"द ॲशेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "द ऍशेस" हे पान "द अॅशेस" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १:
'''द ऍशेस''' ही {{ENGc}} व {{AUSc}} ह्या दोन देशांदरम्यान खेळली जाणारी ऐतिहासिक कसोटी [[क्रिकेट]] मालिका आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही सर्वात जुनी व मानाची मालिका मानली जाते. सर्वात पहिली ऍशेस मालिका १८८२-८३ साली ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली गेली. सध्या ऍशेस दोन वर्षातून एकदा खेळवली जाते व दोन्ही देश आलटुन पालटुन ह्या मालिकेचे आयोजन करतात. सर्वसाधारणपणे ऍशेस मालिकेत ५ कसोटी सामने असतात. जर मालिका बरोबरीत सुटली तर मागील विजयी टीमकडे ऍशेसचा चषक राहतो. ह्या मालिकेला ऐतिहासिक पार्श्वभुमी आहे.
 
१८८२ साली पहिल्या ऍशेस मालिकेत एकच सामना ओव्हल या मैदानावर खेळला गेला. या रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलिया ने पहिल्या डावात केवळ ६३ धावा केल्या. पण इंग्लंड चा संघ ही केवळ १०१ धावाच करु शकला. दुसर्‍यादुसऱ्या डावात देखील ऑस्ट्रेलिया संघ १२२ पर्यत मजल मारु शकला. अखेर इंग्लंड ला विजयासाठी केवळ ८५ धावाच हव्या होत्या. पण इंग्लंड फक्त ७८ धावाची मजल मारु शकला. त्याचे अखेरचे ४ फलंदाज केवळ २ धावांमध्ये बाद झाले. हा ऑस्ट्रेलिया चा इंग्लंडमधील पहिला विजय होता. इंग्लिश वुत्तपत्रांनी ह्या पराजयाचे वर्णन "ओव्हल येथे इंग्लंड च्या क्रिकेटचा मृत्यू झाला" असे केले.
 
सध्या ऍशेस चषक ऑस्ट्रेलियाकडे आहे. त्यांनी इंग्लंडला २००६-०७ च्या मालिकेत ५-० अशी धुळ चारुन ऍशेस जिंकल्या. २००९ ची ऍशेस मालिका सध्या इंग्लंडमध्ये खेळवली जात आहे व २ कसोटी सामन्यांनंतर इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/द_ॲशेस" पासून हुडकले