"दुर्गा खोटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
removed Category:हिंदी चित्रपट अभिनेते; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ २८:
}}
'''दुर्गा खोटे''' ([[जानेवारी १४]], [[इ.स. १९०५]] - [[सप्टेंबर २२]], [[इ.स. १९९१]]) या [[मराठा|मराठी]] अभिनेत्री होत्या. इ.स. १९३२ सालच्या ''[[अयोध्येचा राजा (चित्रपट)|अयोध्येचा राजा]]'' या [[मराठी|मराठीतील]] पहिल्या बोलपटात प्रमुख भूमिकांपैकी ''राणी [[तारामती]]ची'' भूमिका यांनी केली होती. ''भरत मिलाप'' (इ.स. १९४२) चित्रपटात [[कैकेयी]], तर ''[[मुघल-ए-आझम (चित्रपट)|मुघल-ए-आझम]]'' (इ.स. १९६०) चित्रपटात [[जोधाबाई]], इत्यादी यांनी रंगवलेल्या भूमिकादेखील विशेष गाजल्या. सुमारे पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत यांनी [[मराठी भाषा|मराठी]] व [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषांतील अनेक चित्रपट व नाटकांतून भूमिका केल्या. इ.स. १९६८ साली [[पद्मश्री पुरस्कार]], तर इ.स. १९८३ साली [[दादासाहेब फाळके पुरस्कार]] देऊन यांना गौरवण्यात आले.
 
==बालपण==
दुर्गाबाई यांचा जन्म १४ [[जानेवारी]] १९०५ साली झाला. दुर्गा यांना लहानपणी बानू असे म्हणत होते. त्यांना दोन बहिणी होत्या. एका बहिणीचे नाव इंदू व दुसऱ्या बहिणीचे नाव शालू असे होते. कांदेवाडी या गावात दुगाबाई लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचा तेथे वाडा होता. तो वाडा लहान बानू यांना खूप आवडायचा. तेथील [[वातावरण]] अतिशय [[आनंद|आनंदी]] होते. दुर्गा यांची काकू काकीबाई ह्यांनी सर्व पोरांचा सांभाळ केला. त्या खूप प्रेमळ होत्या. दुर्गाबाई यांच्या वडिलांचे पूर्ण नाव पांडुरंग शामराव लाड असे होते. दुर्गाबाई यांच्या आईचे नाव मंजुळाबाई असे होते.दुर्गाबाई यांचे वडील [[मुंबई]] येथे येऊन सॉलिसिटर झाले. दुर्गाबाईंचे [[वडील]] प्रेमळ होते व त्यांची विचारसरणी उदार होती.
 
== बाह्य दुवे ==