"ॲडॉल्फ हिटलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०:
==आत्मचरित्र/चित्रपट/नाटके==
हिटलरने " माईन काम्फ " ( माझा लढा ) आत्मचरित्रात ' नाझीवाद ' स्पष्ट करताना दुसऱ्या भागात आपले आक्रमक परराष्ट्रीय धोरणाची माहिती देऊन त्याच प्रमाणे वागले .हिटलरच्या जीवनावर अनेक चित्रपट आणि नाटके निर्माण झाली. मराठीतही डॉ. समीर मोने यांनी ’द डेथ ऑफ अ कॉन्करर’ या नावाचे नाटक लिहिले आहे. या नाटकात सुशील इनामदार यांनी हिटलरची, तर अतुल अभ्यंकरांनी गोबेल्सची भूमिका केली आहे. नाटकाचे दिग्दर्शन अजित भागत यांचे आहे.हिटलर च्या आत्म चरित्रवर हिंदी मध्ये अनेक चित्रपट निर्मिती करण्यात आलेले आहेत.
 
==अंतर्गत धोरण==
१९३४ पर्यंत कारभाराची सर्व सूत्रे आपल्या हाती केंद्रित केल्यानंतर आणि आपल्या विरोधकांना पूर्णतः निस्तेज केल्यानंतर हिटलरने आपल्याच पक्षाचे शुद्धीकरण केले. ' तुफानी दलाचा ' नेता अर्नेस्ट रोहेम डाव्या विचारसरणीचा होता. ज्या दलाचा उपयोग हिटलरने आपल्या विरोधकांचा नायनाट करण्यासाठी केला त्या दलातील एक गट डाव्या विचारप्रणालीचा पुरस्कर्ता आहे हे लक्षात आल्यावर हिटलरने या गटाला लष्करी बळावर संपवून टाकले. अर्नेस्ट रोहेम आणि तुफानी दलातील डाव्या विचारांचे आणखी काही नेते बंदुकीच्या गोळ्यांना बळी पडले.
 
आपल्या विरोधकांच्या कारवायांना हाणून पाडण्यासाठी हिटलरने ' गेस्टॅपो ' नावाचे गुप्त पोलीस दल स्थापन केले. अल्पावधीतच गेस्टॅपोने एवढी दहशत निर्माण केली कि नाझीविरोध ही चीजच नाहीशी झाली . २८ फेब्रुवारी १९३६ रोजी एक फर्मान काढून हिटलरने शिक्षणसंस्थातील सर्व शिक्षक व सेवक नाझी पक्षाचे असलेच पाहिजेत अशी सक्ती केली. विध्यार्थ्यांच्या मनावर हिटलरचे व नाझी पक्षाचे महान कार्य बिंबवावे या दृष्टीने अभ्यासक्रम आखण्यात आले. हिटलर हा आधुनिक जिझस ख्रिस्त आहे अशी शिकवण देण्यात येऊ लागली. स्त्रियांनी शिक्षणापेक्षा घर सांभाळावे आणि आदर्श माता बनावे असा युक्तिवाद सांगण्यात येऊ लागला. मुद्रणस्वातंत्र्य , भाषणस्वातंत्र्य यांना हिटलरने सुट्टी दिली. हिटलरच्या पक्षाचा प्रमुख प्रचारक डाॅ. गोबेल्स याने म्हटले होते, ' पियानो वाजवून जसे आपल्या मनाप्रमाणे सूर काढता येतात , त्याप्रमाणे वृत्तपत्राकडून माझ्या मनाप्रमाणे सूर काढणे मला शक्य आहे.' वरून नाझी राजवट कशी एकसुरी बनली होती याची कल्पना येते. हिटलरचा सहकारी गोअरिंग याने १९३३ पासूनच हिटलरच्या आदेशाप्रमाणे ज्यू विरोधी मोहीम सुरु केली होती.
 
हिटलर हा कट्टर ज्यूविरोधक होता. स्वतःचे राष्ट्र नसलेले ज्यू लोक इतर राष्ट्रातील जनतेचे रक्तशोषण करतात अशी हिटलरची धारणा होती . पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव होण्यास ज्यू लोकच कारणीभूत आहेत असा अनेक जर्मनांचा समज झालेला होता. त्यामुळे सर्वसामान्य जर्मन नागरिक ज्यू लोकांचा तिरस्कार करी. हिटलरने सर्वसत्ताधीश बनल्यानंतर ज्यू लोकांना धारेवर धरले. प्रत्येक क्षेत्रातून ज्यू लोकांची पद्धतशीर हकालपट्टी करण्यात आली.
 
== बाह्य दुवे ==