श्टेचिन
श्टेचिन (पोलिश: Szczecin ; जर्मन: Stettin ; काशुबियन: Sztetëno) ही पोलंड देशामधील झाखोज्ञोपोमोर्स्का प्रांताची राजधानी; पोलंडमधील सातव्या क्रमांकाचे मोठे शहर व बाल्टिक समुद्रावरील पोलंडचे सर्वात मोठे बंदर आहे. श्टेचिन शहर पोलंडच्या वायव्य भागात जर्मनी देशाच्या सीमेजवळ ओडर नदीच्या काठावर वसले असून ते बर्लिन शहराच्या १५० किमी ईशान्येस स्थित आहे.
श्टेचिन Szczecin |
|||
पोलंडमधील शहर | |||
| |||
देश | पोलंड | ||
प्रांत | झाखोज्ञोपोमोर्स्का | ||
क्षेत्रफळ | ३०१ चौ. किमी (११६ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | ४,०६,४२७ | ||
- घनता | १,३५० /चौ. किमी (३,५०० /चौ. मैल) | ||
- महानगर | ७,७७,००० | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
szczecin.pl |
आठव्या शतकात वसवले गेलेले श्टेचिन शहर प्रशिया, जर्मन साम्राज्य व नाझी जर्मनीमधील एक प्रमुख बंदर होते. इ.स. १९४५ साली दुसऱ्या महायुद्धानंतर श्टेचिनमधील सर्व जर्मन रहिवाशांना हाकलून लावण्यात आले व पोलंडच्या अखत्यारीत आणण्यात आले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |