Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ४७१:
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ०४:३३, २८ जून २०११ (UTC)
===प्रज्ञान ओझा==
 
हिंदी-मराठी किंवा कुठल्याही भारतीय भाषांत प्रज्ञान असेच लिखाण होईल. जो तो आपाआपल्या उच्चाराप्रमाणे वाचेल. ज्ञचा पंजाबी-तेलुगू उच्चार अजूनही ज्‍ञ आहे, तर तो गुजराथ-बंगालमध्ये ग्ग असा ऐकू येतो. महाराष्ट्र आणि ही चार-सहा राज्ये सोडली तर ज्ञ चे उच्चारण बहुधा ग्य असे होते. क्ष हा उच्चार हिंदीच्या बहुतेक बोलींमध्ये ख होतो. लक्ष्मण तिथे आधी लखमन होतो आणि नंतर लखन. असाच प्रकार श, ष, स या अक्षरांचा होतो. बंगालीत श-ष-स या तिघांचा उच्चार श होतो आणि व-बंचा ब. उडिया भाषेत श-ष-स चा उच्चार स तर, असमीया भाषेत ख़(नुक्तावाला ख) होतो. त्याच भाषेत च-छंना स म्हणतात. मराठी विकिपीडियावर स्थानिक उच्चार का नकोत हे यावरून स्पष्ट होईल. परकीय शब्द मराठीत लिहिताना, ते अगोदरच मराठीत कसे लिहितात ते शोधावे, आणि तसेच लिखाण करावे, भले त्याचा उच्चार चुकीचा होत असला तरी. मराठीत तो परकीय शब्द आधी लिहिला गेलेला नसेल तर तो इंग्रजीत कसा लिहितात ते पहावे आणि त्या रोमन लिपीतल्या शब्दाचे मराठीकरण करून उच्चा्र करावा आणि तसेच लिहावे. इतर भाषा बोलणारे लोक आपली संस्कृती विसरत नाहीत, तर, मराठीभाषकांनी का विसरावी? इंग्रजीत भारतीय भाषांचे उच्चार कुठे बरोबर असतात? अगदीत हिंदीभाषकही मराठी शब्द चुकीचे उच्चारतात.
पंजाबीत सत्यवीर सत्वीर होतो, प्रकाश परकाश आणि परेड चे प्रेड. पंजाबी लिपीला पंजाबीत गुरमुखी (म्हणजे मराठीत गुराच्या तोंडातून बाहेर पडलेले शब्द--बहुधा, ज्ञानेश्वरांचा रेडा ज्या भाषेत बोलला असेल त्या भाषेची लिपी) म्हणतात, मराठी आणि अन्य भारतीय भाषांत गुरुमुखी. मराठी उच्चार अजिबात चुकीचा नाही, पण यदाकदाचित जर असलाच तरी मराठीत गुरुमुखी असेच लिहायला पाहिजे....[[सदस्य:J|J]] ०५:५४, २८ जून २०११ (UTC)