"क्रिकेट विश्वचषक, २०११ - अंतिम सामना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Maihudon (चर्चा | योगदान)
ओळ १३१:
 
====श्रीलंकेचा डाव====
श्रीलंकेकडून या विश्वचषकात सलामीलाच धावांचे विक्रमी डोंगर उभे करणार्‍या [[तिलकरत्ने दिलशान]] आणि [[उपुल थरंगा]] यांच्या विरुद्ध भारताचे [[झहीर खान]] आणि [[शांताकुमारन श्रीसंत]]ने गोलंदाजी सुरू केली. झहीर खानने आपली पहिली तीन षटके निर्धाव टाकून २००३च्या अंतिम सामन्यात केलेली चूक पुन्हा होणार नाही याची खात्री करुन दिली. झहीर खानने आपल्या चौथ्या षटकात थरंगाला [[आउटस्विंगर]] टाकून पहिल्या स्लिपमध्ये [[वीरेंद्र सेहवाग]]करवे झेलबाद केले. झहीर विरुद्ध धावा करणे मुश्किल झाल्यामुळे फलंदाजांनी श्रीसंतच्या गोलंदाजीवर धोका पत्करुन फटके मारणे सुरू केले. बाराव्या षटकात श्रीसंतला खेळपट्टीचा निषिद्ध भाग तुडवल्याबद्दल पहिला व शेवटचा इशारा मिळाला. कदाचित त्यामुळे सैरभैर झालेल्या श्रीसंतच्या त्या षटकात एक [[नो-बॉल]]सह १५ धावा वसूल झाल्या. त्यानंतर गोलंदाजीस आलेल्या [[हरभजनसिंग]]ने दिलशानचा बळी मिळवून श्रीलंकेच्या बाजूने झुकत चाललेल्या सामन्याला परत खेचले. संघकारा आणि [[माहेला जयवर्दने]] यांनी चिवटपणाने खेळत मोठी भागीदारी सुरू केली पण धोणीने संघकाराला [[युवराजसिंग]]च्या गोलंदाजीवर टिपून महत्वाचा ब्रेक-थ्रू{{मराठी शब्द सुचवा}} मिळवून दिला. डावाच्या अंतिम टप्प्यात धोणीने पुन्हा झहीर खानला गोलंदाजी दिली आणि त्याने [[चामर कपुगेडेरा]]ला बाद केले. याआधीच्याच षटकात थिलन समरवीरा बाद झालेल्या असल्याने एका बाजूने किल्ला लढविणाऱ्या जयवर्दनेने आक्रमण करण्याचा बेत पुढे ढकलला आणि १-२ धावा मिळवण्याकडे लक्ष केंद्रित केले. अखेरच्या पाच षटकांत पॉवर प्ले सुरू झाल्यावर जयवर्दने सह [[नुवान कुलशेखरा]] आणि [[थिसरा परेरा]] यांनी भारतीय गोलंदाजांना धारेवर धरत ६३ धावा मिळवल्या. पहिली तीन षटके निर्धाव टाकणाऱ्या झहीर खानने अखेरच्या तीन षटकांत धावांची उधळण केली आणि श्रीलंकेचा डाव २७४ धावांवर थांबला.
 
===धावफलक===