"प्रथमेश परब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १:
[[चित्र:Prathamesh parab.jpg|चौकट|डावे|प्रथमेश परब]] रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेला ‘बालक पालक’ हा सिनेमा जानेवारी २०१३ मध्ये प्रदर्शित झाला आणि या चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीला एक चांगला आणि जाणकार अभिनेता दिला. प्रथमेश परब हे त्याचं नाव. नुकताच प्रदर्शित झालेला ‘टाईमपास’ या सुपरहिट चित्रपटानं पुन्हा एकदा प्रथमेशचं नाव चर्चेत आलं आहे. सहजसुंदर अभिनयानं प्रथमेशनं सर्वांचीच मनं जिंकून घेतली आहेत. ‘बालक पालक’ चित्रपटातला विशु असो किंवा ‘टाईमपास’ चित्रपटातला दगडू प्रथमेशच्या या दोन्ही भूमिकांनी रसिक एकदम खुश आहेत. प्रथमेशचा अभिनयात झालेला प्रवेश खूपच अनपेक्षित होता. ‘बालक पालक’ या एकांकिकेसाठी प्रथमेशनं काम केलं होतं. अर्थात त्याचा लीड रोल नव्हता मात्र त्याच्या कामानं रवी जाधव यांना जिंकून घेतलं. आणि अशा प्रकारे त्याच्याकडे ‘बालक पालक’ चित्रपट चालत आला.
 
रवी जाधव यांच्याच ‘टाईमपास’ या चित्रपटाने त्याच्याकडे एक ‘लव्हर बॉय’ ची भूमिका चालत आली आणि त्याने या भूमिकेत जीव ओतला. सध्या प्रथमेश पदवी शिक्षण पूर्ण करत असून चांगल्या ऑफर्स मिळाल्या तर चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची संधी सोडणार नाही असं त्याचं म्हणणं आहे. पुढील काळात प्रथमेशला अभिनयाच्या उत्तम संधी मिळाव्यात आणि आपल्याला त्याचं काम पाहण्याची संधी मिळावी हीच आपली अपेक्षा..
 
== संदर्भ ==
* [http://www.greatmarathi.com/prathamesh-parab/ ग्रेट मराठी.कॉम]
 
[[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते]]
[[वर्ग:रिकामी पाने]]