सतीश जकातदार (२७ ऑक्टोबर, इ.स. १९५५ - ) हे सिनेपत्रकार, आशय फिल्म क्लबचे संस्थापक-सचिव आणि चित्रपट चळवळीचे संयोजक आहेत.

सतीश जकातदार मनोहर मासिकांत सिनेमावर लेखन करीत. शिवाय माणूसमध्ये ते कलात्मक चित्रपटांवर लेखन करत असत. अमोघ श्रीवास्तव, सलील आदर्श, अशी टोपणनावे घेऊन ते लेखन करीत.

कॉलेजमध्ये असताना सतीश जकातदार यांनी प्रभाकर वाडेकरांच्या अर्थ काय या बेंबीचा नाटकात अभिनय केला होता.

आशय फिल्म क्लब संपादन

सतीश जकातदार, वंदना भाले, दीपक देवधर, प्रभाकर वाडेकर, प्रसन्‍नकुमार अकलूजकर आणि मुकुंद संगोराम या चित्रपटप्रेमी मंडळींनी एकत्र येऊन १ ऑगस्ट, इ.स. १९८५ रोजी आशय फिल्म क्लबची स्थापना केली. जकातदार या संस्थेचे संचालक आहेत.

दिग्दर्शन संपादन

सतीश जकातदार यांनी चित्रपट संग्रहालयाच्या वाटचालीवर आधारलेल्या प्रिझव्र्हेशन ऑफ मूव्हिंग इमेजेस या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. लघुपटाची निर्मिती वंदना भाले यांची आहे. सतीश जकातदार यांनी वंदना भाले यांच्या साथीने मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यावर एक लघुपट तसेच टोवर्डस बेटर टुमॉरो हा अनुबोधपटही काढला होता.

व्याख्याने संपादन

जकातदारांनी मराठी चित्रपटांचा इतिहास या विषयावर महाराष्ट्र राज्यभर दृकश्राव्य व्याख्याने दिली आहेत.

लेखन संपादन

मायबोली या संकेतस्थळावर सतीश यांनी प्रभातचे संगीतकार, राजकमलचे संगीतकार, आनंदघन, वसंत पवार, पु.ल. देशपांडे यांच्यावरच्या मालिकांचे लेखन - संपादन केले होते. सतीशच्या संकल्पनेनुसार माणूस ते लिमिटेड माणुसकी हा मराठी चित्रपट गीतांचा इतिहास मांडणारा दृक्‌श्राव्य कार्यक्रम सुधीर गाडगीळ यांचा गट सादर करत असे.

संपादित पुस्तके संपादन

  • फ्लॅशबॅक : चंदेरी दुनियेत (१९६१ ते ८६ या काळात 'माणूस'मध्ये प्रसद्ध झालेल्या काही निवडक लेखांचा संपादित संग्रह; सहसंपादिका वंदना भाले)
  • हकिकत सिनेमाची (प्रकाशन - २७ ऑक्टोबर, २०१५)