"मिनीयापोलिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ७:
मिनियापोलीस हे मिनिसोटा राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. या शहरामधून मिसिसिपी नदी आणि शहराच्या बाजूने मिनिसोटा नदी वाहते. सेंट पॉल ह्या मिनिसोटा राज्याच्या राजधानीच्या शेजारीच हे गाव वसलेले आहे. त्यामुळे या गावांना 'जुळी शहरे' अर्थात Twin Cities असे म्हणतात. मिनियापोलीस शहरात जवळपास २० मोठ्ठी पाण्याची तळी आहेत. पाण्याचा तुटवडा हा शब्द या गावाला माहिती नाही. मिनिसोटा राज्यात १०००० पेक्षा जास्त तळी आहेत! ही गोष्ट ते त्यांच्या गाडीच्या नंबर प्लेटवर अभिमानाने मिरवतात. मिनियापोलीस मध्ये पूर्वीच्या काळी टिंबरच्या खूप मिल्स होत्या. म्हणूनच मिनियापोलीस ला "मिल्सचे शहर" किंवा "तळयांचे शहर" असे म्हणतात. मिनियापोलीस चे नाव हे मिनी म्हणजे पाणी आणि पोलिस म्हणजे शहर किंवा गाव, पाण्याचे शहर अर्थात मिनियापोलीस.
 
{{बदल}}
==मिनियापोलीस -शहर ==
'मिनियापोलीस - सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ' हे साधारण शहरापासून २० मैल अंतरावर येते आणि 'मॉल ऑफ अमेरिका' त्याच्या अगदी जवळ येते. शहराचे मुख्य २ भाग Downtown आणि Uptown. सगळ्या मुख्य इमारती आणि ऑफिस या परिसरात आणि सर्वात उंच इमारती ही याच परिसरात. बाकी सगळीकडे इमारतींची उंची ही बरीच कमी असते. खूप म्हणजे खूपच पसरलेले असे हे गाव आहे. किंबहुना अमेरिकाच मुळी खूप पसरलेली आहे. जवळ पास अथवा जवळ जवळ काही नाही. मिनियापोलीस चा बेसबॉल क्लब खूपच नामांकित आहे. गावात मोठ्ठी मैदाने आहेत. लोकांना बेसबॉल म्हणजे जीव की प्राण. आपल्याकडे जसे क्रिकेट तसे इथे बेसबॉल. इथल्या बेसबॉलच्या टीम ला "मिनियापोलीस - सेंट पॉल" असे न म्हणता "Twins (जुळे)" असे नाव आहे ! इथे क्रिकेट बाबत अजिबात प्रेम आणि ज्ञान नाही. पण बेसबॉल बाबत नुसता विचारा, पोपटा सारखे बोलायला लागतील. कोण खेळाडू कुठल्या क्लबचा, कोणाला किती पैसे मिळतात? कोण कसा महत्वाचा खेळाडू आहे, सगळी माहिती अगदी तोंडपाठ !!!