संगम (चित्रपट)

१९६४ हिंदी चित्रपट
(संगम (१९६४ चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)


संगम हा १९६४ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. राज कपूर ह्यांनी दिग्दर्शन व निर्मिती केलेल्या ह्या चित्रपटामध्ये स्वतः राज कपूर, वैजयंतीमालाराजेंद्र कुमार ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. संगमचे कथानक प्रेम त्रिकोणावर आधारित असून हा चित्रपट तब्बल ४ तासांचा आहे. संगम राज कपूरने निर्मिती केलेला पहिलाच रंगीत चित्रपट होता. संगममधील सर्व गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. तसेच राजेंद्र कुमार, राज मेहरा, नाना पळशीकर, ललिता पवार, अचला सचदेव आणि हरी शिवदासानी हे सहयोगी कलाकार म्हणून आहेत.

संगम
दिग्दर्शन राज कपूर
निर्मिती राज कपूर
कथा इंदर राज आनंद
प्रमुख कलाकार राज कपूर
वैजयंतीमाला
राजेंद्र कुमार
ललिता पवार
गीते शैलेंद्र
संगीत शंकर जयकिशन
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १८ जून १९६४
अवधी २३८ मिनिटे

संगमसाठी राज कपूरला फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार तर वैजयंतीमालाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाले.

संगम हा चित्रपट पहिली रंगीन चित्रपट आहे. हा चित्रपट भारतातील हिट आणि कॅल्सीच चित्रपट मानला जातो. संगम चित्रपट हिंदी सुष्टीतील विशेष चित्रपट मानला जातो कारण या चित्रपटाचे चित्रीकरण हे बाहेर देशातील ठिकाणी झाले होते. व्हेनिस, पैरीस, स्विसरलँड या ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. दक्षिण भागातील दिग्दर्शक कासारी नारायण राव यांनी या चित्रपटाची पुनिर्मिर्ती केली आणि तो तेलेगु आणि कन्नड भाषेत केला गेला. त्यांचे नाव त्यांनी स्वप्ना असे टेवले होते.

# शीर्षक पार्श्वगायक गीतकार अवधी
1 बोल राधा बोल वैजयंतीमाला, मुकेश शैलेंद्र 04:39
2 दोस्त दोस्तना रहा मुकेश शैलेंद्र 05:51
3 हर दिल जो प्यार करेगा लता मंगेशकर, मुकेश, महेंद्र कपूर शैलेंद्र 04:45
4 ओ मेहबूबा मुकेश हसरत जयपुरी 04:59
5 ओ मेरे सनम लता मंगेशकर, मुकेश शैलेंद्र 04:13
6 ये मेरा प्रेमपत्र लता मंगेशकर, मोहम्मद रफी हसरत जयपुरी 04:25
7 मैं क्या करूं राम लता मंगेशकर हजरत जयपुरी 03:45
8 इश लीबे डिश (जर्मन) व्हिव्हियान लोबो

बाह्य दुवे

संपादन