"शिवकुमार शर्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sa:शिवकुमार शर्मा
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Shivkumar Sharma 2009.jpg|thumb|२००९]]
'''शिवकुमार शर्मा''' ([[१३ जानेवारी]], [[इ.स. १९३८]], [[जम्मू]], [[भारत]] - ) हे एक ख्यातनाम भारतीय [[संतूर]] वादक आहेत. संतूर हे [[काश्मीर]]चे लोकवाद्य आहे. या वाद्यात शंभर तारा असतात.
 
==सुरुवातीची वर्षे==
{{विस्तार}}
शिवकुमार शर्मा यांचा जन्म जम्मू येथे झाला असून त्यांची मातृभाषा डोग्री आहे. १९९९ साली त्यांनी रेडिफला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की त्यांच्या वडिलांनी त्यांना केवळ पाच वर्षांचे असल्यापासून शास्त्रीय गायन आणि तबल्याचे धडे द्यायला आरंभ केला. त्यांच्या आई उमा दत्त शर्मा (गायिका) यांनी सखोल अभ्यास करून ठरवले की शिवकुमार यांनी भारतीय शास्त्रीय संगीत संतूरवर वाजवणारे भारतातील पहिले वादक बनावे. म्हणून मग त्यांच्या इच्छेनुसार, शिव कुमार यांनी वयाच्या तेराव्या वर्षापासून संतूर शिकण्यास प्रारंभ केला आणि उमा दत्त शर्मा यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. त्यांनी आपल्या वादनकौशल्याचे पहिले सादरीकरण १९५५मध्ये मुंबई येथे केले.
 
==सांगीतिक कारकीर्द==
{{DEFAULTSORT:शर्मा, शिवकुमार}}
सुरुवातीची काही वर्षे कंठगायन केल्यानंतर शिवकुमार शर्मा हे संतूरवादनाकडे वळले. संतूर या वाद्याला लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. आता शिव कुमार शर्मा म्हटले की संतूर वादक असेच मनात येते. १९५६ साली शांताराम यांच्या "झनक झनक पायल बाजे" गाण्यास त्यांनी संगीत दिले. १९६० साली त्यांनी स्वतःचा एकल गीतसंच प्रसिद्ध केला.
 
१९६७ साली त्यांनी प्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया आणि ब्रिज भूषण काब्रा यांच्यासमवेत "कॉल ऑफ द व्हॅली" ही ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध केली. ती कालांतराने खूपच प्रसिद्ध झाली. हरिप्रसाद चौरसिया यांच्या साथीने त्यांनी काही चित्रपटांना संगीतसुद्धा दिले आहे. त्याची सुरुवात १९८० साली "सिलसिला" चित्रपटापासून झाली. या काळात या जोडगोळीने "शिव-हरी" या नावाने संगीत दिले होते. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांपैकी काही चित्रपट हे: फासले (१९८५), चाँदनी (१९८९), लम्हे (१९९१), डर (१९९३).
 
==वैयक्तिक आयुष्य==
शिवकुमार शर्मा यांचे लग्न हे मनोरमा शर्मा यांच्याशी झाले असून त्यांना तीन मुलगे आहेत. त्यांचा मुलगा राहुल हासुद्धा संतूर वादक असून १९९६ पासून तो शिवकुमारांना साथ करतो आहे. १९९९मध्ये शर्मा यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, राहुलला देवाकडूनच संगीताची भेट मिळाली असल्यानेच त्यांनी त्याचा शिष्य म्हणून स्वीकार केला आहे.
 
 
{{DEFAULTSORT:शर्मा, शिवकुमार}}
[[वर्ग:इ.स. १९३८ मधील जन्म]]
[[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]]
Line १० ⟶ २०:
[[वर्ग:भारतीय संगीतकार]]
[[वर्ग:संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:संतूरवादक]]
 
[[de:Shiv Kumar Sharma]]