मुकुंद संगोराम
मुकुंद श्रीरंग संगोराम हे 'लोकसत्ता' दैनिकाचे दैनिकाचे सहायक संपादक आहेत. ते आधी तरुण भारत आणि पुणे वर्तमान या दैनिकांचे सहसंपादक होते. ते संगीताचे जाणकार आहेत. त्यांना हा वारसा त्यांचे वडील प्रा. डॉ. श्रीरंग संगोराम यांच्याकडून मिळाला. 'लोकसत्ता'त त्यांनी संगीतविषयक सदरलेखन केले आहे.
कौटुंबिक माहिती
संपादनमुकुंद संगोराम यांचे वडील प्रा. डॉ. श्रीरंग संगोराम हे महाराष्ट्रातील उत्तम संगीत समीक्षक, जाणकार होते. ते पुणे विद्यापीठात हिंदीचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. मुकुंद संगोराम यांचा मुलगा गंधार संगोराम हाही संगीतकार असून त्यास एकूण एकोणीस वाद्ये वाजविता येतात. [१] पुण्यातील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट (दिवंगत) आणि अर्थशास्त्र व अकाउंटन्सीविषयक लेखन करणारे सदरलेखक मिलिंद संगोराम हे मुकुंद संगोराम यांचे धाकटे बंधू होत.
शिक्षण
संपादनव्यावसायिक कारकीर्द
संपादनलेखन
संपादन- समेपासून... समेपर्यंत, डायमंड पब्लिकेशन्स, पुणे किंमत: रु १००
- ख्यालिया : मुकुंद संगोराम (चित्रकार : सतीश पाकणीकर), मनोविकास प्रकाशन, पुणे (पं. भीमसेन जोशी यांचे जीवन चरित्र), किंमत:रु.४००/-
पुरस्कार
संपादन- २०१२ : विद्याधर गोखले पुरस्कार, मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई
- २०१० : "दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार, महाराष्ट्र संपादक परिषद, पुणे
सन्मान
संपादन- विश्वस्त : आर्य संगीत प्रसारक मंडळ, पुणे
हेही वाचा
संपादन- परिवर्तनाची सुरेल वाट Archived 2016-03-05 at the Wayback Machine. (हिराबाई बडोदेकरांच्या मातोश्री ताराबाई माने यांच्याविषयीचा लेख : मिळून साऱ्याजणी : दिवाळी अंक २०१२)
बाह्यदुवा
संपादन- [[बाळशास्त्री जांभेकर]] स्मृती पुरस्कार Archived 2014-01-11 at the Wayback Machine.
- औताडे, त्रिवेदी, संगोराम यांना पत्रकार संघाचे पुरस्कार Archived 2016-03-06 at the Wayback Machine.
संदर्भ
संपादन- ^ मानबिंदू : आम्ही सितारे उद्याचे, http://www.maanbindu.com/marathi-composer-gandhaar Archived 2016-03-05 at the Wayback Machine.