शोवना नारायण

भारतीय कथक नर्तक

शोवना नारायण ( १७ फेब्रुवारी १९४९) या एक प्रसिद्ध आणि मान्यवर भारतीय कथक नर्तक आहेत. कथक कलाकार आणि भारतीय ऑडिट अँड अकाउंट्स सर्व्हिसमध्ये अधिकारी म्हणून त्यांनी दुहेरी कारकीर्द केली. त्यांनी भारत आणि जगभरात आपली कला सादर केली आणि त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले.[] त्यांचे गुरू बिरजू महाराज आहेत.[]

शोवना नारायण

शोवना नारायण
आयुष्य
जन्म १७ फेब्रुवारी १९४९
संगीत कारकीर्द
कार्य कथक नृत्य
पेशा नर्तिका, नृत्य दिग्दर्शक
गौरव
गौरव पद्मश्री
पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार - १९९९-२०००
बाह्य दुवे
संकेतस्थळ

बालपण आणि शिक्षण

संपादन

नारायण यांनी दिल्लीच्या मिरांडा हाऊसमधून शिक्षण घेतले. त्यांनी भौतिकशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी २००१ मध्ये पंजाब विद्यापीठातून समाजशास्त्रात एम.फिल.चे शिक्षण पूर्ण केले तर २००८ मध्ये मद्रास विद्यापीठातून संरक्षण व सामरिक अभ्यासात एम.फिल. केले.[] तसेच त्यांनी भारतीय ऑडिट अँड अकाउंट्स सर्व्हिसमध्ये अधिकारी म्हणूनही काम केले. त्या २०१० मध्ये सेवानिवृत्त झाल्या. त्यांचे लग्न ऑस्ट्रेलियन राजदूत (सेवानिवृत्त) डॉ. हर्बर्ट ट्रेक्सल यांच्याशी झाले आहे.

त्यांनी कथक नृत्याचे शिक्षण कथक केंद्र, दिल्ली येथे पंडित बिरजू महाराज आणि पंडित कुंदनलाल गंगाणी यांच्याकडून घेतले.[]

नृत्याच्या क्षेत्रातील कारकीर्द

संपादन

'कलाकार आणि गुरू’ म्हणून शोवना नारायण सध्याच्या काळातील भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि उत्कृष्ट कथक कलाकारांपैकी एक आहेत; एक नृत्य दिग्दर्शक आणि सादरकर्त्या कलाकार म्हणून त्या परिचित आहेत. त्यांनी नृत्याच्या क्षेत्रात खोली, परिपक्वता आणून आपला ठसा उमटवला. त्यांनी अनेक नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवात जगभरातील प्रेक्षकांसमोर कला सादर केली आणि त्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी अनेक देशांचे प्रमुख व राज्यकर्त्यांसमोर आपली कला सादर केली आणि अनेक कथक कलाकारांना प्रशिक्षण दिले, ज्यांपैकी काही तरुण पिढीतील प्रमुख कलाकार आहेत.

'नृत्य दिग्दर्शक आणि कलाकार' म्हणून शोवना नारायण यांनी पाश्चिमात्य शास्त्रीय बॅले, स्पॅनिश फ्लेमेन्को, टॅप नृत्य, बौद्ध भिक्खूंच्या बौद्ध जप तसेच पाश्चात्य शास्त्रीय संगीतकारांच्या रचनांसह आंतरराष्ट्रीय कलाकारांबरोबर त्यांच्या सहयोगाने कलाकृतींची निर्मिती केली आहे. १९९४ मध्ये "द डॉन आफ्टर"मधे पाश्चिमात्य शास्त्रीय नृत्य  -कथक-स्पॅनिश फ्लेमेन्को यांचा समावेश असलेल्या पहिल्या त्रयीच्या त्या सर्जक दिग्दर्शक--निर्माता-नर्तिका होत्या. त्या नवी दिल्ली येथे आयोजित सहाव्या ॲबिलिंपिक्स २००३ च्या उद्घाटनाच्या आणि सांगता समारंभाच्या सर्जक दिग्दर्शिकासुद्धा होत्या. २०१० मध्ये त्यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन व समाप्ती सोहळ्याच्यावेळी नृत्याचे सादरीकरण केले. त्यांनी अनेक भारतीय शास्त्रीय नृत्य शैलीतील आघाडीच्या नर्तकांसह त्यांच्या सहयोगाने अनेक कलाकृती निर्माण केल्या. यासाठी त्या सर्जक दिग्दर्शक-निर्मात्यासुद्धा होत्या.

सादरीकरणे

संपादन
  • १९९७ मध्ये नॅशनल स्टेडियम, येथे आयोजित भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याच्या उद्घाटन सोहळ्यात शास्त्रीय नृत्य
  • स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धातील बेगम हजरत महल यांच्यावर बॅले[]
  • बॅले फॉर गुरू गोबिंदसिंग यांच्या त्रिशताब्दी उत्सव समारंभासाठी, १९९९
  • नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्यावरील त्यांची वहिनी कादंबरीच्या प्रभावावरील "कादंबरी: द पोएट्स म्युज" (२०१२). या विषयावर नृत्य बॅले करण्याचा कोणीही यापूर्वी कधीही प्रयत्न केला नव्हता[]
  • प्रख्यात तत्त्ववेत्ते दिवंगत प्रा. रामचंद्र गांधी यांच्या बरोबर तत्त्वज्ञानविषयक विषयावर नृत्य सादर करण्याचा प्रयत्न. यात विवेकानंद, रमण महर्षी, असिसीचे फ्रान्सिस, महात्मा गांधी, रामकृष्ण परमहंस अशा विचारवंत आणि संत यांच्या आयुष्यावर हे नृत्य आधारित होते.
  • मैथिली शरण गुप्ता यांनी लिहिलेले "शकुंतला" हे काव्य.[]

आयोजन

संपादन

एक आयोजक म्हणून शोवना नारायण दरवर्षी पुढील महोत्सव आयोजित करतात.

  • इंडिया हॅबिटाट सेंटरमध्ये (जवळपास एक दशक) तरुण कलाकारांनी शास्त्रीय ललित कला सादर करण्यासाठी 'ललितअर्पण’ महोत्सव.
  • शास्त्रीय ललित कलांचा आसावरी उत्सव. (दोन दशकांहून अधिक काळ)
  • कथ्थकच्या तरुण विद्यार्थ्यांचा वार्षिक दिवस ‘रिदम अँड जॉय’

पुरस्कार

संपादन

शोवना नारायण यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यापैकी काही:

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Famous Kathak Dancers, Pandit Birju Maharaj, Sitara Devi, Shovana Narayan, Malabika Mitra, Kumudini Lakhiya, Manisha Gulyani, Kartik Ram - Kalyan Das". web.archive.org. 2012-04-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-03-22 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Shovana Narayan Biography | Childhood, Family, Contribution to Kathak Dance, Facts". www.culturalindia.net (इंग्रजी भाषेत). 2020-03-22 रोजी पाहिले.
  3. ^ "कथक नृत्यांगना पद्मश्री शोवना ने मनमोहक प्रस्तुति दी". https://www.livehindustan.com (hindi भाषेत). 2020-03-22 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "The Rebel Dancer". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-03-22 रोजी पाहिले.
  5. ^ "Shovana Narayan performs". photogallery.indiatimes.com. 2020-03-22 रोजी पाहिले.
  6. ^ "Shovana Narayan - Highlights of her Works". iccr.tripod.com. 2020-03-22 रोजी पाहिले.
  7. ^ "Guru Dr. Shovana Narayan - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. 2020-03-22 रोजी पाहिले.
  8. ^ a b c d "संग्रहित प्रत". www.shovananarayan.in. 2021-09-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-03-22 रोजी पाहिले.