"जे. कृष्णमूर्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३८:
 
नित्यानंदांच्या मृत्यूमुळे "विश्वगुरूचे आगमन" वगैरे चर्चा बंद झाल्या.
 
==भूतकाळाशी फारकत==
३ ऑगस्ट १९२९ रोजी कृष्णमूर्तींनी ऑर्डर ऑफ दी स्टारचे विसर्जन केले. मागील दोन वर्षांदरम्यान केलेल्या गंभीर विचारमंथनानंतर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच त्यांनी नमूद केले की,
<blockquote>सत्य ही मार्गरहित भूमी आहे आणि तुम्ही कोणत्याही मार्गाने, कोणत्याही धर्माने, कोणत्याही पंथाने त्याच्या जवळ जाऊ शकत नाही ह्या म्हणण्यावर मी ठाम आहे. हा माझा दृष्टिकोन आहे आणि त्याच्याशी मी विनाशर्त पूर्णपणे बांधिल आहे. सत्य अमर्याद, अशर्त व कोणत्याही मार्गाने मिळण्यासारखे नसल्याने संघटित केले जाऊ शकत नाही; लोकांना दिशा देण्यासाठी किंवा विशिष्ट मार्गावर चालविण्यास प्रवृत्त करण्यासाठी कोणतीही संस्था बनविली जाऊ नये. ... हे महान कृत्य नाही, कारण मला अनुयायी नको आहेत आणि खरेच नको आहेत. एखाद्याचा अनुनय सुरू झाला की सत्याचा अनुनय समाप्त होतो. मी म्हणतो त्याकडे तुम्ही लक्ष देता की नाही याचीही मला चिंता नाही. जगात मला एक गोष्ट करावयाची आहे आणि अढळ अवधानाने मी ती करणार आहे. मी एकाच आवश्यक गोष्टीचा विचार करतो : मानवास मुक्त करणे. मी मानवाला सर्व पिंजर्‍यांपासून, सर्व भयांपासून मुक्त करण्याची अभिलाषा धरतो; धर्म किंवा स्थापण्याची, नवे सिद्धांत किंवा नवे तत्त्वज्ञान मांडण्याची नाही.</blockquote>
 
विसर्जनानंतर अनेक विख्यात थिऑसॉफिस्ट्स, अगदी लेडबिटरही कृष्णमूर्तींच्या विरोधात गेले. आपण विश्वगुरू आहोत याचा कृष्णमूर्तींनी साफ इन्कार केल्याचा पुरावा उपलब्ध नाही पण जेव्हा जेव्हा त्यांना त्यांची भूमिका विचारण्यात आली तेव्हा तेव्हा त्यांनी एकतर ही बाब असंबद्ध आहे असे म्हटले किंवा त्यांच्याच शब्दांमध्ये "जाणूनबुजून संदिग्ध" उत्तरे दिली. विसर्जनानंतर लवकरच त्यांनी थिऑसॉफिकल सोसायटी, तिचे उपदेश किंवा प्रथा-पद्धती यांच्यापासून फारकत घेतली.
 
आपल्या उपदेशाला कृष्णमूर्तींनी कधीही ''माझा'' उपदेश म्हटले नाही. ते नेहमी उपदेशाबद्दल दक्ष असत, उपदेशकाबद्दल नाही. शिक्षकाला महत्त्व नव्हते आणि सर्व प्रकारच्या सत्तांचा, विशेषतः मानसिक सत्तांचा त्याग त्यांना अभिप्रेत होता :
<blockquote>कोणत्याही प्रकारची सत्ता, विशेषतः चिंतन व आकलनाच्या क्षेत्रातील सत्ता ही सर्वाधिक विनाशकारी, वाईट गोष्ट आहे. नेते अनुयायांचा नाश करतात व अनुयायी नेत्यांचा नाश करतात. तुम्हाला स्वतःच स्वतःचा शिक्षक व विद्यार्थी बनावे लागते. माणसाने मूल्यवान, आवश्यक म्हणून स्वीकारलेल्या प्रत्येक गोष्टीबाबत तुम्ही सवाल करावयास हवेत. </blockquote>
सोसायटीशी फारकतीनंतर संबंधित सर्व पदांचा कृष्णमूर्तींनी त्याग केला, दान म्हणून मिळालेल्या वस्तू व मालमत्ता ज्याच्या त्याला परत केल्या. उरलेले आयुष्य त्यांनी जगभरातील लोकांशी विश्वास, सत्य, दुःख, स्वातंत्र्य, मृत्यू यांच्या स्वरुपाबाबत व अध्यात्मसंपन्न आयुष्याबाबत चर्चा करण्यात व्यतीत केले. अनुयायी किंवा पूजकांचा त्यांनी स्वीकार केला नाही. गुरू आणि शिष्य या नात्यात अवलंबित्व व शोषण येते असे त्यांचे मत होते. आपल्या कार्याने प्रभावित झालेल्या लोकांकडून भेटवस्तू व आर्थिक मदतीचा त्यांनी स्वीकार केला आणि व्याख्यानमाला, लेखन या गोष्टी पन्नास वर्षांहून अधिक काळ सुरू ठेवल्या. त्यांनी लोकांना सतत स्वतंत्रपणे विचार करण्यास प्रवृत्त केले आणि विवक्षित विषयांबाबत चर्चेसाठी लोकांना आमंत्रित केले.
 
{{संदर्भनोंदी}}