"गुलमोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बदल साचा
No edit summary
ओळ ११:
 
{{बदल}}
गुलमोहोर आता आपल्याकडे रस्त्यांच्या दुतर्फा, आणि बागांमधून खेड्या शहरातून मोठ्या दिमाखाने मिरवताना दिसतो. एप्रिलच्या मध्यापासून ते थेट जुलै-ऑगस्ट पर्यंत या वृक्षाच्या सौंदर्याचा आस्वाद घेता येतो. हा झटपट वाढणारा वृक्ष आहे. अदमासे ५०-६० फुट उंची पर्यंत वाढणारा गुलमोहोर तिसऱ्या-चौथ्या वर्षापासून बहरात येवू लागतो. सामान्यत: गुलमोहोराच सरासरी आयुर्मान असत ४०-५० वर्षाच जमिनीकडे झेपावणाऱ्या फांद्यांमुळे गुलमोहोराचा छत्रीसारखा घुमट तयार होतो. गुलमोहोर वृक्षाच्या फांद्या तांबूस-तपकिरी असतात. तर गुलमोहोराच्या खोडावरील साल असते काळ्या तपकिरी रंगाची. गुलमोहोराच्या फांद्याची वाढ झपाट्याने होत असल्याने या झाडाची वारंवार छाटणी करणे श्रेयस्कर ठरते. गुलमोहोराचा वृक्ष अत्यंत कमकुवत असतो. जोरदार वाऱ्या-वादळात गुलमोहोराची झाडे सहज उन्मळून किंवा मोडून पडू शकतात. गुलमोहोराची नाजूक लेस सारखी मनमोहक हिरव्या-पोपटी रंगातील [[पान]] संयुक्त प्रकारची असतात.अनेक छोट्या-छोट्या पानांनी बनलेल्या गुलमोहोराच्या संयुक्त पानाची लांबी दोन फुटापर्यंत असू शकते. फेब्रुवारी-मार्च दरम्यान गुलमोहोराची पानगळपाने गळायला सुरु होते.... गुलमोहोराच झाड ओकबोक दिसू लागत. गुलमोहोराला पुन्हा पालवी फुटते एप्रिल-मेच्या सुमारास....नेच्यासारखी दिसणारी लुसलुशीत कोवळी पान गुलमोहोराच्या सौंदर्यात भर टाकतात. गुलमोहोराच्या वैशिष्ट्यपूर्ण पाच लाल-केशरी पाकळ्यांवर पांढऱ्या-पिवळ्या रंगाच्या आकर्षक रेष्या असतात अन त्यामुळे या फुलाच सौंदर्य अधिकच खुलत....गुलमोहोराच्या फुलाच वैशिष्ट्य आहे, त्यातील एक इतर पाकळ्यांहून निराळी असलेली पाकळी....जी रंगाने मुख्यत्वे पिवळी असते आणि त्यावर लाल नाजूक रेषा असतात.गुलमोहोराला अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील मायामी इथे विशेष स्थान लाभले....दरवर्षी गुलमोहोर बहरात येण्याच्या काळात इथे वार्षिक 'गुलमोहोर फेस्टिव्हल'च आयोजन केलं जात....मिरवणुका काढल्या जातात....फुगे फुगवून, कॉन्फेटी उधळत नाच, गाणी म्हणत, सहली काढत मायामीत 'गुलमोहोर फेस्टिव्हल' साजरा केला जातो. कॅरीबियन बेटावर गुलमोहोराच्या शेंगा जळण म्हणून वापरतात. अशा सुंदर गुलमोहोराचा छोटा अवगुण म्हणाल तर गुलमोहोराची मूळं....गुलमोहोराची मूळं गुलमोहोराच झाड जसं वाढत जात तशी मोठी होत जातात....आधार मुळांसारखी....जमिनीच्या नजीक गुलमोहोराचा बुंधा उंचावतो व पसरट आधार मूळं जमिनीतून डोकं वर काढतात....कधीकधी हि गुलमोहोराची मूळं इमारतींचा भक्कम पाया उखडून टाकू शकतात....गुलमोहोराच्या जमिनीवर येणाऱ्या मुळांमुळे बगीच्यांत बांधलेले [[रस्ते]] किंवा दगडी पायवाटा गुलमोहोर पार उखडून टाकू शकतो....पण इतक्या चांगल्या झाडाच्या या छोट्या दोषाकडे थोडा कानाडोळा करून जर गुलमोहोर रस्ते इमारतींपासून थोडा दूर ठेवला तर या वृक्षासारखा सौंदर्यसंपन्न दुसरा वृक्ष नाही....गुल्मोहोरासारखा इतका सुंदर वृक्ष काही लोक आपल्या सोसायटीत लावू देत नाहीत....कारण गुलमोहोराची पानं-फुलं
झाडाखाली पार्क केलेल्या गाड्यांवर पडतात म्हणे! तरी अनेक सोसायट्यांच्या आवारात गुलमोहोर लावलेले आज दिसतात. उपनगरातल्या अनेक वसाहतींच्या सभोवार, बागांमधून रंग उधळत गुलमोहोराच्या पिळदार खोडांचे वृक्ष उभे आहेत. आरे कॉलनीतल्या पिकनिक स्पॉटच्या बागेत सुरुवातीलाच लावलेले बलदंड वाटणारे गुलमोहोराचे नमुनेदार वृक्ष मुद्दाम जावून पहावे असे. [[दक्षिण मुंबई]]त अनेक ठिकाणी रस्त्यांवर पर्जन्य वृक्षांच्या, सोनमोहोराच्या जोडीला गुलमोहोरही असतो. मलबार हिलवर तर गुलमोहोरांची दाटीच आहे. दूर समुद्र किनाऱ्यावर चैापाटीवर उभं राहूनही मे महिन्यात मलबार हिलने चढवलेली गुलमोहोराची लाल शालजोडी बघता येते. वैभव संपन्न मलबार हिलच्या तोऱ्यात भर घालणारा हा गुलमोहोराचा मुकुट प्रत्येक मुंबईकरास अभिमानास्पद वाटण्यासारखा आहे.
उंचावतो व पसरट आधार मूळं जमिनीतून डोकं वर काढतात....कधीकधी हि गुलमोहोराची मूळं इमारतींचा भक्कम पाया उखडून टाकू शकतात....गुलमोहोराच्या जमिनीवर येणाऱ्या मुळांमुळे बगीच्यांत बांधलेले [[रस्ते]] किंवा दगडी पायवाटा गुलमोहोर पार उखडून टाकू शकतो....पण इतक्या चांगल्या झाडाच्या या छोट्या दोषाकडे थोडा कानाडोळा करून जर गुलमोहोर रस्ते इमारतींपासून थोडा दूर ठेवला तर या वृक्षासारखा सौंदर्यसंपन्न दुसरा वृक्ष नाही....गुल्मोहोरासारखा इतका सुंदर वृक्ष काही लोक आपल्या सोसायटीत लावू देत नाहीत....कारण गुलमोहोराची पानं-फुलं
झाडाखाली पार्क केलेल्या गाड्यांवर पडतात म्हणे! तरी अनेक सोसायट्यांच्या आवारात गुलमोहोर लावलेले आज दिसतात. उपनगरातल्या अनेक वसाहतींच्या सभोवार, बागांमधून रंग उधळत गुलमोहोराच्या पिळदार खोडांचे वृक्ष उभे आहेत. आरे कॉलनीतल्या पिकनिक स्पॉटच्या बागेत सुरुवातीलाच
लावलेले बलदंड वाटणारे गुलमोहोराचे नमुनेदार वृक्ष मुद्दाम जावून पहावे असे. [[दक्षिण मुंबई]]त अनेक ठिकाणी रस्त्यांवर पर्जन्य वृक्षांच्या, सोनमोहोराच्या जोडीला गुलमोहोरही असतो. मलबार हिलवर तर गुलमोहोरांची दाटीच आहे. दूर समुद्र किनाऱ्यावर चैापाटीवर उभं राहूनही मे महिन्यात मलबार हिलने चढवलेली गुलमोहोराची लाल शालजोडी बघता येते. वैभव संपन्न मलबार हिलच्या तोऱ्यात भर घालणारा हा गुलमोहोराचा मुकुट प्रत्येक मुंबईकरास अभिमानास्पद वाटण्यासारखा आहे.
==संदर्भ==
वृक्षराजी मुंबईची
"https://mr.wikipedia.org/wiki/गुलमोहर" पासून हुडकले