"पाणकावळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बांधणी
No edit summary
ओळ १:
{{पक्षीचौकट
| चित्र = [[File:Little Cormorant Microcarbo niger, India.jpg|thumb|पाणकावळा ]]
| मराठी नाव = पाणकावळा
| इंग्रजी नाव =लिटल कोर्मोरांट<br /><small>(''लिटल कोर्मोरांट'')</small>
| शास्त्रीय नाव = फॅलोक्रोकोराक्स नायजर<br /><small>(''फॅलोक्रोकोराक्स नायजर'')</small>
 
}}
 
 
[[File:Little Cormorant Microcarbo niger by Dr. Raju Kasambe DSCN3359 (27).jpg|thumb|उडताना]]
'''पाणकावळा''' (शास्त्रीय नाव:''फॅलोक्रोकोराक्स नायजर'') हा एक पाणपक्षी आहे. याला इंग्लिशमध्ये ''लिटल कोर्मोरांट'' असे नाव आहे.
 
==माहिती==
'''पाणकावळा''' हा एक पाणपक्षी आहे. हा पक्षी सहसा एखाद्या नदीच्या पात्रात खडकांवर पंख पसरून बसलेला असतो. साधारण जंगली [[कावळा|कावळ्याच्या]] आकाराचा हा पक्षी मासे धरून झाल्यावर पसरून वाळवंटात बसतो. पाणकावळा हा मासेमार पक्षी आहे. पाण्यात बुडी मारून तो माश्याचा पाठलाग करतो आणि आपल्या लांबलचक चपट्याचपटया चोचीत त्यांना पकडतो. हा पक्षी तळी, सरोवर आणि नद्यांमधू लहान–मोठ्या थव्यांमध्ये आढळतो. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] हा पक्षी [[कोकण|कोकणात]] आढळतो. [[बगळा|बगळे]], [[करकोचा|करकोचे]], [[अवाकाद्य|अवाक]] अशा इतर पाणपक्ष्याच्या सोबतीत पाणकावळे घरटी करतात. त्याची घरटी काड्याकाटक्यापासुन बनवलेली कावळ्याच्या घरट्यासारखीच असतात. जर योग्य झाडे असेल तर ते राहत्या घराच्या जवळही घरटी करतात. अशा झाडाखाली त्याची पांढरी विष्टा, अंड्याची टरफले, पिसे आणि माशांचे तुकडे पडलेले दिसतात. पाणकावळे उत्तर भारतात जुलै ते सप्टेंबर आणि दक्षिण भारतात नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान घरटी करतात .
 
समुद्रातले पाणकावळे १६ मीटर खोलीपर्यत डुबी मारतात. पाणकावळा पाण्यात पोहताना किडकिडीत मानेच्या बदकासारखा दिसतो.पोहताना उपयोगी पडावेत म्हणून त्याच्या पायाला पडदे असतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/पाणकावळा" पासून हुडकले