा कार्यकर्त्या सोबत होते. यामुळे गावाचा मोठ विकास कार्य हाती घ्येण्यात आले होते. गावातील युवा एकजूट होत होता.सोबत गाव विकासाची कामे ही मंडळाच्या कार्यकर्त्या कडून सर्वाना सोबत घेऊन होऊ लागली. पुढील कामाची आखणी व अर्धवट कामाचा पाठपुरावा ही युवा कार्यकर्त्याकडून घेण्यात येत होता. जणू सर्वांनी गाव कार्याला वाहून घेतले होते.एक उत्तम संघटना श्री.मधुकर मालप यांच्या सोबतिने निर्माण होत होते. गावच्या देऊळ लाग जमिनीवर मोठ्याप्रमाणात सरकारी अनुदानातून “काजू लागवड” ही योजना राबविण्यात आली. तसेच स्मशानभूमी बाजूच्या मोकळ्या जमिनीवर ही “आंब्याच्या बटी” भरण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे कलाकृतीला वाव देण्यासाठी “नाटक” निर्माण करून विविध भागात नाटक कला करून गावात आर्थिक पाठबळ वाढविण्यात आले.सोबत “बक्षीस सोडत” आयोजन करून आर्थिक आधार निर्माण केला. गाव देऊळ नव निर्माणसाठी विविध मार्गाने देणगी रूपाने मदत,घेण्यात आली. गावात बंजो पथक निर्माण, श्री.राम नवमी उत्सव साजरा करणे, श्री.कृष्ण मंदिर दुरुस्ती, गावातील रस्ते, वीज, नळपाणी योजना एकजुटीने राबविण्यात आल्या. या कामात ग्रामीण युवाचे व तसेच महिला, पुरुष सहकार्य अनमोल लाभले. गावातील मंडळ निर्मीतीमुळे गाव विकासाला गती मिळाली. गावातील लोकांना भजन, संगीत साठी वाद्य कमी पडू नये म्हणून मुंबईतून “हार्मोनियम, टाळ, ढोलकी, पखवाज, तबला, असे साहीत्य देण्यात आले.आपले संगीत भाग भक्कम होण्यासाठी गावातील तसेच मुंबईतील युवाना प्रोत्साहन देण्यात आले.