"प्लासीची लढाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो योग्य वर्ग नाव using AWB
ओळ २५:
| टिपा =
}}
'''प्लासीची लढाई''' [[जून २३]], [[इ.स. १७५७]] रोजी झालेली [[ब्रिटिश ईस्ट ईंडिया कंपनी]] व बंगालच्या नवाबच्या सैन्यांमधील लढाई होती. ह्या लढाईत फ्रेंचांनी बंगालच्या नवाबाला मदत केली होती. ही लढाई इंग्रजांनी जिंकलेली पहिली प्रमुख लढाई होती व बंगालचा मोठा प्रांत ब्रिटीश अखत्यारीत आला व इंग्रजांचे भारतावर अधिकृत रित्या राज्य चालू झाले जे पुढील १९० ( १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत) वर्षे टिकले. ह्या राज्याची सुरुवात ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी या नावाने होती. ही लढाई कोलकाता पासून साधारणपणे १५० किमी वर भागीरथी नदीच्या काठी पलाशी गावाच्या नजीक झाली.
 
ही लढाई खरेतर युरोपातील इंग्रज व फ्रेंच चढाओढीमुळे झाली होती. १७५६ ते १७६३ मध्ये इंग्रज फ्रेंचात युद्ध झाले त्यामध्ये शत्रुत्वापोटी फ्रेंच इस्ट इंडिया कंपनीने ब्रिटीशांविरुद्ध लढण्यास फौज पाठवली होती. फ्रेंचांनी सिरज उद दौला ची इंग्रजांविरुद्ध लढण्यास मदत मागितली. सिरज उद दौलाची फौज इंग्रजांपेक्षा मोठी होती. त्यामुळे पराभवाच्या भितीने इंग्रजांनी सिरज उद दौलाचे विरोधकांना आपल्या बाजूने वळवले. मीर जाफर जो सिरज उद दौलाचा माजी सेनापती होता त्याने लढाईच्या भूमीजवळ राहून लढाईत भाग न घेता इंग्रजांच्या विजयात हात भार लावला. सिरज उद दौलाचा पराभव झाला व सरतेशेवटी इंग्रजांच्या हाती पडल्यावर ठार मारण्यात आले. मीर जाफरला इंग्रजांनी आपल्या हातचे बाहुले बनवून नवाब बनवले. या विजयाने संपूर्ण बंगाल प्रांत इंग्रजांच्या हाती आला.
 
या लढाईने ब्रिटीशांच्या अशिया खंडातील साम्राज्याचा पाया घातला. बंगाल काबीज करताच राजकोषातून ब्रिटीशांना मोठ्या प्रमाणावर संपत्ती हाती पडली. तसेच बंगालच्या सुपीक प्रांतावर अनेक प्रकारचे कर लादून मोठ्या प्रमाणात संपत्ती कमवण्यास सुरुवात केली याचा फायदा त्यांना आपली लष्करी ताकद वाढवण्यात झाला.
ओळ ३३:
{{भारतीय स्वातंत्र्यलढा}}
 
[[वर्ग:भारतीयभारताचा इतिहास]]
[[वर्ग:ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सहभागी असलेली युद्धे]]