"माधवराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎[[दिल्ली]]कडील राजकारण: Typo fixing, replaced: करुन → करून using AWB
ओळ ४४:
==शत्रूचा उठाव==
 
पानिपत येथे मराठयांचा पुष्कळ नाश होऊन नंतर थोडक्याच अवधीत नानासाहेब मरण पावले: तेव्हा ही संधी मराठयांवर स्वारी करण्यास उत्कृष्ट आहे असे पाहून [[निजाम|निजामाने]] लढाई सुरू केली. त्यावेळी [[रघुनाथराव पेशवे|रघोबा]] प्रमुख असल्यामुळे राघोबाने [[राक्षसभुवन]] येथे निजामाच्या सैन्यास [[राक्षसभुवनची लढाई|गाठून लढाई दिली]]. त्यात रघोबाचा पराभव व्हावयाचा परंतु ऐनवेळी माधवरावानें आपल्या तुकडीनिशी निजामाच्या सैन्यावर हल्ला करून जय मिळविला.त्या मुळे निजामाचा उद्देश सिद्धीस न जाउन त्यास पेशव्यांशी तह करावा लागला. परंतु पुढे राघोबा व माधवराव यांचे वैमनस्य आले,ती संधि साधून निजामाने मराठ्यांकडील बराच मुलूख परत घेतला.
 
निजामाप्रमाणे [[हैदर|हैदरानेहि]] या संधीचा फायदा घेऊन दक्षिणेत मराठ्यांचा बराच मुलूख हस्तगत केला. तेव्हा इ.स. १७६४ मध्ये राघोबाशी समेट केल्यावर माधवरावाने हैदरावर स्वारी केली. या प्रसंगी हैदराने पेशव्यांचा मोड करण्याकरिता आपल्या सर्व प्रयत्नांची शिकस्त करून् पाहिली; पण पेशव्यांपुढे त्याचा टिकाव लागेना. म्हणून [[सावनूर]] व इतर बराच मुलूख, त्याचप्रमाणे लढाईचे खर्चाबद्दल म्हणून ३२ लक्ष रूपये देऊन त्याने पेशव्यांशी तह केला.